नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते. आपण नित्यनेमाने या देवघरामध्ये देवपूजा करीत असतो. अनेक प्रकारचे मंत्र जप, पूजा आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतो. बरेच जण उपवास, व्रत करीत असतात. तर मित्रांनो आपण देवपूजा करून झाल्यानंतर आपण देवी देवतांना नैवेद्य देखील अर्पण करीत असतो. मग हा नैवेद्य गुळ साखरेचा असो, दूध साखरेचा असू दे, खीर असू दे किंवा कोणत्याही गोड पदार्थाचा आपण नैवेद्य दाखवत असतो.

तर मित्रांनो आपण ज्यावेळेस व्रत, उपवास करीत असतो त्या दिवशी मित्रांनो मांसाहार किंवा अंडी किंवा कांदा लसणाचे पदार्थ अजिबात खाऊ नये. जर तुम्ही कांदा लसूण यांसारखे पदार्थ जर खाल्ले तर यामुळे आपण जो काही उपवास केलेला आहे हा उपवास देवांपर्यंत पोहोचत नाही.

तर मित्रांनो आपण घरातील देवपूजा करतो ही देवपूजा जर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठून सकाळी लवकर आपली देवपूजा जर केली तर यामुळे तुम्हाला पूजेचे शुभ फल प्राप्त होते. बरेचजण हे 10 किंवा 11 च्या दरम्यान देवपूजा करतात. मग त्याचा परिणाम देखील आपणाला आपल्या जीवनावर तितकाच दिसून येतो. म्हणजेच त्याचे फळ आपणाला तितकेच मिळते.

आपण ज्याप्रमाणे आपले दैनंदिन काम करीत असतो म्हणजेच आपणाला यावेळेस चहा लागतो किंवा यावेळेस जेवण लागते त्याप्रमाणेच तुम्ही तुमची देवपूजा देखील योग्य त्या ठराविक वेळेला करावी. बऱ्याच जणांना ब्रह्म मुहूर्तावर देवपूजा करणे शक्य नसते तर अशा लोकांनी सकाळच्या वेळेस तरी म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही प्रसन्न आहात त्यावेळेस तुम्ही ही देवपूजा आटोपून घ्यायची आहे.

तसेच मित्रांनो देवपूजा करीत असताना तुम्ही ज्यावेळी देवी देवतांना स्नान घालित असता त्यावेळेस तुम्ही आपल्या देवघरातील घंटी वाजवायची आहे. तसेच ज्यावेळेस तुम्ही धूप, अगरबत्ती देवी देवतांना ओवाळीत असता त्यावेळेस देखील तुम्हाला घंटी वाजवायचे आहे जेणे करून तुम्हाला देवपूजेचे चांगले फळ मिळणार आहे.

तर मित्रांनो नैवेद्य दाखवल्यानंतर आपणाला जे काम करायचे आहे ते काम नेमके कोणते आहे हे आपण जाणून घेऊयातमित्रांनो आपण प्रत्येक जणच देवपूजा झाल्यानंतर जो असेल घरातील पदार्थ तो नैवेद्य म्हणून देवी देवतांना दाखवीत असतो. बरेच जण देवाला नैवेद्य दाखवतात आणि तो लगेचच अर्पण करतात.

परंतु मित्रांनो असे न करता तुम्ही तो नैवेद्य थोडा वेळ देवी देवतांसमोर ठेवायचा आहे आणि नंतर थोडा वेळ झाल्यानंतर हा नैवेद्य कुटुंबातील सर्वांनीच हा नैवेद्य वाटून खायचा आहेहा नैवेद्य सगळ्यांनी वाटून खाल्ला तर यामुळे आपल्या घरातमध्ये एकोपा राहण्यास मदत होते म्हणजे ज्या काही भांडण तंटे, कटकटी असतील तर त्या सर्व दूर निघून जातील.

म्हणजेच मित्रांनो कधीही देवपूजा झाल्यानंतर जो काही आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवीत असतो तो लगेचच आपण ग्रहण करायचा नाही. तर तो थोडा वेळ तसाच देवी देवतांसमोर ठेवायचा आहे आणि थोडा वेळ झाल्यानंतरच तो कुटुंबातील सर्व सदस्यांनी खायचा आहे. यामुळे आपल्याला देवपूजेचे शुभ फल प्राप्त होते. आपली देवपूजा ही सफल होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *