नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!सूर्य नसता तर पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. सूर्यनमस्कार हे प्राचीन तंत्र आहे ज्या द्वारे सूर्यदेवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.कारण सूर्य हा पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीचा स्रोत आहे

आता केवळ सूर्यनमस्कार कसे करावे हे माहित असणे पुरेसे नाही. या अतिशय प्राचीन तंत्रामागील विज्ञान समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे, कारण खोलवर समजून घेण्याने या अतिशय पवित्र आणि शक्तिशाली तंत्राकरिता योग्य दृष्टीकोन आणि पद्धत प्राप्त होईल.

सूर्यनमस्कारामागाचे विज्ञान
असे म्हटले जाते की (भारतातील प्राचीन ऋषी) शरीराच्या विविध अंगांवर निरनिराळ्या देवांचे (दैवी आवर्तने किंवा दैवी प्रकाश यांचे) राज्य असते. सौर चेता जालिका (नाभीच्या मागे स्थित असते आणि मनुष्य देहाचे केंद्रस्थान) ही सूर्याबरोबर जोडलेली असते असे म्हणतात. हे मुख्य कारण आहे की प्राचीन ऋषींनी सूर्यनमस्काराचा सराव करण्यास का सांगितले कारण या तंत्राच्या नियमित सरावामुळे सौर चेता जालिका सुधारते त्यामुळे सृजनशीलता आणि अंतःस्फूर्ती वृद्धिगत होते.

आपल्या सर्व भावना मणिपूरचक्रात साठवल्या जातात. आपल्या सर्व भावना सौर चेता जालीके मध्ये संचयित केल्या जातात आणि आपल्याला कधी कधी आतून काहीतरी जाणवते त्या जाणीवेचा सुद्धा हा बिंदू आहे. सौर चेता जालीकेचा आकार हा एका छोट्या आवळ्याएवढा असतो. परंतु जे योग आणि ध्यान करतात त्यांचा आकार खूपच मोठा होतो – सामान्य आकारापेक्षा जवळजवळ तिप्पट ते चौपट होतो. तुमची सौर चेता जालिका जितकी जास्त रुंदावते तितकी तुमची मानसिक स्थिरता आणि तुमची अंतः.स्फूर्ती अधिक चांगली असते.

सूर्यनमस्काराने दिवसाची सुरवात कां करावी ?
सूर्यनमस्कार हा बारा आसनांचा संच आहे, जे शक्यतो सूर्योदयाच्या वेळी करावे. सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे संपूर्ण शरीरभर रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होते. आपण निरोगी राहतो आणि आपण आजारांपासून दूर राहण्यात मदत होते. हृदय, यकृत, आतडी, पोट, छाती, घसा आणि पाय यांना सूर्यनमस्कारामुळे अनेक फायदे होतात. डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाचा सूर्यनमस्कारामुळे फारच मोठा फायदा होतो आणि म्हणूनच सर्व योग तज्ञ सूर्यनमस्कार करावे असे सुचवितात.

ते कधीही रिकाम्या पोटी करता येतात. परंतु सूर्यनमस्काराकरिता सकाळची वेळ उत्तम असे मानतात कारण त्यामुळे शरीर ताजेतवाने होते आणि मनाला तजेला मिळतो ज्यामुळे दिवसभराची कामे करण्यासाठी आपण एकदम तयार होतो. जर दुपारी केली तर त्याने शरीराला ताबडतोब ऊर्जा मिळते आणि जर संध्याकाळी केली तर मन हलके होण्यात मदत होते. जर अतिशय वेगाने केले तर सूर्यनमस्कार हा हृदयाकरिता सर्वोत्तम व्यायाम आहे आणि वजन कमी करण्याचा चांगला उपाय.

मुलांनी सूर्य नमस्कार कां करावेत ?
सूर्यनमस्कारामुळे मन शांत होते आणि एकाग्रता सुधारते. आज मुले जीवघेण्या स्पर्धेला तोंड देत आहेत आणि त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सूर्यनमस्काराचा समावेश केला पाहिजे कारण त्याने मानसिक स्थैर्य वाढते, चिंता आणि अस्वस्थता कमी होते. सूर्य नमस्काराच्या नियमित सरावाने शरीराला शक्ती आणि जोम प्राप्त होतो. स्नायुंकरिता हा सर्वोत्तम व्यायाम असून याने भावी धावपटूंच्या पाठीच्या कण्याची आणि हातापायांची लवचिकता वाढते. ५ वर्षाचे लहान मुल दररोज सूर्यनमस्कार करू शकते.

महिलांनी सूर्य नमस्कार कां करावेत ?
असे म्हणतात की महिनोनमहिने पथ्याआहाराने (डाएटिंग करून) जे होऊ शकत नाही ते सूर्यनमस्काराने होते. म्हणूनच आरोग्याबाबत जागृत महिलांसाठी हे एक वरदानच आहे कारण त्याने जास्तीचे वजन तर घटतेच शिवाय हा एक सोपा आणि स्वत: करण्याचा उपाय आहे उदराचे स्नायू ताणून सुडौल बांधा मिळवण्याचा. काही सूर्यनमस्कारांच्या आसनामुळे पोटावरील चरबी कमी होते. त्यामुळे थॅायरॅाईड ग्रंथींना चेतना मिळते (यामुळे आपले वजन कमी करण्यात मोठा परिणाम होतो) याने ग्रंथी नीट कार्य करू लागतात. सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे स्त्रियांच्या मासिक पाळीची अनियमितता दूर होते आणि बाळंतपणसुद्धा सुकर होते. सर्वात शेवटचे असे की याने चेहऱ्यावर तेज येते, सुरकुत्या येणे लांबते आणि चेहरा चमकतो आणि चिरतरुण दिसतो.

सूर्यनमस्कार करून आपली अंतःस्फूर्ती वाढवा
सूर्यनमस्कार आणि ध्यान यांच्या नियमित सरावाने सौर चेता जालीकेचा आकार बदामापासून वाढून हाताच्या तळव्याएवढा होतो. सौर चेता जालिका, जिला दुसरा मेंदू असेसुद्धा म्हणतात, आपल्यामध्ये अंतःस्फूर्तीची क्षमता आणि आपले विचार अधिक स्पष्ट आणि आपल्याला अधिक केंद्रित करते. सौर चेता जालीकेचे जर आकुंचन झाले तर त्यामुळे नैराश्या आणि इतर नकारात्मक प्रवृत्ती निर्माण होतात.

सूर्यनमस्काराच्या अनेक फायद्यांमुळे शरीर निरोगी आणि मन शांत राहण्यात मदत होते.म्हणूनच सर्व योग तज्ञ सूर्यनमस्काराचा मोठ्याप्रमाणावर पुरस्कार करतात. या सूर्य नमस्कारांच्या सूचनां मुळे तुमचा सूर्यनमस्काराचा अभ्यास चांगला होईल आणि त्यामुळे अधिक चांगले परिणाम साध्य होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *