नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो प्रत्येक फळाचे मनुष्याच्या शरीराला फायदे हे होत असतात. डाळिंब हे गोड आणि अतिशय चविष्ट फळ असून अनेक आजारांवरही ते गुणकारी आहे. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. ते व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी चा उत्तम स्त्रोत आहे. डाळिंबामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते. डाळिंबाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात.

डाळिंब खाण्याचे हे आहेत हे आहेत फायदे – कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ. चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे. अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.

मित्रांनो, डाळिंब खाल्ल्याने शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे. तसेच घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या. यांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी.

मित्रांनो, जर मूळव्याधीमध्ये रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्त पडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा. ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते. डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

मित्रांनो, जुळबावर देखील रामबाण उपाय आहे डाळिंब. जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात. डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते. बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.

इतरही अनेक फायदे आहेत-
पेशींना बळकटी मिळते – डाळिंबामध्ये अनेक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसात इतर फळांच्या रसापेक्षा अधिक अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्याचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते. तसेच सूज कमी होते.

कॅन्सरपासून बचाव – डाळिंबाचा रस हा कॅन्सरग्रस्त लोकांसाठी फायदेशीर ठरतो. प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना रोखण्यासाठी डाळिंबाचा रस प्यावा. तसेच त्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो.

मधुमेह – मधुमेह म्हणजेच डायबिटीजच्या उपचारात डाळिंबाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. डाळिंबाचा उपयोग इन्सुलिन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी केला जातो.अल्झायमरपासून बचाव – डाळिंबाचे दाणे अल्झायमर रोगाच्या वाढीला रोखतात. तसेच एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *