नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो की मित्र असावेत. तर कृष्ण आणि सुदामा सारखी. असा मित्र पाहिजे असे प्रत्येकाला वाटतं. आपल्याला दुःख झालं की दुसऱ्याला आपली कळ आली पाहिजेच, असा मित्र प्रत्येकालाच हवासा वाटतो.

तुम्हाला असं वाटत असेल, तरी तुम्ही या चार राशींच्या व्यक्तीसोबत मैत्री नक्कीच करू शकता. कारण त्यांची मैत्री हे कृष्ण आणि सुदामा सारखी निर्मळ असते. चला तर मग जाणून घेऊयात या जिवास जीव देणाऱ्या चार राशी कोणत्या आहेत.

कृष्णा आणि सुदामा सारखी पक्की मैत्री करण्यासारख्या व्यक्तींमध्ये प्रथम म्हणजे..
मेष राशी, मेष राशींच्या व्यक्तींना मैत्रीची खूप जाण असते. अशी व्यक्ती तुमच्यासोबत एकदा मैत्री केली की आयुष्यभर ती मैत्री सोडत नाही. मेष राशीच्या व्यक्ती खूपच रागीष्ट असतात पण त्यांच्या मनात काहीच नसतं ते खूप चांगल्या स्वभावाचे असतात.

त्यांच्या मनात जे काही असतं तेच तोंडावर देखील असतं. तेव्हा काही व्यक्तींच्या मनात एक आणि तोंडावर एक अशा प्रकारचा स्वभाव त्यांचा नसतो. काही व्यक्तींना या व्यक्तींचा स्वभाव आवडतो त्यामुळे काही लोक यांना प्रसन्न पसंत करतात. हे खूप पारदर्शक असतात त्यांच्या स्वभाव मध्ये किंवा त्यांच्या मैत्रीमध्ये कोणताच स्वार्थ नसतो. हे त्यांच्या मैत्रीचा वैशिष्ट्य आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आहेत मिथुन राशीचे लोक हे लोक स्थिर स्वभावाचे असतात. या राशीचे लोक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत असतात या राशींचे व्यक्तींची मैत्री पक्की असते. हे व्यक्ती आपल्या मित्राला प्रत्येक अडचणीच्या वेळी खूप साथ देत असतात.

हे व्यक्ती ज्या व्यक्तींचे मित्र आहे त्या मित्रांना या व्यक्तींसोबत सहवास करणे खूप आवडते. कारण यांचा स्वभाव विनोदी असतो. त्यामुळे मैत्री जमवून यांना चांगलं जमतं. त्याचप्रमाणे हे लोक मैत्रीला कोणतीही किंमत मोजायला देखील तयार असतात. मिथुन राशीचे लोक आपल्या जोडीदाराला सुद्धा खूपच जास्त साथ देत असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो.

तिसरी राशी आहे मकर राशी. या राशीचे लोक कष्टाळू असतात मेहनती असतात व प्रामाणिक देखील असतात. या राशींच्या व्यक्तींसोबत जास्त मित्र नसतात. मित्र मोजकेच असतात पण खूपच जिवलग असतात. दोनच मित्र असतील पण पक्के असतील. कोणत्याही वेळी हाका मारली तरी ते आपले काम सोडून आपल्या मित्रासाठी उभे असतील.

हे लोक नात्याबाबत प्रामाणिक असतात. मकर राशीचे लोक खूपच चांगल्या स्वभावाचे असतात. मकर राशीचे लोक दुसऱ्यांसाठी लगेचच उपयोगी पडतात. म्हणजे कोणी तुम्हाला साथ देत नसतील तर मकर राशीच्या व्यक्ती तुम्हाला साथ देतील. त्यामुळेच मकर राशीच्या व्यक्तींवर शनी देवाचा प्रभाव आहे.

चौथी रास आहे मीन राशी. मित्रांनो मीन राशीचे व्यक्ती स्वभावाने खूपच सरळ स्वभावाचे असतात त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा कपट नसतो. त्यामुळेच त्यांची मैत्री सुद्धा पक्की असते. या व्यक्तीने तुम्हाला आपलं मानलं की ते पुढचा मागचा विचार न करता मीन राशीच्या व्यक्ती त्या व्यक्तींसाठी लगेचच संकटकाळी उभे असतात.

संकटाच्या वेळी तुम्हाला साथ देताना स्वतः चा किती खर्च झाला याच्या कडे ते कधीच लक्ष देत नाही. जर तुमच्या मैत्रीण पैकी कोणी मीन राशींचे व्यक्ती असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजल पाहिजे. मीन राशीचा जिवलग मित्र आयुष्यात प्रत्येकाला मिळायलाच हवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *