नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी एक लीला बघणार आहोत, ज्या मध्ये स्वामिनी हाडांच्या ढिगारा पासून सोने करून दाखवले. म्हणतात, पूर्वी अक्कलकोट मध्ये एक तरुण मारवाडी मुलगा स्वामीच्या दर्शनासाठी आला होता. स्वामी लीलांचे श्रवण केल्याने तो खूपच भारावून गेला आणि तेथेच अक्कलकोट मध्ये स्वामीच्या सानिध्यात सेवा करू लागला. सेवा सुरू असताना त्याच्या घरच्यांनी अनेक वेळा त्याला पत्र पाठवले पण तो काही घरी जाण्यास तयार होत नव्हता. त्याचे मन स्वामी चरणी इतके रमले होते की त्याला त्याच्या चरणांपासून दूर जावे असे वाटतच नव्हते. आता त्याला अक्कलकोट मध्ये 3 वर्ष पूर्ण झाली होती. शेवटी त्या ची घरची सगळी मंडळी त्याचे वडील आणि चुलते वगैरे त्याला घेण्यासाठी अक्कलकोट मध्ये आले. पण तरीही त्याची काही घरी येण्याची इच्छा होत नव्हती.

सर्वांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही एक तच नव्हता. शेवटी त्याच्या घरच्या मंडळींनी सोळप्पाकडे जाण्याचा निर्णय घेतला. सोळप्पापाकडे जाऊन.सोळप्पाला सर्व वृत्तांत सांगितला आणि स्वामी ना विनंती करा असे सांगितले. त्या वेळेला स्वामी महाराज गावा बाहेरील हरिजनांच्या वस्तीवर होते. स्वामी जरी आज घरी जाण्याची आज्ञा दिली तर हा नक्की घरी येईल असे त्यांनी सांगितले. सोळप्पाना सर्व काही पटले आणि त्या स्वामींना विनंती करू लागले. स्वामी महाराज हे मारवाडी आपल्या मुलाला घरी नेण्यासाठी आलेले आहेत, परंतु हा घरी जाण्यास नाही म्हणतो आहे. स्वामी कृपया आपण आता हवी. सोळप्पाच हे बोलणे ऐकून स्वामी तरुण मुलांकडे बघतात आणि त्याला बोलता अरे जा तू घरी जा आणि कधी कधी इकडे येत जा.

घरच्या मंडळी ना आनंद होतो आणि तो तरुण मुलगा स्वामी आज्ञा प्रमाण मानून तयार होतो. पण आपण आता स्वामी चरणांपासून दुरावणार हे दु, ख त्याला सहन होत नाही तेव्हा तो स्वामींना म्हणतो की स्वामी राय चरणा पासून मला दूर जावे लागेल. कृपया करून स्वामीरायाच्या चरणांचे दर्शन मला रोज देत जा आणि काहीतरी प्रसाद देखील देत जा. प्रसाद हा शब्द उच्चारता स्वामी त्यांना पुन्हा बोलतात. अरे इथे आमच्याकडे देण्याघेण्याचा व्यापार चालत नाही. तुला जर का प्रसाद हवा असेल तर त्या हाडाच्या ढिगारा तून हवी तितकी हाडे घरी घेऊन जा. स्वामी वाणीचा उच्चार होता.

त्या तरुणाला खूप आनंद होतो आणि समोरील हाडाच्या ढिगाऱ्या तून चार हाडे उचलून गाठोड्या मध्ये बांधून तो आपल्या गावी मार्गस्थ होऊ लागतो. सकाळी जेव्हा आपल्या घरी पोहोच तो तेव्हा त्याला ते गाठोडे जड वाटू लागते आणि जेव्हा तो गाठले उघडून पाहतो तेव्हा त्याला चमत्कार असतो. त्या हाडांचे ऐवजी उत्तम प्रती चे सोने तयार झाले असते. जेव्हा तो त्या सोन्याचे वजन करतो तेव्हा ते जवळ जवळ पाच किलो इतके भरले जाते. त्या मुलाने 3 वर्ष स्वामीची चाकरी केली. पण स्वामिनी त्याला चार पट दिले. स्वामी कोणा चे काहीच ठेवत नाहीत याची प्रचिती देखील त्या मुलाला आली आणि तो पुन्हा अक्कलकोट मध्ये आला. स्वामी चरणी अत्यंत भक्तिभावाने शरण गेला आणि स्वामी चरणांचा अनन्य दास बनला.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *