नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!एक जटाधारी तपस्वी गोसावी रामेश्वर आदितिर्थ ठिकाणी प्रवास यात्रा करत होता. यात्रा करत असताना त्यांना जलोदर झाला. दिवसेंदिवस त्यांचे पोट फुगत होते. अन्न खाता येत नव्हते म्हणून त्यांना चांगलाच अशक्तपणा आला होता. द्वारकेला जावून श्री कृष्णाचे दर्शन घेण्याची त्यांची खूप इच्छा होती. परंतु व्याधीमुळे श्री कृष्णाचे दर्शन होणे आता जवळ जवळ अशक्य वाटत होते. आणि यातच तो पायपीट करत गाणगापूर येथे आला.

त्या ठिकाणी मुक्कामी राहिला. तेथे त्याला अक्कलकोट मध्ये अवतारी विभूती आहे त्यांचे दर्शन घ्यावे असे सांगितले. चार पाच दिवसांचा मुक्काम झाल्यानंतर तो अक्ककोट येथे येण्यास निघाला. पुन्हा पायपीट करत अक्कलकोट मध्ये आला. त्यादिवशी स्वामी महाराज नव्या विहिरीच्या काठावर बसले होते. त्यावेळी तो कसाबसा चालत येतो आहे हे पाहून सभोवताली जमलेले सेवेकऱ्यांकडे बघितले आणि बोलले अरे.. त्या बैराग्याला मार्ग सांगा.

आणि त्याच्या हाताला धरून इकडे घेवून या!! स्वामींनी असे बोलताच एक दोन लोक घाईघाईने पुढे गेले. आणि त्या गोसाव्याच्या हाताला पकडून स्वामींकडे आणले. स्वामींची अजानुबाहू मूर्ती बघून गोसाव्याने स्वामीना नमस्कार केला. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि हसून बोलले, बैरागी बुवा. तुम्हाला श्री कृष्णाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे ना. ती नक्की पूर्ण होईल भरवसा ठेवा..खरतर स्वामीना आपण प्रथमच भेटतो आहे.

मला श्री कृष्णाचे दर्शन घ्यायचे आहे हे स्वामीना कसे समजले. स्वामींचे हे अंतरसक्षित्वाचे बोलून चकित झाले आणि माझ्या मनातील स्वामीना कसे समजले असे म्हणून तो मनातल्या मनात पुन्हा बोलू लागला. निःशंक..हे स्वामी तर परमेश्र्वरच आहेत.. गोसाव्याणे असे बोलताच पुन्हा स्वामी बोलले. अरे आम्ही कोणीही असू दे!! तू त्या कडुनिंबाच्या झाडाची पाने खा. स्वामी हुकूम प्रमाण मानून त्या गोसाव्याने पाला खाल्ला.

परंतु पाला कडू असल्याने त्याने लगेच थुंकून टाकला. आणि स्वामीना बोलला. स्वामी हा पाला खूपच कडू आहे.. कसा खाऊ..? गोसाव्याने असे बोलताच स्वामी हसले आणि बोलले. काय बोलतोस.. हा पाला कडू आहे!! मग त्या बाजूच्या फांदीचा पाला खा!! त्यात कडवटपणा नाही!! स्वामी भक्त हो स्वामींच्या लीला अतर्क्य आहेत. गोसाव्याने स्वामी हुकूम प्रमाणे बाजूच्या फांदीचा पाला खाल्ला.

तर खरोखर चमत्कार झाला. बाजूच्या फांदीचा पाला अक्षरशः गोड लागत होता. हा पाला फक्त गोसाव्यालाच नव्हे तर तेथे जमलेल्या लोकांनी खाऊन बघितला. तर त्यांना सुद्धा गोड लागला. स्वामींची अतर्क्य लीला बघून गोसाव्याच्या डोळ्यात पाणी सुरू झाले. आणि आश्चर्याने इतक्या दिवसाचा जलोदरचा त्रास मात्र अवघ्या तीन च दिवसात बरा झाला.

त्यानंतर त्या गोसाव्याची स्वामी चरणी अनन्य भक्ती जडली. स्वामी महाराज तर प्रत्यक्ष परब्रह्म आहे. ही दृढता त्याच्या मनाला आली. पुढे स्वामींनी काय चमत्कार केला. गोसाव्याचि इच्छा पूर्ण कशी केली हे आपण पुढील स्वामी वाणीत ऐकणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या स्वामी वाणीतून आपल्याला छान बोध मिळतो आहे तो असा की स्वामीना आपण आपल्या इच्छा, संकट, दुःख सांगा अथवा सांगू नका.

स्वामीना आपल्या मनातील समजते आहे. आजच्या लिलेत गोसावी मात्र आला त्याने काहीही सांगितले नाही तो समोर येताच स्वामींनी त्याच्या मनातले ओळखले. आणि त्याला त्याची इच्छा काय आहे हे बोलूनही दाखवले. यात सर्वात महत्वाचे म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल भरवसा ठेव ही स्वामींची आधार वाणी खूपच प्रेरणादायी आहे. म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी या लीलेतून बोध घेता हा अतूट अभेद्य विश्र्वास ठेवायचा आहे की स्वामींना आपल्या सर्व गरजा माहीत आहेत.

आणि त्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी जी पूर्व तयारी लागते त्यात नकारात्मक गोष्टी आडव्या येतात. त्या दूर व्हाव्या म्हणून स्वामी महाराज आपल्याला सतत कर्म संकेत देऊन तयारी करवून घेत असतात. कर्म करत असताना आपल्याला मेहनत करावी लागू शकते, कष्ट करावे लागू शकतात. कधी कधी प्रतिकूल परिस्थिती चा सामना सुद्धा करावा लागू शकतो.

आजच्या लीलेत कडवट चव असणारा कडुनिंबाचा पाला हे असाच कष्टदायक कर्माचे प्रतीक आहे. गोड चव असलेला पाला आनंददायी मेहनत असलेल्या कर्माचे प्रतीक आहे. स्वामी भक्त हो असे त्रास दायक कष्ट करत असताना आपल्याला थकायचे नाही वा हरायचे नाही. या कष्टांना आनंददायी करायचे आहे. आणि यासाठी अशा कर्माना स्वामी सेवेचे स्वरूप द्यायचे आहे. हे कष्ट म्हणजेच स्वामी सेवा आहे.

अशा भावनेने जेव्हा आपण प्रामाणिक मेहनत करू जसे त्या कडुनिंबाच्या पानाचा कडवटपणा जाऊन त्याला गोडवा आला अगदी तसेच आपल्याला त्रासदायक वाटणारे कर्म हे आनंदी वाटतील. त्यांचा त्रास आपल्याला होणार नाही. आणि जसे त्या गोसाव्या चा जलोदरा चा त्रास नष्ट झाला अगदी तसेच आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आडव्या येत असलेल्या नकारात्मक गोष्टीही नष्ट होतील.

जसे एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत प्रथम क्रमांक आणायचा आहे. आणि तो तशी प्रार्थना करतो. परंतु त्याच्यामध्ये आळस आहे. तेव्हा सर्व प्रथम स्वामी त्याच्यातील आळस दूर व्हावा म्हणून कर्म संकेत देतील. जेव्हा तो आळसाने अभ्यास करत असताना मध्येच उठेल तेव्हा त्याने अभ्यास करावा म्हणून घरातले ओरडतील आणि या धाकाने तो पुन्हा अभ्यासाला बसेल अभ्यास करत असताना त्याच्यातील आळशी स्वभावामुळे अभ्यास करणे त्याला खूपच त्रास दायक वाटेल.

परंतु त्याने वेळीच विवेक जागृत करूनओळखले की जे काही घडते आहे ते माझ्या प्रार्थनेचे उत्तर आहे. तेव्हा तो स्वामींची इच्छा स्वामी सेवा म्हणून अभ्यास करेल. आणि आळशी स्वभावाने होणारा त्रास त्यास जाणवणार नाही. पुढे नक्कीच त्याचा प्रथम क्रमांक येईल. स्वामी भक्त हो अशी अनेक उदाहरणे आपल्या जीवनात आहेत. चला तर मग आज आपण स्वामीना प्रार्थना करूया.

हे स्वामीगुरुराया! तुमचे नाम इतके पवित्र आहे ना.. की मुखातून उच्चारताच वाणी पवित्र होते.. तुमचे पवित्र रूप जेव्हा डोळ्यांनी बघतो तेव्हा डोळे पवित्र होतात. हात जेव्हा तुमच्या चरणांना स्पर्श करतात. तेव्हा हात पवित्र होतात.. हे परब्रह्म आतातर आमच्या जीवनाला च तुमचा स्पर्श झाला आहे. आमचे संपूर्ण जीवनच पवित्र झाले आहे. हे आई असेच आम्हा बालकांवर तुमची कृपा दृष्टी ठेवा. आमच्याकडून तुमची सेवा करवून घ्या. तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद स्वामी!! तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *