नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपण काय करत आहोत? आणि त्याचा पुढे काय परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतो? हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच चांगले जीवन जगण्यासाठी ही चार वाक्य आपण कधीही बोलू नये. ही चार वाक्य कोणती? ते आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

पहिले वाक्य म्हणजे हे काम खूप अवघड आहे माझ्याच्याने होणार नाही. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या वाक्याचा वापर सतत करत असाल तर, तुमची प्रगती होणे खूप कठीण आहे. तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल की, जे काम अवघड असते त्यातूनच आपली प्रगती होत असते. सोपे काम हे कोणी सुद्धा करू शकतो.

म्हणून आज पासून हे वाक्य तुमच्या आयुष्यातून काढून टाका. तुम्ही कोणतेही काम करतो असताना कोणतेही काम करण्याआधी हे काम खूप सोपे आहे. हे मी करू शकतो. याचा वापर करा. नक्कीच तुमचे जीवन बदलून जाईल. तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल. तुमचं जीवन बदलून जाईल.

दुसरे वाक्य म्हणजे माझी योग्यता नाही किंवा माझी पात्रता नाही. अनेक व्यक्तींच्या बाबतीत असे घडते की, बाहेर घडलेल्या चुकीच्या वर्तणूक केली त्याचे दोष ते आपल्यावर घेत असतात. त्यांना असे वाटते की, ते आपल्या मुळेच घडले आहे. त्यांना असे वाटत असते की, जे काही दुर्गुण आहेत ते माझ्याकडेच आहे.

कोणतीही गोष्ट करण्यासाठी ते स्वतःला कधीच पात्र समजत नाही. जर तुम्ही असे समजत असाल तर, जीवनामध्ये तुम्ही यश कधीही मिळवू शकत नाही. आज जगात जे काही आहे उत्कृष्ट आहे. त्यासाठी मी पात्र आहे. अशी भावना मनामध्ये पाळणा तुम्हाला नक्कीच यश येईल.

तिसरे वाक्य म्हणजे बुद्धिमान नाही आहे. मी हुशार नाही आहे. अनेक लोकांचा असा समज असतो की, जे लोक आयुष्यामध्ये खूप पैसे कमवतात यशस्वी होतात तेच खरे बुद्धिमान व हुशार असतात. देवाने विशेष देणगी दिलेली असते. पण तसे काही नसते. आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या सवयी लावून देतो. आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये चिकाटी आहे. आपण किती शिस्तबद्ध आहोत. यावर आपले यश अवलंबून असते. त्यामुळे आपण बुद्धिमान नाही किंवा हुशार नाही हे असे कधीही म्हणू नये.

चौथी वाक्य म्हणजे मला आधी एक अपयश आले आहे. अनेक लोक आपल्या भूतकाळात घडलेल्या अपयशाचे विचार करत बसतात आणि वर्तमानात कोणतेही नवीन निर्णय किंवा नवीन गोष्टी करायला जात नाहीत. ते आपल्याला आलेल्या अपयशाचे विचार करत असतात. परंतु असे केल्याने आपल्याला जीवनामध्ये कधीच यश संपादन करता येणार नाही. म्हणून भूतकाळाच्या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नये.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *