नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!माणसाचं मन जसं भावनाशील व संवेदनशील असतं अगदी तसचं वास्तूलाही काही भावना असतात. त्यामागे अनेक कथाही सांगितल्या जातात. वास्तू बांधल्यानंतर तिची शांती करणं गरजेचं आहे. ‘वास्तुशांती’ हा विधी पद्धतशीर व्हायला हवा, असंही सांगितलं जातं. पण त्यासाठी त्याचा विधी, त्याचा इतिहास किंवा कथा, त्याचं पूजन कशा प्रकारे करावं याची देवता, अधिदेवता, प्रत्याधीदेवता यांची पूजा कशा प्रकारची असावी, वास्तुनिक्षेप कसा करावा, याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

‘घर बघावं बांधून, अन् लग्न करावं पाहून’ असा एक जुना संवाद होता. या दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात येण्याकरता ज्या काही जुळवाजुळवी कराव्या लागतात, त्या त्रासाला अंत असा नसतोच. पण आता या दोन्ही गोष्टी सध्याच्या प्रगत युगात थोड्याफार सोप्या झालेल्या आहेत. फक्त जवळ पैसा असला की, सर्व काही आलं. पूर्वीच्या काळी पाया खोदण्यापासून ते थेट तिथे निवास करण्यासाठी जाण्यापर्यंत बराच कालावधी, पैसा आणि वेळ लागायचा. तेव्हा कुठे तरी काम संपल्यानंतर मनाचा एक कोपरा सुखावायचा. बिल्डरला पैसे दिले की साधारणत: एक ते दोन वर्षात, कदाचित सहा महिन्यांत ताबा मिळतो. तो मिळाला की, चांगला मुहूर्त पाहून नवीन घरात वास्तुशांती करून जाण्याचा उत्साह काही औरच असतो. तेव्हा वास्तुशांती हा विधी पद्धतशीर व्हायला हवा. मात्र, त्यासाठी या विधीविषयी इ’त्थंभूतपणे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

वास्तूसंबंधी एक कथा सांगितली जाते ती अशी.. भगवान शंकराचं अंधकासुराशी ज्या वेळी युद्ध झालं त्या वेळी शंकराच्या घर्मबिंदूतून एक महाभूत निर्माण झालं. अंधकासुराचं र’क्त प्रा’शन करूनही त्याची भूक शमली नाही आणि क्षुधातृप्तीसाठी त्याने घोर तप केले. त्या वेळी भगवान शंकरांनी त्याला असा वर दिला की.. ‘वास्तुपुरुषाची पूजा करताना जो बलिभाग दिला जाईल, तो तुला अन्न म्हणून मिळेल आणि जे लोक वास्तुपुरुषाला बली न देता वास्तू उभारतील, ती वास्तूच तुझे भक्ष्य बनेल.’

अर्थात ही पहिली कथा आहे. तशीच दुसरी एक कथा अशी सांगितली जाते..युद्धामध्ये देवांकडून दैत्यांचा पराभव झाला. या अपमानाने दैत्यगुरू भार्गव यांनी जयप्राप्तीसाठी यज्ञ केला. यज्ञ समाप्तीनंतर भार्गवाचे घर्मबिंदू यज्ञभूमीवर पडले. याच्यातून छगासुर नावाची एक शक्ती बनली. त्याने दैत्यगुरूंच्या आज्ञेवरून स्वर्गावर स्वारी करून देवांना पळवून लावले. सर्व देव भगवान शंकराला शरण गेले. त्यांनी एक भूत निर्माण करून प्रथम भार्गव आणि छगासुर यांचा नि:पात करण्याची आज्ञा दिली.

भार्गवाने चतुराईने भगवान शंकराच्या कानावाटे उदरात प्रवेश केला. शंकरांनी त्याला अभय दिलं. अभय मिळताच शुक्रमार्गाद्वारे त्याने स्वत:ची सुटका करून घेतली. छगासुराला वाचविण्यासाठी त्याने शंकरास साष्टांग दंडवत घालण्याची सूचना केली. तो शंकराभिमुख म्हणजे ईशान्येकडे मस्तक करून पालथा पडला. त्या स्थितीतच त्याने एक अट घातली. ती अट अशी की, न उठता सर्व देवांना त्याच्या शरीरावर वास्तव्य करू द्यावं.

भगवान शंकरांनी ही अट मान्य केली. तेव्हा कोणत्याही इमारतीचा भाग वास्तुपुरुषी असुराने व्यापलेला असतो, असे मानले जाऊ लागले. याच्या निरनिराळ्या अवयवांवर वेगवेगळ्या देवतेचं अधिष्ठान असते, असे म्हणतात. त्यांना आपण प्रसन्न करून घेतो. वास्तुपुरुषाच्या डोक्यास ब्रह्म, दोन्ही कानांमध्ये पर्जन्य आणि दिती, गळ्यात पाणी, खांद्यावर जय आणि अदिती, उजव्या बाजूस इंद्रासह पाच देवता, डाव्या भूजेत नाग, उजव्या हातात सावित्री आणि सविता, डाव्या हातात रुद्र आणि पायात पितृगण अशी वास्तुपुरुषाची स्थापना असावी, असं कल्पलेलं आहे.

बांधकाम करताना काही ठिकाणी झाडे, वृक्ष, वेली, अपरिहार्य कारणामुळे तोडल्या जातात. कीटक, अळी, पक्ष्यांची घरटी मोडली जातात. तसंच खोदकाम करताना आपण भूमीवर आ’घात करत असतो. या सर्वाचं प्रायश्चित्त म्हणून यांची माफी मागून वास्तुशांत हा विधी अत्यंत गंभीर आणि श्रद्धायुक्त अंत:करणाने करायचा असतो. तुम्ही गृहप्रवेशाच्या वेळी पाहुणे राऊळे, मित्र, हितचिंतक यांना बोलावू शकता.

प्रथम संकल्प, पुण्याहवाचनादी कृत्ये केल्यानंतर आचार्यपूजन करून पुढील कृत्ये त्याद्वारे केली जातात. देवतेच्या स्थापनेसाठी चौकोनी वेदी बनवून उत्तर वेदीच्या कोप-यावर लोखंडी खिळा ठोकतात. त्यावर भाताचा बळी ठेवतात. आग्नेयेस अग्नीची स्थापना करून घेतात. या सर्व रचनेला ‘वास्तुमंडल’ म्हणतात. ग्रहाचे आवाहन करून पूजन करतात. वेदीवर शिखी, पर्जन्य, जयंत इत्यादी ४५ देवतांचं आवाहन करतात.

वास्तुपुरुषाच्या निरनिराळ्या अवयवांवर देवतांची स्थापना करायची असते. मध्यभागी वास्तुपुरुषाची प्रतिमा ठेवून इतर देवतेसह त्यांचं पूजन केलं जातं. प्रथम होमाच्या वेळी ग्रहाच्या समिधा, चरू, आज्य यांचे हवन करून वास्तुमंडल देवतेसाठी तीळ, पायस, आज्य यांच्या आहुत्या देण्यात येतात. त्याचप्रमाणे वास्तोस्पतीसुक्ताने वास्तुस्पतीसाठी बिल्वपत्राच्या आ’हुत्या देतात. प्रायश्चित्त होमानंतर सर्व देवतांना यथाविधी उडीदासह चरूचा बली देतात. मग यजमान दाम्पत्यावर त्याच्या कुटुंबीयांसह ऋत्विज अभिषेक करतात. तिहेरी सूत घेऊन पवमान आणि रक्षान्घ ही सुक्ते म्हणतात. त्या घराभोवती ते गुंडाळताना यजमान आणि त्याची पत्नी दूध आणि पाणी यांची संततधार करतात.

वास्तुनिक्षेप आग्नेयेस करावा. तांब्याच्या लहान गड्डात (झाकणासह) किंवा अलीकडे खैराची पेटी मिळते यात सप्तधान्य, दही, भात, फुले, शेवाळ ठेवून, वास्तूची प्रतिमा पालथी ठेवून (ईशान्येकडे मस्तक आणि नैऋत्येकडे पाय) तिचा नि:क्षेप करून प्रार्थना करावी.

स-शैल सागरा पृथ्वी याथा वहासी मुद्धीनी!
तथा मां वह कल्याणा सम्पत सन्ततिभि: सह
ततस्तद्गतो पद्धत – मृद गर्त पुरयेन
पुरिते मृदाध्ये उत्तमम्
साम्ये मध्यमम्। न्युने त्वधमं फलं विन्ह्यान!

या मंत्राचा अर्थ असा आहे. हे वास्तुपुरुषा, तू ज्याप्रमाणे पर्वत आणि सागर यांना शिरावर वाहतोस त्याचप्रमाणे कल्याण, संपत्ती आणि संततीसह मला तुझ्या मस्तकावर धारण कर. जुन्या वास्तूतील काही बदल केले असल्यास वास्तुशांती करण्याची गरज नाही. पण मुख्य दरवाजा बदलला असेल तर हा विधी करावा.

भगवान शंकराने वास्तुपुरुषास वर दिला आहे, तो म्हणजे ‘तथास्तु’ म्हणण्याचा. तेव्हा वास्तू (नवीन असो वा जुनी) काही वाईट उच्चारू नये. कारण तुम्ही जे बोलता त्यास वास्तुपुरुष ‘तथास्तु’ म्हणतो.

हा विधी अत्यंत व्यवस्थित झाला पाहिजे. आयुष्यात सर्वसामान्य माणसे एकदाच घर घेतात. तशीच वास्तुशांतीही शक्यतो एकदाच होते. वास्तुशांतीनंतर काही वर्षाच्या विलंबाने किंवा शक्य असेल तर दरवर्षी उदकशांती, नवग्रह होम, गणेशयाग, सप्तशतीचे पाठ घरी करावेत. त्याने वास्तू पवित्र, निर्मळ होऊन जाते. लग्नकार्यानंतर वर्षभर वास्तू करू नये.

लग्न, मुंजी अगोदर वास्तुशांती करावी. तसंच दर सणावाराला आनंदी प्रसंगी वास्तुपुरुषास न चुकता नवेद्य दाखवावा. वास्तूची रचना चुकीची झालेली असेल, ती वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर पाडापाड न करता उपचाराद्वारे घराची रचना करून घ्यावी. एखाद्या लहान मुलावर ज्याप्रमाणे संस्कार होतात, मोठेपणी ते मूल ते संस्कार घेऊनच वाढतं तसंच आपल्या वास्तूचंही आहे. जसे बांधकाम तसेच फळ मिळते.

वास्तुपुरुष आग्नेयेस निक्षेपच करावा. कारण ‘नमस्ते वास्तुपुरुषा भुशैय्याभिरत प्रभू। मद्गृहे धनधान्यादी समृद्धी कुरू सर्वदा॥’ अशी प्रार्थना आहे, तेव्हा भूशय्या म्हणजेच जमीन हीच वास्तुपुरुषाची श’य्या आहे. तेव्हा निक्षेप भूमीतच झाला पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *