नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!कोणत्या राशींसाठी हा आठवडा भाग्यशाली असेल, व्यवसायात कोणाला नुकसान होईल, प्रेम जीवनात कोणाला समस्यांना सामोरे जावे लागेल, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य.

मेष : समतोल राखा

श्री गणेशाचे आगमन उत्साहात साजरे कराल. षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे सतर्कता बाळगावी लागणार आहे असेच संकेत असतात. कोणाच्या सल्ल्याने कोणतेही काम करायला जाऊ नका. त्यामुळे नुकसान होऊ शकते. प्रत्येक गोष्टीत नियोजन हे महत्त्वाचे राहील. नियोजन न करता कोणते काम करायला गेलात तर ते काम वेळेत होणार नाही. त्यामुळे तुमची चिडचिड होईल अशा कालावधीत समतोल राखा. व्यावसायिकदृष्टय़ा मोठी गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाने कामाकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक बचत करणे योग्य राहील. समाजमाध्यमांचा वापर करताना भान ठेवा. कौटुंबिक वादविवाद टाळा. जोडीदाराशी एकनिष्ठ राहा. आध्यात्मिक गोष्टीत मन रमवा. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ दिनांक : १८, २३
महिलांसाठी : गौरी पूजनाचा दिवस आनंदात कसा साजरा करता येईल ते पाहा.

वृषभ : महत्त्वाचे निर्णय टाळा

श्री गणेशाचे आगमन होताना थोडीशी धावपळ होणार आहे. ही धावपळ झाली तरी चिडचिड करू नका. शांतपणे गणेशाचे आगमन करा. सध्या चंद्र ग्रहाची अनुकूलता नाही असे म्हणायला हरकत नाही. अशा वेळी स्वत:हून स्वत:ची अडचण वाढवायची नाही हे लक्षात ठेवा. म्हणजेच बऱ्याच दिवसापासून मनामध्ये ज्या गोष्टी घोळत होत्या त्या बोलून दाखवल्यामुळे बरेच काही विस्कळीत होऊ शकते. इतरांच्या बोलण्या- वागण्याकडे लक्ष देण्याची ही वेळ नाही. आपले काम भले नि आपण भले हेच योग्य राहील. प्रत्येक वेळी मागचे काढून त्यावर चर्चा करत बसला तर वाद हा होणारच आहे. त्या वेळी या आठवडय़ात जितके शांत राहता येईल तितके शांत राहा. महत्त्वाचे निर्णय टाळा. व्यवसायात जे चालले आहे ते ठीक आहे असे समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. खर्च कमी करा. कुटुंबाची काळजी घ्या. प्रकृती जपा.
शुभ दिनांक : १७, २१
महिलांसाठी : वातावरण आनंदी ठेवा.

मिथुन : उत्पन्न वाढेल

दरवेळी प्रमाणे श्री गणेशाचे आगमन मोठय़ा उत्साहाने कराल. दिनांक २० , २१ , २२ हे तीन दिवस फारसे चांगले आहेत असे म्हणता येणार नाही. त्यामुळे या दिवसांत कोणाशीही संवाद करताना तो जपूनच करा. या दिवसांत परिस्थिती अशी निर्माण होते की, कितीही शांत राहायचे ठरवले तरीसुद्धा ती शांतता भंगच होते. हे तीन दिवस कसे आहेत हे तुमच्या आधी लक्षात आले आहे. त्यामुळे या तीन दिवसांचे वातावरण कसे ठेवायचे हे तुमच्याच हाती आहे असे म्हणायला हरकत नाही. डोके शांत ठेवून काम करा. त्यामुळे त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यावसायिक उत्पन्न वाढेल. नोकरदार वर्गाला धीर मिळेल. वायफळ खर्च टाळा. घरामध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने पुढे जा. उपासना फलद्रूप होईल. आरोग्याची काळजी घ्या. विश्रांती घ्या.
शुभ दिनांक : १८, १९
महिलांसाठी : मनामध्ये असलेला रुसवाफुगवा बाजूला ठेवा नि गौराईंचे आगमन आनंदाने करा.

कर्क : व्यवस्थापन उत्तम जमेल

सर्वासोबत श्री गणेशाची स्थापना अगदी उत्साहाने कराल. दिनांक २३ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम जाईल. आजपर्यंत कोणतेही काम करताना मनामध्ये जी धडसोड वृत्ती होत होती ती आता होणार नाही. अंगामध्ये असणारा आळसही कमी होईल. प्रत्येक गोष्टीची सुरुवात चांगली होईल. बाकी राहिलेल्या कामांना गती येईल. कोणत्याही गोष्टीचे व्यवस्थापन उत्तम जमेल. व्यावसायिक परिश्रम वाढतील. भागीदारी व्यवसायात नफा मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करावे लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. समाजसेवा करावीशी वाटेल. जिवलग मित्रमैत्रिणींची भेट होईल. मुलांच्या आवडीनिवडी कडे लक्ष द्याल. भावंडांशी वादविवाद टाळा. आरोग्य साथ देईल.

शुभ दिनांक : २०, २१
महिलांसाठी : गौराईंच्या आगमनाने मन आनंदमय होईल.

सिंह : नवी दिशा मिळेल

श्री गणेशाची स्थापना करताना जो संकल्प तुम्ही करणार आहात तो संकल्प विघ्नहर्ता नक्कीच पूर्ण करणारा असेल. सप्ताहातील सर्व दिवस चांगले असतील. सध्या कोणतेही काम आता मागे राहणार नाही. प्रत्येक कामाला गती आल्यामुळे एक प्रकारची नवी दिशा मिळेल. इतरांनी केलेली मदत सत्कारणी लागेल. कोणत्याही कामात अडथळा येणार नाही अगदी सहज मार्गी कामे मार्गी लागतील. व्यवसायात खरेदी विक्री व्यवहार मोठय़ा प्रमाणात होतील. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाचे प्रस्ताव येतील. आर्थिक भरभराट होईल. समाजमाध्यमाद्वारे प्रसिद्धी मिळेल. संतती सौख्य लाभेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. शेजाऱ्यांशी मात्र जेवढय़ास तेवढे राहा. आरोग्य उत्तम राहील.
शुभ दिनांक : २२, २३
महिलांसाठी : आगळय़ावेगळय़ा स्वरूपात गौराईंचे आगमन अगदी आनंदाने कराल.

कन्या : आनंदी सप्ताह

श्री गणेशाचे आगमन सर्व कुटुंबासोबत मौज मजेत करणार आहात. प्रत्येक आठवडय़ात हे करू नका ते करू नका, हा दिवस वाईट तो दिवस चांगला असेच दिवस होते, पण काळजी करू नका. हा सप्ताह अगदी आनंदी जाणार आहे. चांगल्या कामासाठी आता उशीर लागणार नाही. चांगले दिवस असल्यानंतर ते कधी संपून जातात हे कळतच नाही. तसेच सध्या तुम्हाला जाणवणार आहे. व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगला फायदा राहील. नोकरदार वर्गाला काम करताना इतरांकडून मदत मिळेल. आर्थिक स्थिरता निर्माण होईल. राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होईल. भावंडांविषयी असलेली चिंता मिटेल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. भावंडांना मदत करण्याचा हेतू साध्य होईल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य ठणठणीत राहील.

शुभ दिनांक : १७, १९
महिलांसाठी : सणासुदीचा आनंद काही वेगळाच असतो याचा सुखद अनुभव येईल.

तूळ : पुण्य कर्म घडेल

गणेश चतुर्थी दिवशी अगदी वाजतगाजत गणरायाचे आगमन कराल. दिनांक १७ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी सर्व दिवस उत्तम असतील. ज्या कामामध्ये नेहमी अडथळे निर्माण व्हायचे ते अडथळे दूर होतील व ते काम व्यवस्थित पूर्ण होईल. सध्या प्रत्येक गोष्टीत यश मिळणार आहे. तेव्हा तुम्ही कुठे कमी पडू नका. चांगल्या गोष्टी होण्यासाठी वेळ लागतो, हा धीर तुम्ही आत्तापर्यंत धरलेला आहे. त्यामुळे उशिरा का होईना याचे फळ चांगले मिळेल. व्यावसायिकदृष्टय़ा सक्षम बनाल. उत्पादन वाढीचा वेग चांगला असेल. नोकरदार वर्गाला कामामध्ये जो चढ-उतार होता तो कमी झालेला दिसून येईल. नातेवाईकांशी असलेला दुरावा कमी होईल. जोडीदाराला विश्वासात घेऊन काम करा, त्यामुळे गैरसमज निर्माण होणार नाही. धार्मिक गोष्टीत सहभाग दाखवून हातून पुण्य कर्म घडेल. प्रकृती चांगली राहील.
शुभ दिनांक : १८, १९
महिलांसाठी : सणासुदीचे दिवस कुटुंबात आनंद वाढवणारे असतील.

वृश्चिक : पर्याय स्वीकारा

श्री गणेशाचे आगमन भक्तिभावाने करा. दिनांक १८, १९ हे दोन दिवस तसे बेताचेच आहेत. या दिवशी कोणी तुमचे काम करावे यासाठी अपेक्षा ठेवू नका. कारण ते काम तुम्हाला स्वत:लाच करावे लागणार आहे. या दोन दिवसांत वादविवाद या गोष्टीपासून लांब राहा, त्यामुळे स्वत:लाच त्रास होणार नाही. कोणत्याही गोष्टीत पुढाकार घेणे तुम्हाला आवडत जरी असले तरी तुम्हाला ते काही वेळेस त्रासाचे ठरते. अशा वेळी पर्यायी मार्ग स्वीकारा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी असतील तर ते पूर्ण करताना संयम ठेवा. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव विसरून चालणार नाही. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. मुलांची हौसमौज पूर्ण कराल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. प्रकृती ठीक राहील.
शुभ दिनांक : २१, २२
महिलांसाठी : उत्साहात गौराईंचे स्वागत कराल.

धनू : गुंतवणूक टाळा

श्री गणेशाच्या आगमनाने आनंदीमय वातावरण निर्माण होईल. दिनांक २०, २१, २२ या दिवसांत कोणाशीही बोलत असताना होऊन गेलेल्या गोष्टींविषयी चर्चा करू नका. तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही तर तुम्ही स्वत:वरील नियंत्रण हरवता, त्यामुळे तुमच्या आजुबाजूच्यांनाही या गोष्टीचा त्रास होतो. हे दिवस चांगले जावे असे वाटत असेल तर हाताची घडी तोंडावर बोट असेच करावे लागेल. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात चाललेल्या घडामोडीत नवीन बदल करणे शक्य होईल, त्यामुळे उत्पादनात वाढ होईल. नोकरदार वर्गाने कामकाजातील नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. मुलांच्या बाबतीत हलगर्जीपणा टाळा. कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. योगसाधनेला महत्त्व द्या. आरोग्य सांभाळा.
शुभ दिनांक : १८, २३
महिलांसाठी : गौरी आवाहन व पूजन या दिवसांत सहनशील राहा.

मकर : शुभारंभ होईल

श्री गणरायाचे स्वागत कुटुंबासोबत आनंदाने करा. २३ तारखेचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांत चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. या कालावधीत बरेच काही खास होणार आहे. ज्या गोष्टींविषयी खात्री वाटत नव्हती ती खात्री आता वाटणार आहे. स्वप्न पाहणे व प्रत्यक्षात ते पूर्ण होणे यात फरक नक्कीच असतो. सध्या हे स्वप्न पूर्ण होणार आहे. या सप्ताहात शुभ गोष्टींचा शुभारंभ होईल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन उद्योगांना चालना मिळेल. नोकरदार वर्गाचा भाग्योदय होईल. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात काम करण्याची मानसिकता होणार नाही. मित्रमैत्रिणींशी मनमोकळेपणाने संवाद साधाल. कुटुंबाशी मते जुळतील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ दिनांक : १७, २१
महिलांसाठी : मनासारख्या गोष्टी घडतील.

कुंभ : मानसिक समाधान लाभेल

श्री गणेशाचे आगमन होताना भक्तीमय, आनंदी वातावरणात साजरे कराल. दिनांक १७ हा एकच दिवस सोडला तर सध्या सप्ताहात चंद्र ग्रहाची अनुकूलता चांगली राहील. दरवेळी तुम्ही तुमच्या मनाची समजूत घालता की आज ना उद्या चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागणार नाही, ही समजूत आता खरीच होणार आहे. प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल, उशिरा का होईना चांगले फळ मिळेल. व्यवसायात चालून आलेल्या संधीचा फायदा घेऊन कामाला लागा. त्यासाठी फार विचार करत बसू नका. नवीन नोकरीचा विचार करत असाल तर तो करायला हरकत नाही. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. राजकीय क्षेत्रातील डावपेच यशस्वी होतील. मित्रमैत्रिणींची भेट होईल. मनमोकळेपणाने संवाद साधाल. नातेवाईकांशी मात्र जपून संवाद करा. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती उत्तम राहील.

शुभ दिनांक : १९, २३
महिलांसाठी : गौरी- गणपतीचा दिवस प्रसन्नता वाढविणारे असतील.

मीन : आर्थिक सुबत्ता येईल

श्री गणेशाचे आगमन करताना मनामध्ये कोणतीही अढी ठेवू नका. आनंदाने आगमन करा. दिनांक १८, १९ हे दिवस उदास राहू नका, त्यामुळे वातावरण बिघडू शकते. प्रत्येक गोष्ट मनासारखी व्हावी म्हणून अट्टहास सोडा. इतरांनी काय करावे यापेक्षा स्वत:ला काय करायचे आहे याचा विचार करा. एखादी गोष्ट करायची ठरवली तरी ती वेळेत होणार नाही. वादविवाद करण्यापेक्षा माघार घ्यायला शिका, म्हणजे त्रास होणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा आशावादी दृष्टिकोन राहील. भागीदारी व्यवसाय करणे टाळा. नोकरदार वर्गाची कामातील जबाबदारी वाढेल. आर्थिक सुबत्ता येईल. राजकीय क्षेत्रातील परिचय वाढेल. वैवाहिक जीवनातील मतभेद दूर ठेवा. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
शुभ दिनांक : २०, २१
महिलांसाठी : नियोजनबद्ध पद्धतीने काम करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *