नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आता तुम्ही देखील तुम्हाला आलेले स्वामी महाराजांचे अनुभव आम्हाला पेजला मेसेज करून सांगू शकता. तुमच्या अनुभवांना शब्द देण्याचे सौभाग्य मला स्वामींमुळे लाभले. तुमचे अनुभव आज सातासमुद्रापार जात आहेत.

जिथे विज्ञान संपते, तेथे अध्यात्म सुरू होते… असाच एक सत्य अनुभव निफाड येथील विठ्ठलदादा यांना आला. पाहूया विठ्ठलदादा यांच्या शब्दात.

मी विठ्ठल, राहणार निफाड. माझा भाचा तुषार वय पाच वर्षे अतिशय चुणचुणीत मुलगा. नेहमी खेळात अग्रेसर आणि कधीच आजारी पडायचा नाही. परंतु यास एक दिवस ताप येण्याचे निमित्त झाले. मेंदू ज्वर झाला आणि तुषार बेशुद्ध झाला. घरातील आम्ही सगळे खूप घाबरलो. काय करावे काही सुचत नव्हते. शेवटी आम्ही त्याच अवस्थेत तुषारला नाशिकच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. डॉक्टरांनी गेल्या-गेल्या तुषारला तपासले आणि ॲडमिट करून घेतले. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.

सात दिवस औषधोपचार झाले. परंतु दुर्दैव! तुषारचा प्रकृतीत मात्र काहीही फरक पडत नव्हता. डॉक्टरांनी हात टेकले. आम्हाला त्यास घरी घेऊन जाण्यास सांगितले. सर्वांचा धीर खचला. त्यावेळी तेथील नर्सने आम्हाला धीर देत काही माहिती दिली आणि सांगितले की श्री क्षेत्र दिंडोरी येथे तुम्ही तुषारला घेऊन दर्शनाला जा. स्वामी महाराज सर्व काही ठीक करतील. अशा गोष्टींवर आमचा कुणाचाच विश्वास नव्हता. ते काय आम्ही ऐकले नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेथील नर्सने आम्हाला विनंती केली.

अखेरचा उपाय म्हणून तुम्ही तुषारला स्वामींच्या दर्शनाला घेऊन जा हा आग्रह धरला. आम्हीदेखील एक शेवटचा उपाय म्हणून तुषारला दिंडोरीला घेऊन जाण्यास तयार झालो. गुरुवारचा दिवस सेवेकर यांची गर्दी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आम्ही दिंडोरीला आलो. तेथे आम्ही परमपूज्य गुरुमाऊलींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. गुरुमाऊलींनी अमृतदृष्टीने तुषारकडे पाहिले. आम्हाला काही सेवा समजावून सांगितली. आणि ते म्हणाले बारा तासात मुलगा शुद्धीवर येईल.

परमपूज्य गुरुमाऊली सांगितल्याप्रमाणे आम्ही तात्काळ काही सेवा केल्या. आणि आश्चर्य!! गुरुमाऊलींच्या वचनाप्रमाणे दिलेल्या मुदतीत तुषार शुद्धीवर आला. आई-वडील आणि डॉक्टरांना झालेला आनंद अवर्णनीय होता. तुषारची प्रकृती सुधारू लागली होती. श्री स्वामी महाराजांमुळे तुषारला एक नवीन जीवनच लाभले होते. त्याचा पुनर्जन्म झाला होता जणू.

त्या घटनेपासून आम्ही सर्व कुटुंबीय स्वामींची मनोभावे दररोज सेवा करतो. त्यांच्यावरील आमचा विश्वास हा दिवसेंदिवस दृढ होत चालला आहे. हॉस्पिटल मधील नर्स जणू काही स्वामींच्या दुतच असल्यासारख्या आम्हाला भेटल्या. जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्म सुरू होते. आणि हे स्वामी महाराजांमुळे आम्हाला पटले..
श्री स्वामी समर्थ!!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *