नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, आपल्या घरातील स्वयंपाक घर हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान असते. एकूण घरातील सर्वांसाठी ऊर्जा व पोषण देणारे अन्न मिळत असते. घरातील स्त्रियांचा जास्तीत जास्त काळ जात असतो. म्हणून स्वयंपाक घराचे वातावरण नेहमीच स्वच्छ व प्रसन्न असणे खूप आवश्यक आहे. स्वयंपाक घरात समूह एकत्र येत असतो. घरातील चांगल्या व वाईट कोणत्याही बाबींसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वयंपाक घराचा प्रभाव जरूर असतो.

स्वयंपाक घरातील चुकीच्या दिशेला असेल किंवा एखादी इतर कोणती वस्तू चुकीच्या दिशेला असेल तर, त्या गोष्टीचा संपूर्ण कुटुंबावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि कितीतरी प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. म्हणून स्वयंपाक घराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. स्वयंपाक घरात देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णा यांचे वास्तव्य असते. यांच्या कृपेमुळे घरात सुख समृद्धी येते आणि घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही.

स्वयंपाक घराची संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य संबंधित असते. स्वयंपाकघर अशी जागा आहे जेथे आपल्याला आरोग्य व तू स्वास्थ्याची प्राप्ती होते आणि निरोगी स्वास्थ्य हीच आपली खरी संपत्ती आहे. वास्तुशास्त्र घरात कोणती वस्तू ठेवावी? कोणती ठेवू नये? कोणते वस्तू कोण कोणती दिशा कोणत्या वस्तू साठी चांगली व आपल्यासाठी फायदेशीर आहे? या बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. घराविषयी वास्तुशास्त्रात संपूर्ण वर्णन आलेले आहे. म्हणून स्वयंपाक घराची रचना करताना त्या प्रमाणे आपल्या घराचे बांधकाम करावे.

म्हणजे स्वयंपाक घरातील सकारात्मक ऊर्जा संपूर्ण कुटुंबाला पोषण देण्यासाठी उपयुक्त ठरेल. म्हणूनच आजच्या या लेखातून आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेल्या स्वयंपाक घराविषयी च्या नियमांचे माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावे? स्वयंपाक घरामध्ये कोण कोणत्या वस्तू असाव्यात? कोणकोणत्या वस्तू नसाव्यात? त्याच बरोबर स्वयंपाक घरात घरातील महिला जेवण करताना तिचे तोंड कोणत्या दिशेला असावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर आग्नेय दिशेला म्हणजे पूर्व व दक्षिण दिशेच्या कोणात असावे. स्वयंपाक घरातील गॅसची शेगडी ही अग्नेय कोणातच असावी. अग्नेय दिशा हि अग्नीची दिशा मांनली जाते व म्हणून आपण गॅस अग्नेय कोणातच ठेवला तर, घरात आग लागणे, फटका बसणे असे प्रकार होत नाही. तसेच आग्नेय दिशेला बनवलेले अन्न शरीराला जास्त पोषक ऊर्जा प्रदान करते. स्वयंपाक घरात अन्नपूर्णा देवीचा फोटो जरूर लावावा. स्वयंपाकघर हे देवी अन्नपूर्णा चे स्थान असते.

म्हणून स्वयंपाक घरात पूर्व दिशेला देवी अन्नपूर्णेचा फोटो जरूर लावावा. अन्नपूर्णा चा फोटो घरात लावल्यास कधीही आपल्याला अन्नधान्याची कमतरता भासत नाही. घरात भांडण तंटे आणि वादविवाद होत नाही. त्याबरोबरच देवीच्या कृपेने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. स्वयंपाक घरात कोळ्याचे जाळे कधीही असू नये. असे म्हणतात ते घरात कोळ्याचे जाळे असले तर, घरात दारिद्र्य येते. तसेच घरातील व्यक्तींच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो.

कोळ्याचे जाळे असते अशा ठिकाणी देवी लक्ष्मी कधीच थांबत नाही. स्वयंपाक घरातील नळ हे टपकणारे असतील तर ते खूप अशुभ असते. असे म्हणतात की, पाणी म्हणजे जीवन व पाणी म्हणजे संपत्ती. आणि जर आपण अशाप्रकारे पाणी वाया घालत असलो तर, आपल्याकडे धन कसे काय टिकेल. घरातील नळ टपकणारे असतील तर जसे त्यातून पाणी वाया जाते. तसे आपल्या धनसंपत्ती तिची हानी होत राहते. आपला पैसा विनाकारण खर्च होतो. म्हणून जर आपल्या घरातील नळ असतील खराब झाल्या असतील तर ते त्वरित बदलावेत किंवा दुरुस्त करून घ्यावेत.

नळातून पाणी टपकणे हे आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे. यामुळे आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर वाईट प्रभाव पडतो व धनाच्या कामात अडथळे येतात. स्वयंपाक घरात जर आरशामध्ये अग्नीचे प्रतिबिंब दिसत असेल तर वास्तुशास्त्र हे अशुभ आहे. स्वयंपाक घर हे ऊर्जेचे भांडार असते आणि जर स्वयंपाक घरात आरसा असेल तर, या ऊर्जेचा प्रभाव दुप्पट होऊन जातो व आपल्या आरोग्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. म्हणून स्वयंपाक घरात कधीही आरसा ठेऊ नये.

स्वयंपाक घर हे नेहमी स्वच्छ ठेवावे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुटलेला तुटलेला वस्तू ठेवू नये. त्याचबरोबर स्वयंपाक घर रात्री झोपताना स्वच्छ करून झोपावे त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या आधी स्वयंपाक घराची साफसफाई करून मगच आपले काम करायला सुरुवात करावी. कारण रात्रभर यामध्ये त्या कट्ट्यावर किंवा स्वयंपाक घरात अनेक सूक्ष्मजीव पसरलेले असतात. त्याचबरोबर नकारात्मक शक्ती ही पसरलेले असते. म्हणून कधीही सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे करून पहिला स्वयंपाक घराची साफसफाई करावी. मगच आपले काम करण्यास सुरुवात करावी.

अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत. ज्या आपल्याला स्वयंपाक घराचे निगडित वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहेत आणि त्याचे पालन करणे हे आपल्यासाठी व आपल्या घरासाठी खूप फायदेशीर असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *