नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!. आपल्याला जिवनात बरेच कटू अनुभव येतात कधी कधी आपण परिस्थितीसमोर अगदी हतबल होऊन जातो. अशातच आपल्या प्रत्येकाच्या मनात येते की मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्या सोबत येवढे वाईट का होते? मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो, त्याची सेवा करतो, चांगल्या मार्गावर चालतो चांगली कर्म करत असतो तरी माझ्याच सोबत सगळं काही वाईट का होत असते.?

असे भरपूर विचार तुमच्या आमच्या अनेक लोकांच्या मनात येतच असतात. अशा सर्व प्रश्नांची उत्तरं स्वामी समर्थांनी दिले आहेत व त्याच उत्तरांच स्पष्टीकरण आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग मित्रांनो या विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.

एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की, हे भगवंता.. वासुदेवा.. नेहमीच चांगल्या व खऱ्या माणसासोबत वाईट का होते.? तर अर्जुनाच्या या प्रश्नावरती श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की एका नगरामध्ये दोन मनुष्य राहत होते, त्यातील पहिला व्यापारी होता व तो चांगला माणूस होता तो खूप धार्मिक वृत्तीचा होता. त्याबरोबरच प्रामाणिक देखील होता.

तो प्रामाणिक पणे आपला काम धंदा करून, आनंदात आपले जीवन व्यतीत करत होता. रोज मंदिरात जाणे, देवांची पूजा आरती करणे, व त्यानंतर आपल्या दिवसांची सुंदर सुरुवात करत होता, हा त्याचा रोजचा दिनक्रम होता. दुसरा माणूस खूप दुराच्यारी होता, त्याला दुसऱ्यांना त्रास देण्यातच आनंद वाटत असे. लोकांचा छळ करणे, त्यांना लुटणे हेच त्याचे काम होते.

तो असुरी प्रवृत्तीचा होता. तो देवतांना मानत नसे. तो देवतांचे नाव देखील कधीही घेत नसे. परंतु तो अधून मधून मंदिरात जात असे. कारण त्याला मंदिरातील पैसे चोरायचे होते. एकदा त्या गावात खूप पाऊस पडत होता. कोणीही घराबाहेर गेले नाही, सगळीकडे चिखल झाला होता. या संधीचा फायदा घेऊन तो चोर त्या मंदिरात गेला, व मंदिरातील दानपेटी फोडून पैसे घेऊन पळून गेला. थोडया वेळात तो व्यापारी रोजच्या प्रकारे मंदिरात आला.

व्यापारी आत गेला त्याच्या पाठोपाठ पुजारीही आत गेला. दानपेटी फोडलेली आहे आणि त्यात काहीही नाही. हे बघून पुजारी जोरात ओरडला, पुजारीचा आवाज ऐकून सर्व लोक तिथे जमा झाले. व व्यापाऱ्यांवर संशय घेऊन त्याला बोलू लागले. त्या व्यापाऱ्याने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे कोणी ही ऐकून घ्यायला तयार नव्हते.

व्यापाऱ्याला खूप वाईट वाटले. तो व्यापारी मंदिरातून बाहेर पडला. रस्ताने जात असताना त्याला एका गाडीने धडक दिली व त्याला खूप लागले. त्याचे अंग दुखू लागले. तो तसाच उठून चालू लागला. तर दुसरीकडे तो चोर पैसे घेऊन पळत होता, व वाटेत त्याला रस्त्यात एक पैशाचे गाठोडे सापडले.

तो खूप खुश झाला व पळू लागला आणि म्हणाला की, आजचा दिवस खूप लकी आहे, मंदिरातील दानपेटीतील इतके पैसे मिळाले, आणि आता रस्त्यात गाठोडे सापडल. मी तर आज करोड पती झालो. हे व्यापाऱ्याच्या कानावर पडले. त्याला खूप वाईट वाटले. आपण भगवंताची खूप पुजा आरती करतो. सर्व कामे खूप प्रामाणिक पणे करतो.

कुणाविषयी देखील काही वाईट बोलत नाही याचे आपल्याला असे फळ मिळाले का? हा प्रश्न त्याला सतवू लागला. आणि तो घरी निघून गेला. घरातील देवाचे सर्व मूर्ती व फोटो काढून टाकले. त्याचा देवावरील विश्वास डगमगळला बरीच वर्षे गेली कालांतराने दोघांचा मृत्यू झाला. यमराज दोघांना बरोबर घेऊन जात असताना, व्यापाऱ्याने यमराज यांना विचारले, मी तर नेहमी चांगलेच कार्य केले काहीही वाईट केले नाही तरीही माझ्यासोबत असे का घडले.

आणि हा माणुस तर नेहमी दुसऱ्याचे वाईट करत असे, नेहमी चो’री, ल’बाडी करत असे तरी देखील त्याला गाठोडी आणि मला दुःख का? तेव्हा यमराज ने त्यांना सांगितले, त्या दिवशी तुझ्या सोबत जी दुर्घटना घडली तो दिवस तुझ्या मृ’त्यूचा दिवस होता, परंतु तुझे वागने आणि देवावरचा विश्वास त्यामुळे तुझा मृ’त्यू टाळला. त्यातून तू सुखरूप बाहेर पडला आणि हा जो चोर आहे याचा त्याच दिवशी राजयोग होता.

परंतु त्याचे वाईट वागणे व भगवंताला न मानने यामुळे त्याचा राजयोग थोड्या पैशांमुळे थांबला. त्याला पैसे मिळाले पण राजयोग कधीही मिळाला नाही. हे ऐकल्यानंतर व्यापारी मनातल्या मनात हसू लागला. श्रीकृष्ण सांगतात की आपण केलेले चांगले व वाईट काम याचे फळ आपल्याला अवश्य मिळते. देव आपल्याला कोणत्या रुपात काय देईल हे सांगता येत नाही.

तर मित्रांनो तुमच्या सोबत सुद्धा काही वाईट घटना घडल्या असतील किंवा अनेक संकटं येत असतील तर असे समजू नका की देव तुमच्या सोबत नाही आणि त्यामुळे तुमच्या सोबत वाईट होत आहे. त्याऐवजी असा विचार करा की आपल्या सोबत ह्या पेक्षा वाईट घडले असते परंतु आपल्या चांगल्या वागण्यामुळे किंवा आपली देवावरती जी निस्सीम श्रद्धा आहे केवळ त्याचमुळे हे थोडक्यात निभावले.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *