नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, आपण बघतो की एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी आतोनात काबाड कष्ट करत असते. परंतू इतकी मेहनत करुनही ती व्यक्ती घरातील सदस्यांच्या सर्वच इच्छा पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरते.

खरं तर अशी परिस्थिती तयार होण्यासाठी आपल्या जन्मकुंडलीतील ग्रह व नक्षत्रांची कमकुवत स्थिती कारणीभूत ठरते. त्यांची कुंडलीत असलेली ग्रहदशा ही आपल्याला आर्थिकदृष्ट्या बळकट किंवा सक्षम होऊ देत नसते.

आपल्या हातामध्ये पैसा आला तरी तो टिकत नाही. त्या व्यक्ती पैशांअभावी अगदी दयनिय अवस्था होऊन जाते. तर मित्रांनो, अशा काही समस्येंचा सामना करण्यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये काही खात्रीशीर उपाय सांगितलेले आहेत. त्या उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तुमची पर्स राहील नेहमीच पैशांनी भरलेली.
पैशांच्या चणचण भासणार नाही. पैशांच्या अनेक अडचणीपासून मुक्त होण्यासाठी शास्त्रात सुस्पष्ट असे उपाय सांगण्यात आलेले आहेत.

कुणीही या उपाययोजनांचा अवलंब केल्याने खर्चावर नियंत्रण येते तसेच घेतलेले कर्जदेखील आटोक्यात येते.

श्रीमंती आणि संपत्तीची कीर्तीची अपेक्षा कोण ठेवत नाही..??? जवळ जवळ सर्वांनाच या तिनही गोष्टी हव्या असतात. परंतु आपल्या जन्मकुंडलीतील ग्रह व नक्षत्रांची वाईट स्थिती काही व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ देत नाही. परिणामी, पैसा आला तरी तो हातात राहत नाही.

अशा अनेक समस्येंचा सामना करण्यासाठी शास्त्रात काही निश्चित उपाय सांगितले गेले आहेत जेणेकरून आपल्याकडे कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी कायम राहील. आपली तिजोरी नेहमीच पैशांनी भरलेली राहील. त्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करायला हव्यात हे आपण आता बघूयात..

1) लाल रंगाचा कागद – हा एक खात्रीशीर पर्यायांपैकी एक आहे. यासाठी तुम्हाला एक फक्त लाल कागदाची गरज आहे. एक लाल कागद घेऊन आपली इच्छा त्या कागदावर लिहा, आणि त्या कागदाची वळकटी करुन रेशीम धाग्यात बांधून ती वळकटी पर्समध्ये ठेवा. असे केल्याने तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील.

2) तांदूळ – आपल्या शास्त्रांमध्ये धान्य आणि पैसा हे दोन्ही समान असल्याचे सांगितले गेले आहे. जर आपण आपल्या पर्समध्ये केवळ एक चिमूटभर तांदूळ ठेवलेत तर तसे केल्याने आपला होणारा विणाकारण खर्च आटोक्यात येतो आणि आपल्याला पैशांची कमतरता भासू देत नाही.

3) धनाची देवता माता लक्ष्मींची प्रतिमा – माता लक्ष्मींचे चित्र किंवा फोटो आपल्या पर्समध्ये ठेवावा जो की त्यात त्या बसलेल्या मुद्रेत असायला हव्यात असे चित्र ठेवा. या उपायाने आपणास कधीही पैशांची कमतरता जाणवणार नाही.

4) पिंपळ पान – पिंपळाचे किंवा तुळशीचे पन हे दोन्ही आपल्या हिंदू धर्मात पूजनिय आहेत हे आपल्याला माहिती आहेच. तसेच वास्तुशास्त्रात सुद्धा असे सांगितले गेले आहे की पिंपळाची पाने पर्समध्ये नेहमीच ठेवायला पाहिजेत.

पिंपळाची पाने एका शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित करुन ती आपल्या पर्समध्ये नोटांसोबत शुभ वेळेत ठेवली पाहिजेत. या उपायाने देखील आपली पर्स नेहमीच पैशांनी भरलेली असेल, गरज पडल्यावर सुद्धा कधीही आर्थिक अडचण भासणार नाही.

5) चांदीची नाणी – जर तुमच्याकडे चांदीची नाणी असतील तर ती पर्समध्ये ठेवल्याने सुद्धा आपल्याला धनलाभ होत असतो. फक्त हे लक्षात ठेवा की सोन्याची किंवा चांदीची नाणी पर्समध्ये ठेवण्यापूर्वी ती आपल्या घरातील देवघरात देवी लक्ष्मींच्या चरणी ठेवावी त्यानंतरच ती आपल्या पर्समध्ये ठेवावी. या उपायाने आ’र्थिक बाजू मजबूत व्हायला सुद्धा मदत होते.

6) काचेचा एखादा तुकडा किंवा चाकू – ज्योतिष शास्त्रानुसार आपण एखादा काचेचा तुकडा किंवा छोटासा चाकू आपल्या पर्समध्ये ठेवावा. हा उपाय देखील आपली संपत्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. याव्यतिरिक्त तुम्ही गोमती चक्र सुद्धा आपल्या पर्समध्ये ठेवू शकतात.

7) रुद्राक्ष – रुद्राक्ष आपल्या पर्स मध्ये ठेवल्यास आपली गरीबी दूर होते तसेच संपत्तीमध्ये देखील वाढ होते. हाच उपाय आपण घराच्या तिजोरीच्या बाबतीत सुद्धा वापरात आणू शकतात किंवा तिजोरी नसेल तर तुम्ही कपाटात रुद्राक्ष ठेवला तरीही चालेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *