नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो काही गोष्टी अशा असतात की काही पदार्थ खाल्ल्यानंतर दुसरे काही पदार्थ खाल्ल्याने त्याचे वाईट परिणाम होत असतात. हे आपल्याला माहिती नसते. मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे अन्न भात आणि मासे हे आहे. कारण पृथ्वीचा 70% भाग पाणी आहे आणि बहुतेक देश समुद्राजवळ आहेत आणि म्हणूनच जगातील बहुतेक लोकांच्या आहारात माशांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

मांसाहारी लोकांना तर मासे आवडतच असतात आणि मासे खाण्याचे अनेक मोठे फायदे सुद्धा आहेत आणि मासे खाल्ल्याने तुम्हाला भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे तसेच ओमेगा ३ सुद्धा मिळतात. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर, त्यामधे ओमेगा ३ फॅटी ॲसिड हे खूप जास्त प्रमाणात उपयुक्त आहे, त्यामुळे मासे खाणे हे अतिशय फायदेशीर ठरत आहे.

केसांसोबतच डोळ्यांच्या होणाऱ्या काही अनेक आजारांवरही मासे अतिशय फायदेशीर आहेत. म्हणूनच मासे खाणे ही गोष्ट सगळ्यांसाठीच आवश्यक आहे.
पण ही गोष्टपण लक्षात ठेवायला हवी आहे की, मासे खाल्ल्यानंतर काही पदार्थ असे असतात, ज्याचे आपण न खाण्यासाठी काटेकोरपणे पालन केले पाहिजे. अन्यथा त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो, आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला सुद्धा धो-का निर्माण होऊ शकतो. तुमच्या आमच्या पूर्वजांनी तुम्हाला आम्हाला हे अन्न खाण्यास मनाई केली आहे.

यावर शास्त्रज्ञांचा विश्वास नाही असे नाही. आणि नेमके याचे दुष्परिणाम हे आपल्याला दिसून येतातच. चला तर मग जाणून घेऊया, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मासे खाल्ल्यानंतर किंवा मासे खाण्यापूर्वी कधीही खाऊ नयेत. तर सर्वात पहिला पदार्थ म्हणजे दूध. मित्रांनो जेवणानंतर म्हणजेच मांसाहार केल्यानंतर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत. हे तुम्ही तुमच्या पू र्वजांकडून ऐकले असेलच. म्हणूनच मासे खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नका.

कारण, मासे हे गरम आणि दूध हे थंड असते, त्यामुळे जेव्हाही आपण मासे खाल्ल्यानंतर दूध पितो. तेव्हा मासे आणि दुधात रासायनिक क्रिया होत असते, आणि त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होताना दिसून येतो. यामुळे त्वचेवर पुरळ उठणे आणि अश्याच प्रकारचे बरेच काही होऊ शकते. हेच कारण आहे की, आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे अन्न खाण्यापासून मनाई केली आहे.आणि म्हणून आपण यात कोणतीही जोखीम घेऊ नये, आणि ह्या प्रकारच्या अन्नाचे सेवन करणे, हे आपण कटाक्षाने टाळायला पाहिजे. तसेच या त्वचेच्या आजाराला विटीलगो असे देखील म्हणतात.

परंतु मित्रांनो असे असले तरी, असे बरेच जण आहेत ज्यांच्या मनामधे या आजाराबद्दल खूप भीती बसलेली आहे. पण हा प्रसार काही संसर्गजन्य नाही आणि हा आजार पसरत सुद्धा नाही. म्हणून ज्यांना हा आजार आहे आणि त्यांची कदर करायला पाहिजे आणि त्याबद्दल कोणतेही गैरसमज करून घेऊन घाबरू नका. त्यामुळे मासे खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये. आता प्रश्न असा आहे की, हे पदार्थ खाण्यात आणि त्यांच्यात अंतर किती असावे, मग ज्या दिवशी मासे खाल्ले त्या दिवशी तुम्ही चुकूनही दूध पिऊ नका आणि जर रात्री मासे खाल्ले तर, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तुम्ही दूध पिऊ नका.

कारण जोपर्यंत मासे शरीरात पूर्णपणे पचत नाहीत. तोपर्यंत तुम्ही दुधाला हात लावू नये. तसेच दही आणि ताक यांचे सुद्धा सेवन करू नका, कारण दही आणि ताक हे दुधापासून बनवले जाणारे पदार्थ आहेत आणि ते थंड सुद्धा असतात. यामुळे याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. कारण दह्याचा प्रभाव हा थंड असतो आणि माश्यांचा प्रभाव हा गरम असतो.आणि जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे पदार्थ एकच वेळी खात असतो, त्यावेळी आपल्या शरीरात दोन भिन्न पदार्थांची रासायनिक प्रक्रिया ही सुरू होत असते आणि या गोष्टीचा म्हणजेच शरीरात होणाऱ्या या प्रक्रियांचा आपल्या शरीरावर विपरित असा परिणाम होत असल्याचा आपल्याला दिसून येत असतो. आणि त्याच बरोबर या गोष्टीचा आपल्या श-रीरातील अन्न पचनावर देखील परिणाम होत असतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *