नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वामींनी सांगितलेत पाच नियम. तुम्ही पाच नियम संपूर्ण ऐका. ते ऐकून सोडू नका. ते आपल्या जीवनात आमलात आणा. स्वामींनी सांगितलेले पाच नियम जर तुम्ही आमलात आणले तर तुमचे आयुष्य सुखी होईल. आणि आनंदी सुद्धा होईल.

स्वामी सांगतात त्यांचा पहिला नियम कधीही स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका. मी असाच का आहे? तसा का नाही? त्याला सगळ मिळत मला का नाही? भक्त हो स्वामींनी तुम्हाला वेगळे बनवले आहे. सगळ्यांसारखे नाही. स्वामींनी तुम्हाला खूप काही दिले त्याबद्दल सुखी रहा. आणि दुसऱ्याशी तुलना कधीच करू नका. असा आहे स्वामींचा पहिला नियम.

आता भक्त हो स्वामींचा दुसरा नियम जास्त विचार करत बसणे बंद करा. माझं काय होईल? उद्या काय होईल? याचे काय होईल? हे विचार करत बसणे बंद करा. विचार करून काय होते फक्त आपले शरीर खराब होते. बीपी, शुगरचा त्रास सुरू होतो. जर तुम्हाला सुखी राहायचे आहे तर विचार करणे बंद करा. विचार अजिबात करू नका. आनंदी रहा सुखी रहा.

आता स्वामींचा तिसरा नियम म्हणजे भूतकाळातील नको त्या गोष्टींचा विचार करणे आजच टाळा. काल काय झालं आहे भूतकाळात? काय होऊन गेले आहे? ते का आठवता? झालं ते झालं तुम्ही फक्त आजमध्ये रहा. तुम्ही गेलेल्या गोष्टी आठवू नका.

येणाऱ्या गोष्टींचा विचार करू नका. फक्त आज काय सुरू आहे त्यामध्ये रहा. येणारे पाच मिनिट येणारा पुढचा वेळ कोणीच बघितला नाही. काय होईल कोणी सांगत नाही म्हणून भक्त हो मागे गेलेल्या गोष्टी पुढे येणाऱ्या गोष्टी काहीच मनात येऊन देऊ नका. फक्त आजमध्ये रहा.

चौथा नियम दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याबद्दल विचार करू नका. बरेच लोक आपल्याबद्दल खूप काही बोलत असतात ते मित्र नातेवाईक असतील आजूबाजूचे लोक असतील आपल्या ऑफिसमधील असतील बरेच लोक असतात. आपल्या पाठीमागे आपल्याच गोष्टी बोलत असतात.
आपल्याला त्या कळत असतात की हा असा बोलला आपल्याबद्दल किंवा तो तसा बोलला आपल्याबद्दल पण भक्त हो दुसरे आपल्याबद्दल काय बोलतात याच्याशी आपल्याला काय देणे घेणे. आपण आपल्या आयुष्यात बघायला पाहिजे. दुसरे काय बोलतात ते बोलू द्या. कारण वर बसलेले स्वामी आपल्या आजूबाूला बसलेले परमात्मा यांना सर्व माहीत असते.

भक्त हो आता पाचवा नियम अत्यंत महत्वाचा नियम. आनंदी रहा. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा. घरातल्या लोकांमध्ये आनंद शोधा. तुमच्या घरातील आई वडील, बहिण भाऊ, बायको मुलं यामध्येच आनंद आहे. भक्त हो मित्र परिवारमध्ये आनंद आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *