नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!समुद्र शास्त्र ही वैदिक ज्योतिषशास्त्राची एक शाखा आहे. यामध्ये शरीरावरील तीळ आणि शरीरयष्टी, रंग आदी पाहून व्यक्तीचे गुण आणि दोष यांची माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये विविध माध्यमांद्वारे व्यक्तीची माहिती दिली जाते.

समुद्र शास्त्रामध्ये व्यक्तीच्या अवयवांच्या रचनेच्या आधारे कोणत्या महिलांना त्यांच्या पती आणि सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानले जाते, हे सांगितलं जाते. अशा महिला एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात गेल्या तर त्यांच्या आयुष्य आनंदाने ओतप्रोत भरुन जाते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या असतात या महिला…

भाग्यवान असतात अशा तरुणी…
समुद्र शास्त्रानुसार, कपाळ तीन बोटांपेक्षा रुंद, अर्धचंद्रासारखे आकाराचे असेल तर या तरुणी खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा तरुणी जिथे-जिथे जातात तिथे सुख-समृद्धी नांदते. त्याचबरोबर त्या आपल्या कौशल्याने स्वत: चेच नाही तर संपूर्ण घराचे नाव उज्ज्वल करतात.

ही खूण आहे खास
असेही मानले जाते, की ज्या तरुणींच्या कपाळावर त्रिशूलच्या आकाराचे चिन्ह असते, त्यांना खूप भाग्यवान असतात. समुद्र शास्त्रानुसार, अशा तरुणींसोबत लग्नानंतर पतीची सामाजिक प्रतिष्ठा वाढते.

भाग्यवान असतात या महिला
महिलांच्या डोळ्यांच्या वरील आणि खालील त्वचा हलकीशी लालसर असेल आणि त्यांच्या डोळ्यांची बाहुली दुधासारखी पांढरीशुभ्र असेल तर त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. ज्या महिलेची चाल फ्लेमिंगोसारखी आणि तिची कंबर वाघिणीसारखी पातळ असेल तर अशा महिला सर्व सुख उपभोगणारी मानली जाते.

पायाच्या अंगठ्याची रचना..
समुद्र शास्त्रानुसार, महिलांच्या पायाचे बोटे गोलाकार, उंच आणि लालसर असतील तर त्या खूप भाग्यवान असतात. अशा महिला पतीसाठी खूप लकी समजल्या जातात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *