नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! चाणक्य नीतिला अनेक लोक फॉलो करतात. यामध्ये दिले गेलेले सल्ले बरेच लोक आपल्या आयुष्यात आत्मसाद करतात. खरंतर आचार्य चाणक्य यांनी आपल्या चतुर धोरणाच्या जोरावर अलेक्झांडरचा पराभव केला होता.

त्यामुळे त्यांची चाणक्य नीति जगभरात ओळखली जाते. चाणक्य नीतीमध्ये चांगले आयुष्य आणि यश मिळवण्यासाठी काय करावे आणि कोणत्या गोष्टी करु नये, हे देखिल सांगितले गेले आहे. त्यामुळे जे लोक आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांपासून त्रस्त असतात, ते नक्कीच याला फॉलो देखील करतात. चाणक्य म्हणतो की ज्यांचा फक्त विजयावर विश्वास असतो, शेवटी यश त्यांच्याच असते.

तसेच, जेव्हा सतत पराभव किंवा निराशेचा सामना करावा लागतो तेव्हा चाणक्याची ही एक गोष्ट लक्षात ठेवा. या गोष्टीचा विचार केल्यावर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. ज्या लोकांच्या हातात निराशा आहे किंवा जे लोक आपल्या यशा पर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा लोकांसाठी चाणक्य नीतिमध्ये एक मंत्र दिला आहे.

चाणक्य हे त्याच्या अध्यायात सिंहाचे उदाहरण देऊन समजावून सांगतात की ज्याप्रमाणे सिंह आपले शिकार मिळवण्यासाठी पूर्ण एकाग्रतेने प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे माणसाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकाग्रतेने प्रयत्न केले पाहिजेत.

त्यात जर माणसाचं लक्ष दुसरीकडे वळवलं तर संधी आणि यश दोन्ही गमावून बसेल आणि पुन्हा ते मिळवण्यासाठी शून्यातून सुरुवात करावी लागेल. एकाग्रता माणसाच्या यशाचे माप ठरवते. सिंह आपली सर्व शक्ती आपल्या शिकारीवर झेलण्यासाठी लावतो, त्याचप्रमाणे

मनुष्याने प्रामाणिक राहून आपल्या कामासाठी कठोर परिश्रम केले तरच त्याला यश प्राप्त होते. माणसाने सुरुवातीपासूनच पूर्ण उर्जेने काम केले, तर पुढचा मार्ग सुगम होईल. त्याचबरोबर सुरुवातीला आळशीपणा दाखवला तर अपयशी ठरणार हे नक्की.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *