नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!देवाला नैवेद्य दाखविणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. मीठ हे मीपणाचे, अहंकाराचे नुसते प्रतीकच नाही तर आयुर्वेदिक गुणधर्माच्या दृष्टीने देखील खोलातून विचार झाल्यास आणि त्यावर संशोधन केल्यास अहंकाराचे मूळ त्यात आहे.

निदान तो अहंकार भगवंतापुढे मांडू नये हा विचार त्यात आहे. याचा अर्थ रोजच्या आहारात मीठ कमी करायचे असा नाही, अन्नात शिजवलेले योग्य प्रमाणातले मीठ आवश्य क आहे आणि ते नैवेद्याच्या पदार्थात असतेच, फक्त वरून मीठ, न शिजवता खाऊ नये असे आयुर्वेद देखील सांगते.

मग एखाद्या पदार्थाला मीठच टाकले गेले नसल्यास शक्य असेल तर मीठ टाकून शिजवून घ्या. जे पातळ, पाणी असलेल्या गोष्टींसाठी शक्य आहे.

पण खिचडी, पोहे, फोडभाजी यामध्ये शक्य नसते, मग असे पदार्थ लोणच्या बरोबर खावेत, किंवा बेचव खाण्या ची सवय लावावी. शेवटी जिभेचे चोचले कमी करणे हाही एक अभ्यासच आहे.

प. पू. थोरले महाराज भिक्षेत मिळेल ते सारे अन्न एकत्र करून, आपल्या एकमेव वस्त्रात घालून नर्मदेच्या पाण्यात चांगले बुडवायचे आणि मग त्याचे तीन भाग करून त्यात ला एक भाग खायचे.

आपण त्यांचे उदाहरण नुसता अर्थ समजण्यास घेतला तरी पुष्कळ झाले, कारण त्यांनी श्रीगुरुचरित्र जगले आहे, आपण त्यांचे आचरण करूच शकत नाही.

नर्मदेची प्रदक्षिणा त्या काळी करण्यामागे चतुष्ट्याचा विचार होता. अंतःकरण चतुष्ट्य (मन, बुद्धी, चित्त, अहंकार), पुरुषार्थ चतुष्ट्य (धर्म, अर्थ, काम, मोक्ष), अवस्था चतुष्ट्य (जागृती, स्वप्न, सुषुप्ती, उन्मनी-तुरिया), साधन चतुष्ट्य (संतोष, शील, नैतिकता आणि जागृत महापुरुष), साधन-चतुष्ट्य (विवेक, वैराग्य, शमदमादि षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व).

गीतेत भगवान म्हणतात कि असे आत्मस्थित महापुरुष ‘वेद, यज्ञ, दान आणि तप’ – या चतुर्विध कर्मफलांवर अतिक्रमण करतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *