नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! आजच्या या स्पर्धेच्या युगात बघितले तर प्रत्येक गल्लीबोळात विविध वस्तूंची दुकाने असलेली आपल्याला दिसतात. काही दुकाने अगदी छोटीशी आणि गल्लीत असूनही अगदी छान चालतात त्यांच्या दुकानावर नेहमी गर्दी असते ग्राहकांच्या जणू रांगा लागलेल्या असतात आणि काही दुकाने अगदी मोत्यांच्या ठिकाणी मोठी व भरपूर माल असलेली असली तरीही त्या दुकानात ग्राहक फिरत नाही. दिवसभर दुकानदार ग्राहकांची वाट पाहत बसत म्हणतात की ते त्या दुकानदारांचे नशीबच आहे.

भाग्याचे साथ असेल तर अगदी गाण्या-कोपऱ्यातील दुकानही चांगले चालते आणि भाग्याची साथ नसेल पॉईंटवर असलेल्या दुकानाला ही ग्राहकांसाठी वाट बघावी लागते. परंतु भाग्याची साथ नसेल तर आपण ज्यावेळी भाग्याची साथ मिळेल त्यावेळी सर्व काही ठीक होईल असे म्हणून चांगले वेळ येण्यासाठी वाटच बघायची का ? नाही ना. तर आजच्या लेखात दुकानात ग्राहकांची गर्दी होण्यासाठी ग्राहकांची रांग लागण्यासाठी कोणता उपाय करावा ते आपण पाहणार आहोत.

उपाय अगदी साधा व सोपा आहे परंतु खरोखर प्रभावी असा आहे आणि या उपायासाठी खूप काही करण्याची आवश्यकता नाही यात काही टोने टोटके नाहीत हे खूप काही कठीण कामही नाही. या उपायासाठी आपल्याला फक्त एका वस्तूची गरज लागणार आहे. हा उपाय आपल्याला कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही शनिवारी करता येईल. आपल्याला सलग सात शनिवार हा उपाय करायचा आहे. आणि जर शक्य असेल तर नेहमीच प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरी चालेल.

दुकान न चालण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे दुकानातील वास्तुदोष किंवा दुकान ज्या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर आहे त्याच्या कुंडलीतील दोष. तर हे दोन्ही दोष मिटवण्यासाठी हा उपाय खूप साधा असा आहे त्यासाठी खूप खास असा हा उपाय आम्ही सांगणार आहोत तर त्यासाठी आपल्याला शनिवारी सकाळी दुकान उघडण्यापूर्वी घरातील स्त्रीने किचनची स्वच्छता करून एका स्वच्छ भांड्यात पीठ किंवा मैद्यापासून कोणताही एक खारट पदार्थ बनवावा. त्यात तुम्ही पुरी कचोरी समोसा खारे शंकरपाळे असा कोणताही पदार्थ बनवू शकता.

बनवलेले तेवढे एका प्लेटमध्ये घेऊन दुकानात जावे, घरात त्या पदार्थातील थोडासाही भाग शिल्लक ठेवू नये किंवा कोणी खाऊही नये म्हणून दुकान उघडले की दुकानाची स्वच्छता करावी दुकानात अगरबत्ती लावावी आणि आपल्या दुकानात ज्या कोणत्या देवी देवतांची आपण स्थापना केली असेल त्या देवी देवतांना त्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. आता तुम्ही म्हणाल की देवांना खारट पदार्थाचा नैवेद्य कसा काय दाखवू शकतो. तर आपल्याला हा एक टोटका म्हणून उपाय करायचा आहे म्हणून मनात कोणतेही शंका न आणता तो नैवेद्य अर्पन करावा.

दिवसभर तो नैवेद्य भगवंतांपुढे तसाच राहू द्यावा म्हणजे आपल्या वास्तू मधील ज्या काही वाईट व नकारात्मक शक्ती असतील त्या सर्व त्या पदार्थाकडे आकर्षित होतील. मिठाकडे नकारात्मकता व वाईट शक्तींना आकर्षित करण्याचा गुणधर्म आहे आणि एकदा का त्या वाईट व नकारात्मक शक्ती त्या पदार्थाकडे आकर्षित झाल्या की त्या त्यालाच चिकटून बसतात कारण मिठाने एकदा कोणाला धरले तर सहजासहजी सोडत नाही. दिवसभर तो नैवेद्य तसाच उघडा राहू द्यावा. आणि त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे शनिवारी सकाळी आपण हा नैवेद्य ठेवला होता आणि शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर तो नैवेद्य उचलून एका काळया कुत्र्याला खाऊ घालावा.

दुसऱ्या दिवसापर्यंत तो तसाच राहू देऊ नये शनिवारी संध्याकाळी पदार्थ खाऊ घालावा म्हणजे संपूर्ण नकारात्मकता त्या पदार्थाबरोबर घराबाहेर पडते आणि हा उपाय आपल्याला नियमित करायचा आहे याने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *