नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!.!! मित्रांनो, सनातन धर्माध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा संबंध शुभ संकेतांशी आहे. त्याचबरोबर काही गोष्टी अशा आहेत, ज्या अशुभ मानल्या जातात आणि त्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे व्यक्तीला समस्यांचा सामना करावा लागत नाही. रात्रीच्या वेळी कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जाते.

घराबाहेर कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येऊ नये, असं अनेकदा तुम्ही घरातील वडिलधाऱ्यांकडून ऐकले असेल. असे मानले जाते की, रात्रीच्या वेळी घराभोवती कुत्र्याच्या रडण्याचा आवाज आला तर ते अशुभ लक्षण आहे. बऱ्याच वेळा आपण रडणाऱ्या कुत्र्याला हाकलून लावत असतो.

रात्री कुत्रे का रडतात..जुन्या समजुती –
जुन्या समजुती नुसार, रात्री कुत्र्यांचे रडणे हे अनेक दुःखांचे संकेत आहे. ज्या व्यक्तीच्या घराबाहेर कुत्रा रडतो त्याच्या घरात अप्रिय बातमी ऐकायला मिळते.

आधीच लागते दुःखाची चाहूल –
प्रचलित समजुतीनुसार, कुत्र्यांना त्रासाची पूर्वसूचना किंवा एखादी अप्रिय घटना घडणार आहे, याचा अगोदरच अंदाज येतो असे मानले जाते. अनेक आपत्तींची कुत्र्यांना आधीच चाहूल लागते, असे मानले जाते.

पण यामागे खरं कारण काय?
मित्रांनो, शास्त्रत्रांच्यामते कुत्रे फक्त तेव्हाच रडतात जेव्हा त्यांना त्यांच्या बाकीच्या साथीदारांना एखादा संदेश द्यायचा असतो. या खास आवाजाद्वारे ते अनेक वेळा त्यांचे स्थान त्यांच्या बाकीच्या साथीदारांना सांगतात जेणेकरून ते त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. दुसरीकडे, कुत्र्यांना वेदना होत असतानाही ते रडतात किंवा ओरडतात. त्यांची समस्या मांडण्याची ही एक खास पद्धत आहे

नकारात्मक उर्जेमुळे कुत्रे रडतात –
रात्रीच्या वेळी जेव्हा कुत्रा रडतो तेव्हा त्याच्याभोवती एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते, असे म्हणतात. वाईट गोष्टीचा अंदाज आल्यानं कुत्रा जोरजोरात रडू लागतो.

इतर कुत्र्यांना सूचित –
जेव्हा कुत्रा मोठ्याने रडतो तेव्हा तो आसपासच्या परिसरात उपस्थित असलेल्या आपल्या सहकारी कुत्र्यांना त्याच्या आवाजाने त्याच्या उपस्थितीची आणि त्रासाची जाणीव करून देतो.

एकटे राहणे आवडत नाही –
जेव्हा कुत्र्यांना वेदना किंवा अस्वस्थता असते किंवा एकटे वाटत असते तेव्हा ते रडतात आणि आपल्या सहकारी कळपाला जवळ बोलावण्याचा प्रयत्न करतात, कारण कुत्र्यांना देखील माणसांसारखे एकटे राहणे आवडत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *