नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो काही वस्तू आणि गोष्टी अशा असतात त्यांच्याशी आपल भाग्य आणि नशीब जोडलेल असत आणि म्हणून अशा वस्तू, गोष्टी कधीही इतरांबरोबर शेअर करू नका. इतर कुणाला देऊ नका मग तो आपला चांगला मित्र असुद्या चांगली मैत्रीण असुद्या किंवा नातेवाईक असूद्या कोणाशीही ह्या गोष्टी, वस्तू शेअर करू नका.

या वस्तू आपण दुसऱ्यांना दिल्यामुळे आपण त्यांना आपले भाग्य आपल नशीब देत असतो याचा परिणाम असा होतो की आपल नशीब आपल भाग्य आपल्याला साथ देत नाही यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते दारिद्र येते मग आपण म्हणतो माता लक्ष्मीचा आशिर्वाद आता आपल्याला कसा काय मिळत नाही.

त्यामुळे आपल्या घरातील काही गोष्टी आपल्याला गुप्तच ठेवल्या पाहिजेत, तर चला पाहूया त्या कोणत्या वस्तू आणि गोष्टी आहेत.

पहिली वस्तू जी आहे ते महिला सं-बंधित आहे महिलांनी त्याच्या पायातील जोडवं कधीही कोणाला देऊ नये याच कारण अस आहे की पायातील जोडावं सौभाग्याचं लेणं मानलं जातं. ज्या विवाहित महिला आहेत त्याच्या आशा काही वस्तू असतात जोडावी, मंगळसूत्र झाले कोणाला ही शेअर करू नये. मित्रांनो ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असतील हे वस्तू जर तुम्ही शेअर केलात तर तुमच्यात आणि तुमच्या पतीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो तुमच्यातील प्रेम कमी होत आणि ज्या ठिकाणी पती पत्नीचे पटत नाही त्या ठिकाणी लक्ष्मीमाता कधीच राहत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे पैसे उधार देने, मित्रांनो आपण गरजू लोकांना मदत ही केलीच पाहिजे पण पैसे उधार देताना कधीच ते मंगळवारच्या दिवशी देऊ नका. कारण मंगळवारी दिलेले पैसे माघारी येण्याची शक्यता नसते. याचा अनेक पुराणामध्ये असा उल्लेख केला आहे की मंगळवारी दिलेले पैसा कधीच परत मिळत नाही आणि मिळाले तरी त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागते म्हणून मंगळवारी पैसे उसने देऊ नका. तिसरी गोष्ट ती म्हणजे आपल्या घरामधील लहान मुलाचे कपडे दान करतो ते मूल 9 वर्ष किंवा 11 वर्षे होई पर्यंत त्यांचे कपडे दान देऊ नका. जर कपडे द्यायचेच असतील तर नवीन घेऊन द्या पण तुमच्या मुलांचे जुने कपडे देऊ नका.

चौथी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आपल्या घरामधील झाडू आपल्या शेजारी किंवा कोणालाही देऊ नका बरेचदा असे होते की शेजारचे जवळपास चे व्यक्ती थोड्या वेळासाठी आपल्या घरातील झाडू मागतात. झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे तुम्ही पाहिल असेल की भारतीय परंपरेमध्ये सुध्दा झाडूची पूजा केली जाते. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार झाडूला माता लक्ष्मीचा मान दिला जातो तर तुम्ही झाडू दुसऱ्याला दिलात तर माता लक्ष्मी तुम्ही दुसऱ्याला देताय त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होईल आणि घरातून निघून जाते. तर या चार गोष्टी कधीही कोणाला देऊ नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *