नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!चातुर्मासातील दुसरा महिना म्हणजे भाद्रपद. याचे वैदिक नाव नभस्य असे आहे. मात्र, या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला भाद्रपद हे नाव दिले आहे. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीला धार्मिक दृष्टीकोनातून विशेष महत्त्व असण्याचे कारण म्हणजे या दिवशी मंगलमूर्ती, विघ्नहर्ता, गजानन गणेशाचा जन्म दुपारी झाला. त्यामुळे गणेश चतुर्थी हा गणेश जन्मोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक भाविक १० दिवस गणेशमूर्तीची पूजा करतात तर काही भक्त गणेशमूर्ती एक दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस बसवतात. असे म्हटले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरात ठेवून श्रद्धेने पूजा करणाऱ्यांचे सर्व संकट गणपती बाप्पा दूर करतात.

गणेश चतुर्थी तिथी आणि मुहूर्त
यंदा मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थी साजरी असून, चतुर्थी तिथी प्रारंभ: १८ सप्टेंबर २०२३ रोजी १२ वाजून ३९ मिनिटे ते चतुर्थी तिथी समाप्ती: १९ सप्टेंबर २०२३ रोजी १ वाजून ४४ मिनिटापर्यंत आहे. या उत्सवात मध्यान्ह (मध्यन्याव्यपिनी) उपस्थित चतुर्थी घेतली जाते. जर हा दिवस रविवार किंवा मंगळवार असेल तर ती महा-चतुर्थी होते. यंदा १९ तारखेला मंगळवार आल्यामुळे २०२३ ची ही महाचतुर्थी धरली जाईल.
गणेश चतुर्थी पूजन
सकाळी स्नान करून सोने, तांबे आणि मातीच्या गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी आणावे. गणपती बाप्पाला विधीवत स्थापन करावे. गणपती बाप्पाला गंध लावावा आणि दुर्वा अर्पण करा. तसेच २१ लाडू अर्पण करा. यातील ५ लाडू गणपती बाप्पाला अर्पण करा आणि उरलेले लाडू गरीब किंवा ब्राह्मणांना वाटून द्या. दररोज सकाळ संध्याकाळी गणेशाची पूजा करावी. गणेश चतुर्थी, गणेश चालीसा आणि आरतीची कथा वाचल्यानंतर चंद्रदर्शन न करताच चंद्राला अर्घ्य द्यावे. या दिवशी गणेशाच्या सिद्धिविनायक रूपाची पूजा करून उपवास केला जातो. यानंतर आपआपल्या श्रद्धेप्रमाणे गणेशमूर्ती एक दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस बसवून त्यांचे विधीवत विसर्जन करावे. यंदा गणेश विसर्जन म्हणजेच अनंत चतुर्दशी गुरुवार २८ सप्टेंबर २०२३ रोजी आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *