नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मी जर तुम्हाला अस सांगितल की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही तीन काम करा. ज्यामुळे तुमच आयुष्य बदलू शकत तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच बसणार नाही. पण हे पूर्ण ऐकल्यानंतर बसेल यात काही शंका नाही. त्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपण दिवसाची सुरुवात कशी करतो हे फार महत्त्वाच आहे. त्यावरच आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो.

आपला संपूर्ण दिवस कसा जाणार आहे आपल्या दिवसाची सुरुवात आपण कशी केली आहे याच्यावर अवलंबून असत. म्हणूनच आपल्या दिवसाची सुरुवात ही आपण योग्य प्रकारेच करायला हवी. मग तर चला ऐकूया सकाळी उठल्यानंतर कोणती तीन काम तुम्ही करायला हवीत. सगळ्यात पहिलं काम म्हणजे कर दर्शन.

अर्थात झोप येत नाही उठल्या उठल्या अंथरुणावरून उतरायच्या आधी तुम्ही तुमचे दोन्ही हात तुमच्या डोळ्यासमोर आणि ईश्वराचे स्मरण करा. पहाटे कर दर्शन केल्यामुळेच आपल्याला एक नवी ऊर्जा मिळते. दोन्ही हातांच्या तळव्यांकडे बघत कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम हा मंत्र म्हणा.

हा मंत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर कमीत कमी देवतेचे स्मरण करून त्याचे आभार माना. आणि मग ते दोन्ही हा तुमच्या चेहऱ्यावर फिरवा. त्यामुळे काय होईल. तर तुमचा दिवस चांगला जाईल. देवाचे स्मरण करत त्याचे आभार मानत तुम्ही अंथरुणातून खाली या आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला रात्री काही वाईट स्वप्न पडले असतील.

झोप नीट झाली नसेल, किंवा इतर कुठल्याही समस्या असल्या तरी त्या सगळ्या अंथरुणावरच राहतील. आणि तुम्ही अंथरुणातून बाहेर याल. त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचा आहे. अर्घ्य म्हणजे जल अर्पण करणे. पहाटे अंघोळ केल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या त्यात लाल चंदन टाकून लाल चंदन नसेल तर सरळ साधे कुंकू टाका.

आणि हे जल सूर्य देवाला अर्पण करा. हे काम रोज केल्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होते. कीर्ती मध्ये वाढ होते. आता तुम्ही म्हणाल तर हे कस शक्य आहे. तर कुंडली मध्ये ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आपल्याला कीर्ती प्रधान करतो. सूर्य आपल्याला प्रतिष्ठा प्रदान करतो. तुमच्या कामांमध्ये तुम्हाला फार यश मिळवायचे असेल.

कर्तुत्व गाजवायचा असेल तर ते सूर्यामुळे शक्य होत. आणि म्हणून ही सूर्याची उपासना करण्याची एक पद्धत आहे. जर तुम्ही तुमच्या कामात खुश नसाल. करिअर मध्ये काहीतरी छान घडाव अस तुम्हाला वाटत असेल. तर नित्य नेहमी पहाटे उठून तुम्ही सूर्याला जल अर्पण करा. मनापासून हे काम करा. नमस्कार करा. नक्कीच तुम्हाला त्याचा सकारात्मक प्रभाव बघायला मिळेल.

पण हे जल तुम्हाला सूर्यास्त झाल्यानंतर एका तासात अर्पण करायच आहे. अगदीच आठ नऊ वाजता जल अर्पण करायच नाही. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या अगोदर एक तास आधी त्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायला हव. आता तिसर काम ते आहे ते तुळशीला पाणी घालन. पहाटे उठलात कर दर्शन केल अर्थात स्वतःच्या हातांचे दर्शन घेतले. ईश्वराचे आभार मानले.

त्यानंतर अंघोळीला गेला आंघोळ करून स्वच्छ होऊन बाहेर आला आणि त्यानंतर तुम्ही सूर्याला जल अर्पण केल. आता सूर्याला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुळशीला पण पाणी घालायच आहे. तुळशीला पाणी घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या इष्ट देवतेचे दर्शन करायच आहे. जर तुमच्याकडे तुमच्या इष्ट देवतेचा मंत्र असेल तर रोज तुम्ही म्हणत असाल तर तो मंत्रही तुम्हाला म्हणायच आहे.

आणि त्यानंतर आई-वडिलांना नमस्कार करायचा आहे. देवाला नमस्कार करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात केल्यानंतर तुमचा दिवस चांगला जाणारच जाणार. आणि जरी चांगला गेला नाही तरी आलेली जी काही परिस्थिती असेल त्याच्याशी लढण्याच बळ तुम्हाला ईश्वर देणार यात काही शंकाच नाही.

प्रत्येक दिवस जर चांगला जात असेल तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख-समृद्धी यायला वेळ लागणार तेव्हा उदास होऊन आयुष्यामध्ये मनासारख घडत नाही. म्हणून तक्रार करत बसण्यापेक्षा या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा. लवकर उठल्याने तुमच्या आयुष्यात अनुरागृह बदल घडणार असेल तर एकदा करून बघायला काय हरकत आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *