नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृती मध्ये शकुन-अपशकुन शुभ अशुभ अशा अनेक गोष्टींना महत्त्व दिले जाते. आपल्या आजूबाजूचे काही घडत असते. त्यामुळे आपल्या भविष्यात होणाऱ्या संकटांचा तसेच शुभ घटनांचा तो एक संकेत देखील असतो.

परंतु काही जण लोक या संकेतांकडे लक्ष देतात. तर काही जण या संकेतांकडे लक्ष देत नाहीत. आपल्या शास्त्रांमध्ये यावर उपाय देखील सांगितलेले आहेत. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना ही वेगळ्या प्रकारची असते. रंगरूप यामध्ये खूपच फरक असतो. तसेच स्वभाव देखील वेगवेगळ्या प्रकारचा असतो.

आपल्या शरीरावर असणाऱ्या अनेक प्रकारच्या खुणा देखील भविष्यात घडणार्‍या घटनांचा संकेत देत असतात. आपल्या शास्त्रांमध्ये सामुद्रिक शास्त्राला खूपच महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. आपल्या शरीरावर असणार्‍या चिन्हांचा तसेच आपल्या अवयवांचा अभ्यास सामुद्रिक शास्त्रांमध्ये केलेला आहे. यामध्ये व्यक्तीचे भूतकाळ, भविष्यकाळ तसेच वर्तमान काळ याचा अभ्यास केला जातो. अशाच प्रकारच्या शरीरावरील खुणा आपल्यासाठी काही शुभकारक असतात तर काही अशुभ देखील असतात.

गोल चेहरा असणारे व्यक्ती खूपच भाग्यवान असतात. चांगली नोकरी त्यांना तसेच चांगले भविष्य त्यांना मिळते. त्यांना चांगला जोडीदार मिळतो. मध्यम उंची असणारे लोक देखील चांगले समजले जातात. ज्या लोकांचे कान इतर लोकांपेक्षा मोठे असतात असे लोक देखील भाग्यवान समजले जातात. केस कमी असणे किंवा टक्कल असणे हे सौंदर्यासाठी चांगले नसले तरी असे लोक खूपच भाग्यशाली असतात.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या समोरील दातांमध्ये फट असते हे लोक खूपच सौभाग्यशाली असतात. ते आपल्या नोकरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवतात. आर्थिक परिस्थिती देखील त्यांची खूपच चांगली असते. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे दात बाहेर आलेले असतील तर ते बोलणारे व भाग्यशाली असतात.

व्यक्तींचे हात मऊ, गुलाबी असतील, मध्यभागी खोलगट आणि रेषा अगदी स्पष्ट दिसत असतील तर अशा व्यक्ती देखील खूपच भाग्यशाली मांनल्या जातात. पायांच्या तळव्यांवर शंख, गदा, सूर्य यासारखे निशाण असलेल्या या व्यक्ती खूपच ऐश्वर्यशाली मांनल्या जातात. ज्या महिला किंवा व्यक्तींच्या नाभी मोठ्या असतात या देखील व्यक्ती खूपच भाग्यशाली समजल्या जातात. खोल, काळी, टप्पोरे डोळे असणारे लोक खूपच बुद्धिमान समजले जातात. तसेच या व्यक्ती धनवान देखील असतात.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे अशा खुणा असतील तर ते लोक खूपच भाग्यशाली मानले जातात तर मित्रांनो वरील पैकी तुम्हाला देखील अशा प्रकारची हुन आहे का हे पहा व आपले भविष्य जाणून घ्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *