नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वामी समर्थांचे नामस्मरण हे मनाला शांती मिळवून देते. स्वामी समर्थांचे काही संदेशही असेच आपल्याला आयुष्यात मार्ग दाखविण्यासाठी उपयोग ठरतात.

1. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही – श्री स्वामी समर्थ

2. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, तू घाबरू नको असे बाळ त्यांचा – श्री स्वामी समर्थ

3. श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

4. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं – श्री स्वामी समर्थ

5. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच तुला आशिर्वाद – श्री स्वामी समर्थ

6. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच – श्री स्वामी समर्थ

7. गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही

8. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही – श्री स्वामी समर्थ

9. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही – श्री स्वामी समर्थ

10. नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो

11. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल. पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन – श्री स्वामी समर्थ

12. मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून येईन फक्त माझ्यावर विश्वास ठेव – श्री स्वामी समर्थ

13. काळजी नको, आयुष्य सुंदर आहे

14. कर्मावर विश्वास ठेवा, कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल – श्री स्वामी समर्थ

15. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोरा मोठ्यांचा आदर राखा – श्री स्वामी समर्थ

16. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही

17. हे ही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ

18. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या

19. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन् हरला नाहीत तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोलून तर बघा, मनासारखं नाही झालं तर सांगा

20. विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *