नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ आज मी आपणास स्वामींची साधी-सोपी प्रभावी अशी सेवा सांगणार आहे ही सेवा अशा लोकांसाठी आहे ज्यांना रोज स्वामींची नित्य सेवा किंवा स्वामी चरित्र अध्याय क्रमांक 3 जप करायला शक्य होत नाही मला माहित आहे तुमची स्वामींवर नितांत श्रद्धा आहे पण या धकाधकीत व धावपळीत स्वामींची सेवा करण्यासाठी हवा तितका वेळ देता येत नाही

तसेच स्वामींचे बरेचसे सेवेकरी आहेत ज्यांना लिहिता वाचता देखील येत नाही म्हणून आज मी आपणास स्वामींची साधी सोपी आणि तितकीच प्रभावी अशी ती सर्वांनाच करता येईल ती आज सांगणार आहे. सेवेकर्‍यांनी झोपण्यापूर्वी म्हणजे जेवण झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्ती समोर अगरबत्ती लावून घ्यावी. अगरबत्ती लावून घेतल्यानंतर स्वामींना तुमची समस्या सांगा तुम्ही सेवा कशासाठी करत आहात आधी तुम्हाला काय पाहिजे आणि ही सेवा कशासाठी आहे हे सर्व तुम्ही स्वामींना सांगा सर्व मनापासून बोला स्वामींना सांगताना अर्धवट काही ठेवू नका

मनमोकळेपणाने तुमची समस्या मांडा. मग तुमची समस्या सांगितल्या नंतर अगरबत्तीपूर्ण जळे पर्यंत अथवा 20 मिनिटांपर्यंत डोळे मिटून श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा हा मंत्र जप करताना घाई घाईमध्ये स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं करू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा पूर्ण बोला मंत्र जप करताना शांततेमध्ये करावा घाई करू नये

मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर जी रक्षा पडेल ती करंगळी शेजारी बोटाने म्हणजेच अनामिकेने बोटाने उतरती लावावी मग त्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या कपाळी हे रक्षा लावा. त्यानंतर घरातील धनधान्य आणि खाण्यापिण्यात ही रक्षा मिसळून त्याचा वापर करावा आणि हा सेवेचा तुम्हाला लवकरच चांगलं फायदा होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *