नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा दिवस, शुक्रवारी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा केल्यास आर्थिक समृद्धी राहते आणि घरात धन आणि धान्याची उणीव भासत नाही.

ज्योतिष शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीच्या कृपा आणि प्रसन्नतेसाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने भौतिक जीवनातील सुखांचा मार्ग मोकळा होतो. जाणून घेऊया शुक्रवारी रात्री कोणते उपाय करावेत.शुक्रवार तंत्र साधनेसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवशी धनाची देवी लक्ष्मी हीची पूजा केली जाते. त्यामुळे भौतिक सुख, ऐश्वर्य, वैभव, सौंदर्य इत्यादी गोष्टींचा लाभ होतो

ज्योतिष शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी, सांसारिक इच्छा आणि शारीरिक सुख प्राप्तीसाठी काही अत्यंत गुप्त ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत.हे उपाय शुक्रवारी रात्री गुप्तपणे केले जातात, जेणेकरून त्यांचे शुभ परिणाम मिळू शकतील. हे ज्योतिषीय उपाय केल्याने आयुष्यात कधीही पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही आणि सुख-समृद्धी कायम राहते.

सुख-संपत्तीसाठी हा उपाय करा
संपत्ती, समृद्धी आणि आनंदासाठी शुक्रवारी मध्यरात्री अष्ट लक्ष्मीची (माता लक्ष्मीची आठ रूपे) विधिवत पूजा केल्यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करा. तसेच गुलाबाची फुले अर्पण करा आणि केशरयुक्त खीर अर्पण करा. ही पूजा करण्याआधी घरच्यांना कल्पना द्या, जेणेकरून तुम्ही पूजेला बसल्यावर त्यात अडथळा येणार नाही. त्यादृष्टीनेच मध्यरात्रीची वेळ सांगितली आहे. रात्री साधारण १२ ते १ दरम्यान ही पूजा करावी.

देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी हा उपाय करा
शुक्रवारी रात्री स्वच्छ वस्त्रे परिधान करून माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर ‘ऐं ह्रीं श्री अष्टलक्ष्मीयै ह्रीं सिद्धये मम गृहे अगच्छगच्छ नमः स्वाहा’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा आणि श्री लक्ष्मी सूक्ताचा पाठ करावा. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल.

हा उपाय १० शुक्रवार करा
शुक्रवारी सूर्यास्तानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवी लक्ष्मीसमोर बसून तुपाचा दिवा लावा. यानंतर प्लॅस्टिकचा छोटा डबा मीठाने भरून लाल कापडावर ठेवा. त्यानंतर माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा एक हजार वेळा जप करा. यानंतर मिठाच्या डब्यात लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करा. आरतीनंतर तो छोटा डबा लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाट सारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. असे १० शुक्रवार करा. या उपायाने धन आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आयुष्यात आनंद प्रस्थापित होतो.

भौतिक सुखासाठी हे उपाय करा
शुक्रवारी संध्याकाळी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा आणि गरजू व्यक्तीला साखर दान करा. तसेच लहान मुलीला बत्तासे खाऊ म्हणून द्या. असे केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती सुधारते आणि भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होते. यासोबतच नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

धन-समृद्धीसाठी हा उपाय करा
शुक्रवारी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र गुलाबी रंगावर कापडावर ठेवा आणि श्रीयंत्र जवळ ठेवा. त्यानंतर पूजेच्या ताटात ८ तुपाचे दिवे लावा आणि सुगंधी अगरबत्ती लावा. बत्तासे नैवेद्यात ठेवा. यानंतर श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीला अष्टगंधाने टिळा लावा आणि आरती करा. त्यानंतर कमळ बियांच्या हाराने ‘ऐं ह्रीं श्री अष्टलक्ष्मीये ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छगश्च नमः स्वाहा.’ मंत्राचा १०८ वेळा जप करा. नामजप केल्यानंतर घराच्या आठही दिशांना ते दिवे लावा आणि कमळाच्या बियांची माळ तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. माता लक्ष्मीची प्रार्थना करा. या उपासनेने संतुष्ट होऊन माता लक्ष्मी कृपा करते असे ज्योतिष शास्त्र सांगते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *