नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आजच्या काळात कोट्यवधी घरात दिवेलागणीच्यावेळी देवासमोर, तुळशी समोर आणि घरातील प्रवेशद्वारा जवळ दिवा लावला जातो. काही घरांमध्ये कापूर, जटामांसी, लोबान यांचे मिश्रण करून धूप ही घात ला जातो. धूपामुळे घरातील विषाणू नष्ट होतात आणि घरात सकारात्मकता येते. घरातील प्रत्येक खोली धूप फिरवल्या ने संपूर्ण घर शुद्ध होण्यास मदत होते अशी मान्यता आहे. दिवा ज्ञानाचे आणि प्रकाशा चेही प्रतीक मानले जाते. दररोज. देव पूजना दिव्याला विशेष महत्व आहे.

देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला तर तो अशुभ संकेत मान ला जातो. मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये..देवाची आणि दिव्याची क्षमा याचना करून तो पुन्हा प्रज्ज्वलित करावा. मात्र दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला तर त्यासाठी दिव्याची वात शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला त्याच ठिकाणी ही शांत करावी लागते.

ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्या ला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्रय दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे. घरात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. धर्मशास्त्रा नुसार देवासमोर दिवा लावणे अनिवार्य मान ली गेली आहे. अस म्हणतात घरात सतत 21 दिवस दिवा न लावल्यास नेगेटिव एनर्जी येत असते आणि त्या ची वाईट परिणाम आपल्याला दिसू लागतात.

याउलट दिवा लावल्या ने संपूर्ण घरा ला त्याचा फायदा होतो. कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याची स्थिर राहण्याचे आव्हान अग्निदेवताला केले जाते.

आपल्याकडे तेला चा आणि तुपा चा दिवा देवासमोर लावला जातो. कोणताही दिवा लावला तरी चालतो. मात्र तुपाच्या दिव्या ने अधिक सकारात्मकता येत असते असं सांगितलं जातं. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणा तील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो त्यावेळी वातावरणात एकदम पवित्रता येते आणि प्रदूषण दूर होते.

दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याचेही काही नियम सांगण्यात आले आहे. आपण जर तेलाचा दिवा लावत असाल तर तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि जर तुपाचा दिवा लावणार असाल तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा असे सांगितले जाते. धन लाभासाठी दिव्या ची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरा मध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आले आहेत. पश्चिम दिशेला दिव्या ची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दक्षिण यमा ची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्या ची वात नसावी असं सांगितलं जातं..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *