नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आता तुम्ही देखील तुम्हाला आलेले स्वामी महाराजांचे अनुभव आम्हाला पेजला मेसेज करून सांगू शकता. तुमच्या अनुभवाला शब्द देण्याचे सौभाग्य मला स्वामींमुळे लाभले. आज तुमचे अनुभव सातासमुद्रापार जात आहेत.

“स्वामी म्हणजे विश्वास, स्वामी म्हणजे माझा श्वास, स्वामी म्हणजे विशाल आकाश, स्वामी नाम आहेच मुळी खास…!” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती पनवेल येथे राहणाऱ्या शुभांगीताई यांना नुकतीच कोरोनाच्या काळात येऊन गेली. तर पुढील अनुभव पाहूया शुभांगीताई यांच्या शब्दात.

मी शुभांगी, राहणार पनवेल. 24 मार्च 2020 ला मला थोडी सर्दी झाली आणि संध्याकाळपर्यंत वास येणे देखील बंद झाले, कुठल्याही अन्नाची चव लागत नव्हती. मला व माझ्या सर्व कुटुंबीयांना मला कोरोना असल्याची शंका आली. म्हणून मी कुटुंबीयांमध्ये जास्त न मिसळता समोर असलेल्या माझ्या मैत्रिणीच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. माझ्या घरचे माझी काळजी घेत होते. 26-27 तारखेला मला बराच ताप आला. मी खूप घाबरून गेले होते. परंतु माझा स्वामींवर विश्वास असल्यामुळे मी सर्वकाही स्वामींवर सोपवून दिले.

29 तारखेपासून मला वास आणि चव परत आली. मात्र वीकनेस खूप होता. त्यादरम्यान नवऱ्याला व मुलाला 101 ताप आला. सासुबाई तर झोपूनच होत्या. काय होतंय हे त्याला काहीच कळत नव्हतं. डबा बाहेरून लावला होता. एक तारखेला सगळ्यांच्या टेस्ट केल्या. त्यात मी negative आले पण मात्र माझं सर्व कुटुंबीय पॉझिटिव आले.

मला तर पूर्ण घरच डोळ्यापुढे फिरल्यासारखे झाले. कारण माझ्या मिस्टरांना अस्थमा आहे व सासुबाईंचे वय झालेले आहे. त्यात त्याला बीपीचा देखील त्रास आहे. त्या खूप जास्त घाबरलेल्या वाटत होते. पण मला मात्र खचून चालणार नव्हतं. आता मलाच उभं राहायचं होतं. स्वामी कृपेने मी एकटी निगेटिव्ह होते. कारण सर्वांची काळजी मला घ्यावी लागणार होती. मलाच आता सगळ्यांना उभ करायचं होतं. पुढे मला फक्त स्वामी दिसत होते. त्यांचाच मला आधार होता.

मी स्वामी सेवा सुरू केली. माझ्या नवऱ्याला व मुलाला समोरच्या फ्लॅटमधे शिफ्ट केले. आणि मी सासुबाई जवळ घरी थांबले. कारण सासूबाईला मानसिक धीर देणे आवश्यक होते. डॉक्टर आमच्या खालच्या फ्लॅटमध्ये राहतात. त्याच्या सल्ल्यानेच औषधे सुरू केली. सगळ्यांना सिटीस्कॅन करायला घेऊन गेले. सासुबाईचा स्कोर चांगला नव्हता. सतत एक तासाचा गजर लावून मी सासूबाईला तपासत होते. त्यांची ऑक्सिजन लेवल चेक करत होते. त्यात दोन रात्री सासुबाई असंबंध बोलत होत्या.

मी खूप घाबरून गेले. हे सगळं हँडल करणं मला फार मुश्कील झालं. ॲडमिट करावं लागेल असा देखील विचार आला. मात्र हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं मुश्किल होतं. आता माझ्याकडे एकच शेवटचा पर्याय होता. तो म्हणजे स्वामी. माझे स्वामी महाराज. स्वामीला साकड घातलं स्वामी बघा तुम्ही मी सर्वकाही तुमच्यावर सोपवते आहे. मला सगळे हवे आहेत. माझ्या कुणालाही त्रास होऊ देऊ नका. त्याच रात्री सासूबाईंच्या स्वप्नात स्वामी महाराज आले. मला हा फार शुभ संकेत वाटला. म्हणून मी दुसऱ्या दिवशी स्वामींच्या आवडीची पुरणपोळी केली. स्वामी चरित्राचे सारामृत वाचले. आणि नैवेद्य दाखवला.

त्या दिवसापासून झपाट्याने सगळ्यांची प्रकृती सुधारली. आणि आज आम्ही पूर्णपणे कोविड पासून मुक्त आहोत. आणि तेही घरी उपचार करून, तेव्हा मात्र एक गोष्ट मनात पक्की झाली. स्वामी शिवाय दुसरा कोणी मोठा डॉक्टर नाही.
श्री स्वामी समर्थ!!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *