नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो, जेव्हा स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आले. तेव्हा ते चोळप्पा यांना भेटले. त्यांच्या सानिध्यात आपले सर्व दिवस घालवले. स्वामींची वेगवेगळ्या लीला पाहून त्यांची स्वामिभक्ती दृढ होत गेली. स्वामींच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या अनेक स्वामी लिलेचा अनुभव आले होते.

स्वामींची शक्ती त्यांना जाणवली होती. स्वामी कोणी सामान्य व्यक्ती नाही. याची समज देखील त्यांना आलेली होती. एके दिवशी स्वामी जात होते. त्यांच्या मागे सर्वजण जात होते. त्यामध्ये चोळप्पा देखील होते. त्यावर स्वामींनी त्या सर्वांना सांगितले की, “अरे मी संन्यासी आहे! माझ्या नादी लागू नका! जा तुमचा प्रपंच पहा.” यावर अनेक जण मागे फिरले.

परंतु चोळप्पा काही मागे केले नाही. ते त्यांच्या मागेच जाऊ लागले. परत स्वामी सर्वांना शिवा देऊ लागले. यावर सर्वजण मागे परतले. परंतु चोळप्पा काही मागे परतले नाही. त्यावर स्वामीनी त्याला प्रश्न केला, “तू मागे जाणार आहेस की, नाहीस.” त्यावर चोळप्पा बोलले, “मी संसार सोडेल परंतु तुमचे चरण कधीही सोडणार नाही!” त्यावर स्वामींच्या प्रेमभावना प्रकट झाली.

त्यांनी आपल्या पादुका दिला आणि सांगितले, “जा याचा सांभाळ कर! मी तुझ्या सदेव पाठीशी राहीन!” त्यावर त्या पादुका घरी आणून त्यांची रोज पूजा अर्चना चालू केली. अनेक लोकांना स्वप्नामध्ये दृष्टांत पडू लागले की, चोळप्पाच्या घरी स्वामी महाराजांचे पादुका आहेत. यावरून आपल्याला असे कळते की, स्वामींची भक्ती केल्याने ती कधीही निष्फळ ठरत नाही.

त्याचे आपल्याला काही ना काही फळ मिळत असते. फक्त आपली भक्ती दृढ असायला हवी. त्यांच्यावर विश्वास आपला असायला हवा आणि आपल्या भक्तीमध्ये प्रेमभाव असणे देखील गरजेचे आहे. भक्ति जर खरी असेल तर, त्याचे फळ हे आपल्याला चांगलेच मिळते. स्वामी महाराज आपल्या सदैव पाठीशी उभे राहतात. म्हणून स्वामींची मनोभावाने व भक्तीने भक्ती करावी.

स्वामी आपल्याला कधीही संकटामध्ये एकटे सोडत नाही. या लिलेत चोळप्पा कडून घेण्यासारखे अनेक गुण आहेत. चोळप्पा आपला संसार सोडायचे ठरवले. खरे स्वामी महाराजांची भक्ती कधीही सोडणार नाही असे सांगितले. त्यामध्ये त्यांची भक्ती ही खरी होती. मनापासून होती. आणि त्या भक्तीमध्ये प्रेम देखिल होते.

म्हणून त्यांना त्यांचे फळ मिळाले. स्वामी त्यांच्या सदैव पाठीशी उभी राहिली. पादुका च्या रुपाने स्वामी महाराज आपल्या भक्ताच्या मागे व आपल्या घरात त्यांच्या सदैव सोबत राहिली.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *