नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आपण पहात असतो की आपल्या भागांमध्ये किंवा आपण कोणत्या इतर भागांमध्ये गेलो तर, येतील कुत्रे आपल्या गाडीच्या मागे धावतात. त्यामागे आहेत शास्त्रीय कारणे अगदी पुरातन काळापासून सांगत आलेले आहेत. तेच कारण कोणते? व त्या बद्दल ची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

कुत्रा हा माणसाचा अतिशय विश्वासू प्राणी राहिला आहे. आपल्या इतिहासात डोकावून पाहिले तर, तसे स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात आणि आजच्या काळात तर प्रत्येक दुसर्‍या घरात एक तरी कुत्रा पाळलेला आपल्याला पाहायला मिळतो. कुत्रा पाळतात तर, कोणी घराच्या संरक्षणासाठी. अगदी सैन्यातही कुत्र्याचा मोलाचे स्थान आहे. एकंदरीत हा प्राणी आज प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो.

काहींना तो खूप आवडतो तर, काहींना त्याची प्रचंड भीती वाटते. काही लोक तर, कुत्र्यांचा खूपच तिटकारा करतात. विशेषत या भटक्या कुत्र्यांचा. जे कायम सायकल, मोटर सायकल, कार अशा वाहनांच्या विनाकारण मागे लागतात. तुम्हाला एकदा तरी याचा अनुभव आला असेलच. पण तुम्ही विचार केलाय का! की, कुत्री असं का करत असतील? त्याच्या मागे काही वैज्ञानिक कारण आहे. तेच आपणास पाहणार आहोत.

तर कुत्रे मागे लागणे मागे अनेक कारणे सांगितली जातात. प्रत्येक जण आपले अनुभव आणि अभ्यासातून तर्कवितर्क लावत असतो, पण या सर्वांमध्ये एक कारण ठळक आणि लॉजिकल वाटतं ते म्हणजे, कुत्रा हा प्राणी ज्या ठिकाणी ज्या परिसरात जन्माला येतो. जगतो अथवा लहानाचा मोठा होतो. त्या भागातील प्रत्येक गोष्ट त्याच्या ओळखीचे असते.

त्या भागात कोणी नवीन व्यक्ती किंवा एखादी गाडी त्यांच्या निदर्शनात आले की, त्यांना असुरक्षित वाटू लागतात. इमानदार पण हा जन्मजात गुण अंगी असल्यामुळे परिसरात राहतो त्या लोकांवर काही संकट येऊ नये या काळजीने कुत्रे वाहनांच्या मागे लागतात. त्याचबरोबर यामागे एक असेही कारण सांगितलं जातं की, श्वान आपला परिसर ठरवून घेतात. त्यांच्या परिसरात इतर कुठल्या भागातला दुसरा कुत्रा आला त्यांना आवडत नाही.

ठराविक परिसरावर त्यांचा हक्क आहे हे दाखवण्यासाठी ते गाड्यांच्या टायर्स वर, भिंतीवर झाडांवर, ठिकाणी लघुशंका करत असतात. याच वास घेऊन जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो. त्यामुळे त्या भागातील कुत्र्यांना आपल्या भागात कोणीतरी नवीन कुत्रा आला आहे अशी जाणीव होते. श्वसनशक्ती तीव्र असल्यामुळे ते लगू शंकेच्या वासाचा पाटला करत भुंकायला लागतात व आपल्या गाडीच्या मागे लागतात.

हा केवळ त्यांच्या दैनंदिन जीवनात ठरवलेल्या नियमांचे एक भाग असतो. अशाप्रकारे कुत्रे ही ईमानदार असतात. त्यामुळे ती आपल्या भागात राहणाऱ्या सर्वांचे रक्षण करत असतात आणि इतर कोणीही नवीन दिसल्यास त्यांच्या गाडी मागे धावण्यास सुरुवात करतात व त्यांचा पाठलाग करतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *