नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वामी समर्थ महाराजांना या 5 गोष्टी अगदी मनापासून आवडतात आणि जो व्यक्ती या गोष्टी पाळतो, या गोष्टी आचरणात आणतो तर स्वामी त्याला लवकर भेटतात, त्याचे सर्व सं क ट हरते.त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर या गोष्टी तुम्हीही आचरणात आणा. स्वामींची आपल्यावर कृपा होईल. लवकरात लवकर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर त्या 5 गोष्टी कोणत्या ते जाणून घेवू.

१. स्वामींची सगुण उपासना:-

मनापासून, मनोभावे, पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अतिशय प्रिय आहे. अशा सगुण उपासनेला आणि सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होवून भक्ताची सर्व इच्छा पूर्ण करतात.

२. अन्नदान करणे:-

अन्नदान करणे म्हणजे सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. हे सगळ्यानाच माहिती आहे. लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्यातरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात की त्यांचे त्यांना फळ मिळावे,पण हे अंत्यत चुकीचे आहे. अन्नदान गरीब व्यक्तीला दररोज करायला हवे. निदान एक चपाती किंवा एक भाकरी जे असेल ते आपण एका गरीबाला नक्कीच देवू शकतो. ही गोष्ट स्वामी समर्थांना अतिशय प्रिय आहे.

३. स्वामींचे नामस्मरण:-

सगळयांना माहिती आहे “श्री स्वामी समर्थ” या मंत्रात या नामात किती च म त्का री शक्ती आहे. या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होवून आपल्या भक्तांचे सर्व सं क टे हरतात आणि सगळ्या इच्छा पूर्ण करतात.

४. माणूस जोडण्याची हौस:-

माणूस जोडण्याची हौस म्हणजे जनप्रियता. प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे, मोठ्यांचा आदर करणे, सगळयांना प्रेम करणे, कोणाचाही ति र स्का र न करणे या गोष्टी जो कोणी पाळतो त्या व्यक्तीवर स्वामी नक्कीच प्रसन्न होतात.

५. जी परिस्थिती असेल त्यात समाधान मानावे:-

म्हणजेच आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंदात राहायचे. जास्तीचे मागायचे नाही, जे आहे त्यावर रडायचे नाही. जे दिले आहे ते देवाने दिले आहे आणि आपण त्यातच आनंदात राहून आपले जीवन जगायचे.

तर मित्रांनो या पाच गोष्टी आहेत. या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्या आचरणात आणाव्यात. या गोष्टी आचरणात आल्या की स्वमी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होतातच.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *