नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो आपल्या शास्त्रात स्त्रियांना मानाचे स्थान दिलेले आहे. स्त्री ही घरची लक्ष्मी असते. महिलांना प्रत्येकाच्या जीवनात खूपच मानाचे स्थान दिले जाते. स्त्री असेल तरच घर सुखी, समाधानाने तसेच आनंदाचे असते. स्त्रियांशिवाय जग नाही असे देखील काहीनी म्हटले आहे.

मित्रांनो, परमेश्वराची भगवंताची सर्व श्रेष्ठ निर्मिती म्हणजे स्त्री, महिला आणि म्हणूनच स्त्रीला, महिलेला समजून घेणं सोपं असत आणि म्हणूनच ज्या घरामध्ये स्त्रीला आदर दिला जातो स्त्री महिलेचा मान राखला जातो. ते घर नेहमी सुखी राहते. त्या घरामध्ये नेहमी ऐश्र्वर्य, संपन्नता राहते. त्यामुळे स्त्रीला कायम आपण मान राखला पाहिजे. व तिला कायमचं सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. मात्र ज्या घरामध्ये स्त्रीचा अनादर किंवा अपमान केला जातो ते घर दारिद्र्याच्या दिशेने बरबादीच्या दिशेने जात असते. त्या घरामध्ये लोक कधी ही सुखी राहू शकत नाहीत.

मित्रांनो स्त्रीचे जे शरीर आहे ते भगवंताने बनवलेले आहे. या शरीरापासून आपण खूप लाभ प्राप्त करून घेऊ शकतो. कारण स्त्रीच्या शरीरात खूप प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो. स्त्री ही मातालक्ष्मीचे स्वरूप मानण्यात आले आहे. म्हणूनच आपण जाणून घेणार आहोत की, स्त्री बरोबर आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत.

मित्रांनो स्त्री वयाने मोठी असो किंवा लहान असो अशांचे चरण स्पर्श नेहमी केले पाहिजे म्हणजे आपण तिच्या पाया पडलो तर त्यामुळे आपल्याला खूप लाभ प्राप्त होत असतात. मित्रांनो शास्त्र असे मानते की चरणस्पर्श करणे किंवा पाया पडने म्हणजेच एखाद्या स्त्रीचे आशीर्वाद मिळवणे. जेव्हा आपण एखाद्या स्त्रीच्या पायाला हात लावतो तिचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यावेळी तिचा हात आपल्या डोक्यावरती लागला तर तो आशीर्वाद आहे. कारण असे म्हणतात की, स्त्रीच्या पायावरती सुखसमृद्धीचा वास असतो. आपल्या सर्व पापातून मुक्त करण्याची क्षमता या चरण स्पर्श मध्ये असते. तसेच जे हात आपल्याला आशीर्वाद देत आहेत त्या स्त्रीच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते की जे आपल्याला शुभ प्रकारचे परिणाम देत असते.

आपला मानसिक विकास करण्यासाठीची क्षमता सकारात्मक हतामध्ये असते. मग प्रश्न असा पडतो की आपल्या पत्नीचे चरणस्पर्श करावे का? तर धर्मशास्त्र असे मानते की, पत्नी सोडून इतर कोणत्याही स्त्रीचे आपण चरण स्पर्श केले पाहिजे तर त्या बदल्यात स्त्री ने आपल्या डोक्यावर हात ठेवून जे आशीर्वाद दिला तर हे खूपच चांगले मानले जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *