नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवांच्या लेखमालेमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्हाला जर आपले लेख आवडत असतील तर लेखांना लाइक करायला विसरू नका. आज तुमच्या प्रेमामुळे आपले लेख देशांच्या सीमा ओलांडून अनेक स्वामीभक्तांपर्यन्त पोचले आहेत. गेल्या काही दिवसात तुमच्या अनुभवांचा ओघ आटला आहे, तुमच्या अनुभवांवर आपली ही लेखमाला चालू आहे, श्री स्वामी समर्थ !! यापुढील अनुभव हा सेवेकर्‍याच्या शब्दात

नमस्कार मित्रांनो मी सुनीता, जळगावची. आज मी तुम्हाला मला आलेला स्वामी महाराजांच्या सेवेचा अनुभव संगत आहे. माझे कुटुंब खुप सुखाने जगत होते, आमच्या कुटुंबवृक्षाला एका फळ लागलेले होते. माझ्या लहान मुलाचे पोट साफ लवकर होत नवते आणि त्याला काहीतरी त्रास होत होता. आम्ही त्याच्यावर उपचार देखील सुरू केले होते पण औषधांचा काहीही उपयोग होत नवता.

डॉक्टरांनी शेवटी आम्हाला संगितले की, तुम्हाला ऑफरेशन करावे लागेल. आम्हाला हे ऐकून खूप वाईट वाटले, रात्रभर मी बेचैन होते. मी अनेक वर्षापासून स्वामींची सेवेकरी आणि स्वामींवर आमची श्रद्धा होती. माऊलींवर आमचा दृढ विश्वास होता, पुढचे उपचार जळगावमध्ये होणार नवते, डॉक्टरांनी आम्हाला मुंबईमध्ये रिफर केले. कोरोंनाचे वातावरण असल्याकारणाने त्या दवाखान्याने संगितले की, दोन महिन्यांनंतर आपण या गोष्टी करू.

मुंबईमधून आम्ही जळगावला परत आलो, मला माझ्या मुलाची खूप काळजी होती, मी एका ताईंना फोन केला. ताईंनी मला गुरुचरित्राचे पारायण करायचं सल्ला दिला. मी तो पूर्ण दिवस महाराजांची सेवा करत होते आणि त्यांना माझ्या बाळाला लवकर व्यवस्थित करा अशी विनंती करत होते. दुसर्‍या दिवसापासून मी गुरुचरित्राचे पारायण केले आणि पुढचे सात दिवस मी स्वामींची न चुकता सेवा करत होतो. साधारण 10-15 दिवसांनी जेव्हा आम्ही बाळाला घेऊन पुढच्या फॉलोअप ला आम्ही गेलो तेव्हा सर्वांना एक आनंदाचा धक्का बसला. डॉक्टरांनी जे संगितले ते नक्कीच आम्हाला सुख देणारे होते.

डॉक्टरांनी संगितले की आता मुंबईमधल्या उपचाराची गरज वाटत नाहीये, त्यांनी काही औषधे दिली आणि काही दिवसांनी फरक पडायला सुरवात झाला. स्वामी महाराजांच्या विश्वासावर आम्ही सगळ सोडून दिले. आज माझ्या मुलाला काहीही तक्रार नाहीये. स्वामी समर्थ महाराजांचा मला असा अनुभव आला, तुम्हाला आलेले अनुभव देखील तुम्ही दादांना पेजवर नक्की पाठवा. कमेंट मध्ये स्वामी नावाचा जयघोष होऊ द्या.. ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *