नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाच्या लेखमालेमध्ये तुमचे स्वागत आहे. आपल्या भक्तांवर स्वामी महाराजांचे नेहमीच लक्ष असते. स्वामी महाराज आपल्या भक्तांना खरच भेटतात का? भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी महाराज खरच पाठीशी असतात का? धुळे येथे राहनार्या निकिताताइ याना आलेला हा सत्य अनुभव पाहूया त्यांच्या शब्दात.

मी निकिता, राहणार धुळे. मी आपल्या मुलास घेऊन देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. धुळ्यापासून मी एसटी मध्ये बसले. तास दोन तासाचा प्रवास असल्याने मी माझ्या सोबत स्वामी चरित्र घेऊन चालले होते. पूर्ण प्रवासात मी संपूर्ण स्वामी चरित्र वाचले.

एसटी बस देवीच्या मंदिराजवळ थोडी अलीकडे एका फाट्यावर थांबली. मी व माझा मुलगा आम्ही तिथे उतरलो. फाट्यावर उतरून देवीच्या दर्शनास पायी चालत जावे लागे. मी मुलास घेऊन पायी चालू लागले. माझ्या सोबत एक पिशवी देखील होती. पिशवीत बरेच आंबे व खाण्याचे पदार्थ होते.

रस्ता स्मशानाजवळून जात होता. स्मशानाच्या अलीकडेच मला एक उंच पुरे वृद्ध गृहस्थ ज्यांनी पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते, हे भेटले. आणी ते म्हणाले, ”पोरी, एक पिशवी माझ्याकडे दे व मुलाला कडेवर घे”. ऊन खूप तापलेले होते. त्यामुळे मी देखील मुलाला कडेवर घेऊन पिशवी बाबांकडे दिली.

स्मशानाची जागा ओलांडून गेल्यावर त्या बाबांनी पिशवी माझ्याकडे दिली व म्हणाले, ”पोरी, तू आता जा, आम्ही पण जातो.” मी त्या बाबांकडे पाहात म्हणाले की, ”बाबा, दोन आंबे तरी घ्या” आणि मी पिशवीत आंबे शोधू लागली. पोरी आम्हाला आंबे नको. तू आमचे चरित्र वाचले. इथे जवळ स्मशान आहे. भर दुपारी तू पिशाच्च्यांना आवडणारे तळलेले पदार्थ पिशवीत घेऊन चाललेली. तुला काही अपाय होऊ नये म्हणून आम्हाला यावे लागेल.

हे ऐकून मी पटकन वरती पाहू लागले. पण ती व्यक्ती अदृश्य झाली होती. मला खूप वाईट वाटले. आपण प्रत्यक्ष स्वामींना आपले ओझे वाहण्यास लावले. मी ना त्यांचे आभार मानले, ना त्यांचे दर्शन नीट घेतले. मला याची खूप हळहळ वाटू लागली. आणि मी तिथूनच स्वामींना हात जोडले.

स्वामी महाराज आपल्या भक्तांवर कधीही संकट येऊ देत नाहीत. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ते आपल्याला भेटतात आणि खरच भेटतात. फक्त आपली श्रद्धा महत्वाची. श्री स्वामी समर्थ

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *