नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! रात्री खूप उशीर झाला होता. देवगडला जाणारी शेवटची बस देखील उशीर होऊनही सुटत नव्हती. एसटी बस स्थानक पूर्णपणे रिकामे झाले होते. या बसचे काही प्रवाशी इकडून तिकडे रेंगाळत होते तर काही तळमळ करत होते की, बस अजून सुटत का नाही आहे. तेव्हाच एकाने निरोप आणला की, बसचा एक टायर पंक्चर आहे.

पंक्चर काढला की बस सुटेल. रात्री 10 च्या सुमारास बस तिथून निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी देवगडला जाणारे होते. मात्र त्या बस मध्ये एक अशी देखील म्हातारी होती जिच्या हातात एक बोचकं धरलेलं होते, वाहक जेव्हा त्या म्हातारी कडे तिकीट फेडण्यासाठी गेला तेव्हा रस्त्यावर असलेला कातवन फाटा तेथून 3-4 किलोमीटर आत असलेल्या गावाचे तिकीट ती मागू लागली.

बस वाहक विचार करू लागला, या म्हातारीचे इतके वय झाले, त्या फाट्यावर उतरणारी एकटीच, पावसाळ्यामुळे काळोख रात्र, अश्यावेळी ही म्हातारी घरी पोचेल तरी कशी.? वाहक त्यावेळी म्हातारीवर थोडा रागावला, तू एकटी, तुला नीट दिसत नाही, नीट चालत देखील येत नाही, एवढा का उशीर केला? लवकर उजेड असताना निघून जायचं न.?

म्हातारीला नीट ऐकू पण येत नव्हते. काही तरी उत्तर तिने दिले. वाहकाने तिला त्या गावाचे तिकीट दिले आणि आपल्या जागेवर येऊन बसला. इतर प्रवाशी निवांत झोपून गेले म्हणून चालकाने बस मधील लाईट बंद केले. वाहक मात्र त्या म्हातारीचा च विचार करत होता. त्या फाट्यावर तर आपण या म्हातारीला उतरवून देऊ पण तिला धड चालताही येत नाही, बरोबर दिसत देखील नाही.

त्यात पाणी पावसाळ्याचे दिवस त्यातही तीन ते चार किलोमीटर असलेल्या घरी कशी जाणार.? कुत्र्यांनी किंवा एखाद्या जंगली प्राण्यांनी म्हातारीवर हमला केला तर? रास्ता खाच खळग्यांनी भरलेला, मध्ये कुठे नाल्याला पूर आला असेल तर.? अशे अनेक विचार वाहकाच्या मनात येऊ लागले. तेवढ्यात म्हातारी जिथं उतरणार होती त्या गावचा फाटा आला.

वाहकाने बेल वाजवली चालकाने बस थांबवली. वाहक उठला व एका हातात म्हातारीची बोचकं पकडली आणि दुसऱ्या हाताने म्हातारीचे बखोट धरून तिला गाडी खाली उतरवण्यास मदत केली. बसच्या बाहेर पडल्यावर त्याने पाहिलं बाहेर इतका अंधार होता की काहीच दिसत नव्हते, त्याने ते बोचके डोक्यावर घेतले व परत म्हातारीचे बखोट धरले.

तो एकाच विचाराने चालायला लागला की, म्हातारीला एकटे सोडायला नको तिला घरापर्यंत सुरक्षित पोचविणे. म्हातारीलाही नवल वाटू लागले आणि शक्य तेवढे तिनी त्याच्या पाउलां बरोबर पाऊल टाकू लागली. इकडे बस चालक व प्रवाशी गेली 10 ते 15 मिनटे झाली हा वाहक गेला कुठे.? अशी चुळबुळ सुरु झाली.

चालकाने बसला फेरी मारली की वाहकाला चक्कर वगैरे तर काही नाही ना आले.? नंतर त्यांच्या लक्षात आलं की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल. त्यामुळे सगळंच संतापले होते. संतापलेले प्रवाशी म्हणून लागले अशा निर्जनस्थळी बस सोडून हा निघून गेला.

काही तर म्हणाले ‘चला हो, आपण निघू’ राहू द्या त्याला, इकडे त्या म्हातारीने त्या वाहकाला ‘बा तुझे नाव काय रे?’ असे विचारले. त्या वाहकाने उत्तर देत सांगितले, “तुला काय करायच आजी माझ्या नावाचं… मी महादू वेंगुर्लेकर.’ कोणत्या डेपो मध्ये आहेस.? वाहक- मालवण. आजी- मुलेबाळे, वाहक- आहेत दोन तेवढयात आजीचे पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आले.

दोन चार कुत्रे भुंकत पळाले. वाहकाला म्हातारीने कुलूपाची किल्ली दिली. त्याने कुलुप उघडुन दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला. ती म्हातारी त्या गावातील घरात एकटी राहत होती. तिला जवळचे म्हणून कोणीच नातेवाईक नव्हते. तिची काळजी असणारे तिची विचारपूस करणारे कोणीच तिच्या आजूबाजूला फिरकत नसे.

तीही फारशी कोणाच्या जवळ जात नसे. कोणी तिच्या जवळ आले जरी तरी तीला वाटायचे, हा स्वार्थी आहे. याचा माझ्या प्रॉपर्टी वर डोळा आहे. वयोमानानुसार तिला हे वाटणे साहजिक आहे. गाव लागतच म्हाताऱ्याच्या मालकीचे अडीच एकर शेत होते. ते शेत दरवर्षी कोणालाही पेरायला द्यायचे आणि त्या मोबदल्यात पैसे घेऊन उदरनिर्वाह करायची. एक दिवस म्हातारी जास्तच आजारी पडली.

गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही म्हातारीने अचानक घरी बोलावण्याचे नवल वाटे. ते घरी आले. म्हातारी उठून बसली व त्यांना म्हणाली, ‘दादा कागद काढा, हे दोन अडीच तोळे सोने, माझी पांढरी (शेत ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी असे म्हणतात.) व हे घर महादू वेंगुर्लेकर, कंडक्टर याच्या नावावर लिहून द्या व हे वीस हजार रुपये घ्या त्यातून मी मेल्यावर क्रियाकर्म करा.

मी जास्त दिवस काही जगणार नाही. सरपंच व ग्रामसेवक यांना काय बोलावं हेच सुचत नव्हतं. काय ही भानगड, कोण महादू वेंगुर्लेकर कंडक्टर.? म्हातारी त्याला सर्व का देत आहे? असेल काही नाते असं विचार करून दोघेही तिथून निघून जातात. दोन ती दिवसात म्हातारी वारली. सरपंच व ग्रामसेवक यांनी म्हातारीने सांगितल्या प्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले.

मग त्यांनी महादू कंडक्टरचा मालवण डेपो ला शोध घेतला. त्याला भेटून सगळी हकीकत सांगितली. साधारण वर्षभरापूर्वीच हा प्रकार असल्यामुळे त्याला देखील सगळं आठवले. म्हातारीने त्याच्यासाठी जे केलं ते ऐकून महादूला रडू कोसळले. कंडक्टरने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली, हे ऐकून दोघांनाही नवल वाटले.

तिन्ही वाहकाला ठरल्या तारखेला त्यांच्या गावी येण्याचे आमंत्रण दिले. वाहक महादू गावात आले तर शेकडो गावकरी तिथे जमलेले होते. सरपंचांनी त्यांच्या गळ्यात हार घातला. वाजतगाजत त्यांना गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले. सर्वजण विराजमान झाल्यावर तो शेतीचा व घराचा नावावर केलेला कागद व अडीच तोळे सोने महादू यांच्या समोर ठेवले.

ते पाहून महादू यांना अश्रू अनावर झाले. मी केलेल्या एका छोट्याश्या मदतीची ती आजी एवढी मोठी किंमत देऊन गेली. त्यामुळे त्याला काही सुचतच नव्हते. बाजूनेच त्यांना मुलांचा गोंगाट ऐकू येत होता. त्यांनी विचारले येथे शाळा भरते का.? सरपंचांनी हो असे सांगितले. शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही त्यामुळे कालवं ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भारतात असे त्यांनी सांगितले.

महादू म्हणाले, का? गावठांची जागा किव्वा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का देत कोणी? गावठांची जागा नाही आणि शेत देण्यास कोणी तयार नाही असे सरपंचांनी सांगितले. वाहक महादू पटकन खुर्चीवरून उठले व टेबलवरील कागद सरपंचांना देत म्हणाले ‘हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत’ हे घर पण विका‌‌.

त्यातून येणार पैसे शाळेच्या बांधकामासाठी लावा आणि हे सोनं देखील विका यातून आलेल्या पैश्यांनी शाळेला सुंदर गेट बांधा आणि त्यावर म्हातारीचं नाव लिहा. टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व गावकरी भारावून गेले. दरवाज्यालाच काय हायस्कुलला च म्हातारीचे नाव देऊ. असं त्यांनी सांगितलं. वाहक महादु यांनी सर्वांचा निरोप घेतला.

झोळी फाटकी असून सुद्धा तो गावाचे सारे काही तो गावालाचं देऊन गेला. एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला. एखाद्याला केलेली छोटीमोठी मदत कधीही वाया जात नाही. त्याच्या काळजात ती मदत घर करून जाते. समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडू नका..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *