नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!हिंदू धर्मात रुद्राक्षाचे महत्त्व अधिक आहे, असं म्हणतात की रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात. साधारणपणे रुद्राक्ष आणि भगवान शंकराचा संबंध मानला जातो. यासाठी हिंदू धर्मात याची पुजाही केली जाते. खरंतर रुद्राक्ष हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि प्रत्येक रुद्राक्षाचे एक वेगळे महत्त्व असते. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की शिवपुराणात १४ प्रकारच्या रुद्राक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे. यात प्रत्येक प्रकारचे रुद्राक्ष धारण करण्याचा वेगवेगळा अर्थ असतो. जाणून घ्या कोणत्या प्रकारचे रुद्राक्ष धारण करण्याचा काय आहे.

मित्रांनो सर्वात आधी रुद्राक्ष कसा निर्माण झाला याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया, पौराणिक कथांनुसार भगवान शंकराने संसारातील लोकांच्या भल्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या केली. एकदा तपश्चर्या करत असताना ते खूपच दु:खी आणि निराश झाले यावेळी त्यांनी आपले डोळे उघडले असता त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू खाली पडले त्यातून रुद्राक्षाच्या झाडाची निर्मिती झाली. याच कारणामुळे हिंदू धर्मात रुद्राक्षाची पुजा केली जाते.

आता आपण कोणत्या रुद्राक्ष मुळे आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे लाभ होत असतात याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेऊया. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार एक मुखी रुद्राक्ष, असं म्हणतात की एक मुखी रुद्राक्ष भगवान शंकराचे रूप असते. ज्यांच्याकडे हा रुद्राक्ष असतो त्या खूप नशिबवान असतात तसेच भगवान शंकराची कृपा नेहमी त्यांच्यावर राहते. द्विमुखी रुद्राक्ष, खरंतर द्विमुखी रुद्राक्ष शंकर आणि पार्वती यांचे एकत्रित रूप आहे हे धारण केल्याने दाम्पत्य जीवन सुखमय होते. तीन मुखी रुद्राक्ष, असं म्हणतात की तीन मुखी रुद्राक्ष धारण केल्याने स्त्री हत्येच्या पापातून मुक्ती मिळते. चार मुखी रुद्राक्ष, हा रुद्राक्ष पाहल्याने पुरुष हत्येतून मुक्ती मिळते.

त्यानंतर पाच मुखी रुद्राक्ष, असं म्हणतात की हा रुद्राक्ष धारण केल्याने सर्व प्रकारच्या अपराधातून मुक्ती मिळते. सहा मुखी रुद्राक्ष – याला कार्तिकेयचे रूप मानले जाते. हा रुद्राक्ष धारण केल्याने आयुष्यातील सर्व क्षेत्रात सफलता मिळते. सात मुखी रुद्राक्ष, हा धारण केल्याने लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते. तसेच त्या व्यक्तीवर आर्थिक संकट येत नाही. हा रुद्राक्ष धारण केल्याने घरात चोरी होत नाही. आठ मुखी रुद्राक्ष, याला गणपतीचे स्वरूप मानले जाते. आठ मुखी रुद्राक्ष धारण केल्यास सर्व कार्ये नीट पार पडतात. नऊ मुखी रुद्राक्ष, हा रुद्राक्ष डाव्या हातात धारण केल्यास गर्भहत्येच्या कलंकातून मुक्ती मिळते. दहा मुखी रुद्राक्ष – याला भगवान विष्णूचे रूप मानले जाते. तसेच हा रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला भीती सतावत नाही.

अकरा मुखी रुद्राक्ष, याला भगवान शंकराचे रूप मानले जाते. अकरा मुखी रुद्राक्ष धारण केल्याने शंकराची कृपा कायम राहते. बारा मुखी रुद्राक्ष, असं म्हणतात हा रुद्राक्ष धारण केल्याने ती फळे मिळतात जी अश्वमेध यज्ञ केल्याने प्राप्त होतात. तेरा मुखी रुद्राक्ष, तेरा मुखी रुद्राक्ष घातल्याने सर्व प्रकारचे भोग प्राप्त होतात. चौदा मुखी रुद्राक्ष, हा रुद्राक्ष धारण केल्याने लोभ, मोह, माया यातून मुक्ती मिळते. जर तुम्ही खराखुरा रुद्राक्ष धारण करत आहात तरच तुम्हाला याचे लाभ मिळतील. रुद्राक्ष खरा की खोटा ओळखण्यासाठी तो पाण्यात टाका. जर रुद्राक्ष पाण्यात बुडला तर तो खरा आहे आणि जर तो तरंगत राहिला तर तो खोटा रुद्राक्ष आहे.

परंतु मित्रांनो सोमवारच्या दिवशी आपण चार मुखी रुद्राक्ष घेऊन, त्याला आपल्याला लाल रंगाच्या दातामध्ये होऊन घ्यायचे आहे आणि तो रुद्राक्ष आपण आपल्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे मित्रांनो यामुळे आपल्या करिअर मधील सर्वात अडचणी दूर होऊन आपल्या करिअरमध्ये आणि नोकरी प्राप्तीचे योग आपल्या कुंडलीमध्ये जुळून येतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *