नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!उंदीर ही गणपतीची स्वारी मानली जाते. म्हणूनच ते धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जातात. काही मंदिरांमध्ये उंदरांची नियमित पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य पण दाखवला जातो. पण घरात उंदीर येणे हे चांगले लक्षण आहे का? घरात उंदीर येण्याबद्दल शकुन शास्त्र काय सांगते, चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

उंदरांनी घरात बिळ बनवले तर
उंदीर हे गणपतीचे वाहन मानले जात असले तरी ते जर तुमच्या घरात शिरले आणि बिळात राहू लागले तर ते तुमच्या भविष्यासाठी खूप अशुभ लक्षण आहे. असे मानले जाते की, तुमचे शत्रू सक्रिय झाले आहेत आणि ते तुमच्या विरोधात मोठे कट रचू शकतात. अशा स्थितीत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेतली पाहिजे.

उंदरांची संख्या वाढली तर
जर अचानक तुमच्या घरात उंदरांची संख्या वाढू लागली आणि घरात फिरताना तुम्हाला उंदीर दिसायला लागले तर समजा लवकरच मोठे नुकसान होणार आहे. असे मानले जाते की, घरात उंदीर वारंवार दिसणे हे गरिबीचे लक्षण आहे. जर उंदीर कुरतडत असतील तर समजा लवकरच तुम्हाला काही वाईट बातमी ऐकायला मिळू शकते. अशा स्थितीत प्रत्येक काम काळजीपूर्वक करावे.

चिचुंद्री दिसल्यास
जर तुमच्या घरात चिचुंद्री दिसल्यास ते धनाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. चिचुंद्री दिसायला उंदरासारखीच असते, पण आकाराने ती थोडी लांब असते. घरात असे उंदीर दिसणे चांगले मानले जाते. जर तुम्हाला घरात चिंचुंद्री दिसली तर तुम्हाला लवकरच पैसे मिळतील आणि लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

उंदरांना पळवण्यासाठी करा हे उपाय
जर तुमच्या घरात उंदीर किंवा चिचुंद्री असेल तर तुम्ही त्यांना मारू नका, परंतु त्यांना हाकलण्याचा प्रयत्न करा. त्यांना मारणे हे चुकीचे आहे, त्यांना मारण्यापेक्षा त्यांना पिंजऱ्यात पकडून घराबाहेर सोडावे. यासाठी बाजारात उपलब्ध असलेले पर्याय बघावेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *