नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ ! कुटुंबाच्या सुख शांतीसाठी घरामध्ये ही चार कामे अवश्य करावीत. स्वामी म्हणतात ही कामे नियमितपणे केल्यास आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. नकारत्मेकतेमुळे आपले विचार ही नकारत्मक होतात.

यामुळे कामामध्ये बाधा निर्माण होते. लक्ष्मी कष्टसाध्य असते हे नक्की पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी. घरातील वातावरण कसे असावे. लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे, तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही.

ही प्रत्येकाचीच इच्छा असते. सर्व लोक आयुष्यभर या लक्ष्मीसाठीच राबत असतात. चला तर जाणून घेवूयात ती कोणती चार कामे आहेत.

१. घरासमोर रांगोळी काढणे:- रांगोळीमुळे घरात सकारत्मक उ’र्जा प्रवेश करते. देवी देवतांच्या स्वागतासाठी रांगोळी काढली जाते.

ज्या घरासमोर रांगोळी काढली जाते तेथे सर्व देवांची तसेच स्वामींची कृपा असते. हा उपाय केल्याने घरातील वास्तू दोष देखील दूर होतो.

२. घरात मुख्य दरवाजावर सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणे:- मित्रांनो जर आपल्यावर लक्ष्मीची कृपा कायम स्वरूपी व्हावी असे वाटत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी घरात आणि दारावर नियमित दिवा लावावा.

आपण लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवा लावत आहोत. अशी आपली दिवा लावताना भावना असावी. संध्याकाळी देवी लक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करत असते. ज्या घराच्या बाहेर लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवे लावले असतील तेथे लक्ष्मी निवास करते.

३. घरात दररोज गोमुत्र शिंपडावे:- घरात दररोज शक्य नसेल तर किमान उस्तव, सनासुदीच्या दिवशी आणि सर्व शुभमुहार्तावर पौर्णिमेला नक्की घरात गोमुत्र शिंपडावे. असे केल्याने घरातील वातावरण पवित्र होते आणि घरातील नकारात्मक उर्जा संपून जाते.

घरातील वास्तुदोष देखील यांमुळे दूर होतात. ज्या घरामध्ये गोमुत्र शिंपडले जाते तेथे स्वामींची कृपा अवश्य राहते.

४. घर नेहमी स्वच्छ ठेवा:- ज्या घरात जाळी, कचरा, अस्वच्छता असते तेथे लक्ष्मी कधी निवास करत नाही. आपल्या आ’रोग्यासाठी अस्वच्छता चांगली नसते. जेथे अस्वच्छता असते तेथे दारिद्र्य असते. तर ही होती चार कामे, ही चार कामे दररोज आपल्या कुटुंबासाठी केली पाहिजेत त्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावर कायम राहते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *