नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!व्यावसायिक प्रगती होईल

मेष : सप्ताहातील बुध, गुरु शुभयोग सप्ताहारंभी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक उपक्रमांतून झगमगाटी यश देईल. ता. २८ व २९ हे दिवस व्यावसायिक उत्तम प्राप्तीचे. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा सार्वजनिक बाबींतून कटकटीची ठरेल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग.
मान-सन्मानाचा कालखंड

वृषभ : मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणामुळं ता. २५ व २६ या दिवसांत गाठीभेटी करारमदार आदींमधून फलदायी होणार. सप्ताहाचा शेवट तरुणांना स्पर्धात्मक यशाचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मान सन्मानाचा.
मुलाखतींमध्ये यश मिळेल

मिथुन : ता. २८ ते ३० हे पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र मोठे गतिमान राहील. नोकरीतील घडामोडी प्रसन्न ठेवतील. पुनर्वसु नक्षत्रास बुध, गुरु लाभयोग नोकरीच्या मुलाखतीतून यश देणारा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक, उत्सव प्रदर्शनातून लाभ. ओळखी-मध्यस्थीतून विवाहयोग. मात्र, पौर्णिमेनंतर घरात शांत राहा.
वाद मिटतील, सूर गवसेल

कर्क : पौर्णिमेचा सप्ताह शुभग्रहांची ताकद चांगलीच वाढवेल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना छान सूर गवसेल. ता. २८ ते ३० हे दिवस सतत प्रसिद्धीच्या झोतात ठेवतील. पुष्प नक्षत्राच्या व्यक्तींचे वाद मिटतील. राजकीय व्यक्तींकडून लाभ. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना संतदर्शनाची शक्यता.
गुप्तचिंता दूर होतील

सिंह : सप्ताहात बुध, गुरु लाभयोगाचा अंडरकरंट छान काम करेल. ता. २६ ते २८ हे दिवस तरुणांना विशिष्ट स्वरूपाचे हुकमी यश देणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती मॅन ऑफ दि मॅच होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी न बोलता कामे करून घ्यावीत. गुरुवारची अनंत चतुर्दशी गुप्तचिंता घालवील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा मौजेचा कालखंड.
व्यवसायात वसुली होईल

कन्या : पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचे राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी. बाकी शुक्रभ्रमणामुळे व्यावसायिक वसुली करेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा वैवाहिक जीवनातून भाग्यसंकेताची, दाम्पत्याची गुप्तचिंता जाईल.
प्रवासात काळजी घ्या

तूळ : शुभग्रहांची लॉबी सप्ताहात छान अंमल करेल. ता. २४ ते २६ हे दिवस सर्व प्रकारच्या क्षेत्रात गतिमान राहतील. सतत माणसाचे सहकार्य मिळेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठे चमत्कार घडवेल. मात्र पौर्णिमेच्या काळात प्रवासात काळजी घ्या – चीजवस्तू जपा.
राजकीय मध्यस्थी लाभदायक

वृश्‍चिक : पौर्णिमेजवळ शुभग्रहांचा छान अंमल राहणार आहे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती मस्त लाभ उठवतील. नोकरीत भाग्यबीजे पेरली जातील. राजकीय व्यक्तींच्या मध्यस्थीतून लाभ होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठ्या गाठीभेटीचा. वादग्रस्त येणे वसूल होईल. संततीबद्दलची चिंता जाईल.
सुवार्तांची मालिका असेल

धनु : सप्ताह मोठा नावीन्यपूर्णच राहील. पौर्णिमेच्या प्रभावात गुरु, बुध प्रचंड साथ देईल. विवाहाची प्रतीक्षा करणारे, विवाहासाठी अँटिने सज्ज ठेवा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती सीमापार चौकार – षटकार मारतील. पौर्णिमेजवळ सुवार्तांची शृंखलाच राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या काळात सार्वजनिक जीवनात गैरसमज टाळावेत. भावंडांशी जपून वागा.
तरुणांच्या समस्या सुटतील

मकर : सप्ताहात घरातील तरुणांचे प्रश्‍न निश्‍चितच मार्गी लागतील. ता. २८ व २९ हे दिवस श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना गाठीभेटी वा विशिष्ट करार-मदारांतून फलद्रूप होणारे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ प्रवासात जपावे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस मानसन्मानाचे ठरतील.
विवाहासंबंधींच्या अडचणी दूर होतील

कुंभ : पौर्णिमेच्या प्रभाव क्षेत्रात गुरु, बुध शुभयोगाचे प्रचंड पाठबळ राहील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार भाग्यलक्षणीच राहील. तरुणांच्या विवाहातील अडसर जातील. ओळखी-मध्यस्थी यशस्वी होतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ वादात पडू नये. बाकी धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी अन्नपाण्यातील संसर्ग टाळावा.
नोकरीत कौतुक होईल

मीन : सप्ताहातील चंद्रबळातून शुक्रभ्रमण झकास बोलेल. घरातील मानसिक पर्यावरण मंगळ भ्रमणाच्या तप्त कालखंडातही उत्तम राहील. पौर्णिमेजवळ सुवार्ताची शृंखला राहील. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल. ता. २८ व २९ हे दिवस रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना भावोन्मेषांचेच. उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार विवाहविषयक गाठीभेटींचा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *