नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!वास्तुशास्त्रामध्ये, कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी? इथपर्यंत अनेक गोष्टी सांगण्यात येतात. इतकेच नव्हे, तर वास्तुशास्त्र आयुष्यातील अशा अनेक गोष्टींबाबत आपणास मार्गदर्शन सुद्धा करते. तसेच, मित्रांनो, आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये स्वयंपाक घराला आणि तेथील प्रत्येक भांड्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

त्याचप्रकारे आपल्या स्वयंपाक घरातील वस्तूंना विशेष महत्त्व दिले गेले आहे. आणि आपणा सर्वांनाच माहित आहेत की, या भांड्याचा वापर, आपण न चुकता आपल्या रोजच्या कामात करत असतो. तसेच इतर काम करतानासुद्धा यांचा उपयोग केला जातो. आणि आपल्या घरातील लक्ष्मीने म्हणजेच आपल्या घरातील ज्या महिला आहेत.

त्या महिलानी रोज रात्री झोपताना ही वस्तू तव्यावर नक्की ठेवावी. आणि ज्या घरात महिला नित्यनियमाने ही वस्तू ठेवत असतील, तर त्या घरात मातालक्ष्मी निरंतर वास करुन राहते. आणि त्यामुळे आपल्या घरात धनवैभव, सुखसमृद्धी यात वाढ होते. आणि आज आपण असाच एक सोपा उपाय पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला पाहूया ती वस्तू कोणती आहे.

1.पहिला नियम मित्रांनो, हा उपाय करण्याआधी काही नियमांची पूर्तता करणे गरजेचे आहे. आणि जर या नियमांचे पालन केले नाही, तर त्या उपायाचा काहीच फायदा होणार नाही. आणि हे नियम खुप सोपे आहेत. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण आपले स्वयंपाक घर स्वच्छ करून ठेवावे.

थोडक्यात स्वयंपाक केलेली भांडी तसेच, खरकटी झालेली भांडी बेसिनमध्ये ठेऊ नये. तुम्हाला माहित असेल की, ज्या ठिकाणी अस्वच्छता असते, त्या ठिकाणी माता महालक्ष्मीचे आगमन होत नाही. माता महालक्ष्मीचा प्रकोप होतो. तसेच, मित्रांनो, आपल्या आसपास काही लोक एकेकाळी खूप श्रीमंत होते.

मात्र आज त्यांची परिस्थिती गरिबीची झाली आहे. आणि अनेकजणांचे गरीब राहण्याचे प्रमुख कारण हे एक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अन्नपूर्णादेवी वास करते, ती जागा नक्की स्वच्छ ठेवावी. घरातली सर्व भांडी स्वच्छ करता येत नसतील, तर कमीतकमी तवा आणि कढई या 2 वस्तू तरी स्वच्छ करून ठेवाव्यात.

2.मित्रांनो, दुसरा नियम आपल्या घरातील तवा आणि कढई कधीही पालथी ठेऊ नये. तसेच आपल्या घरात येणाऱ्या लोंकाना या दोन्ही वस्तू दिसणार नाही याची काळजी नक्की घ्यावी. अनेकवेळा आपल्या घरात आजबाजूचे लोक येतात, तसेच, पाहुणे येतात.

आणि त्यांची नजर आपल्या घरातील तवा आणि कढई याच्यावर वारंवार पडत असते. त्यामुळे या वस्तू कोणाच्याही नजरेला दिसणार नाहीत, अशा ठिकाणीं ठेऊन द्याव्यात. जसे आपण आपल्या घरातील झाडू कोणाच्या नजरेत दिसू नये, म्हणून सुरक्षित ठिकाणीं ठेवतो.

त्याचप्रकारे तवा आणि कढई एखादया सुरक्षित ठिकाणीं ठेवावी. त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्या घरात जी गृहणी आहे. त्यांनीदेखील एक काळजी घ्यावी. महिन्यातील मासिक धर्म चालू असतील, त्या 5 दिवसात हा उपाय करायचा नाही. त्याचबरोबर आपल्या घरात सुतक चालू असेल, तेव्हासुद्धा हा उपाय करायचा नाही.

या काही नियमांचे पालन केल्यानंतरच हा उपाय नक्की करावा. चुकीचा आणि अर्धवट उपाय केल्याने, याच्या काही गंभीर स्वरूपात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आणि जो आहे तो पैसा देखील वाया जाऊ शकतो. तर या काही अत्यंत आवश्यक गोष्टीचे आपण पालन करणे गरजेचे आहे.

3.मित्रांनो, हा उपाय आपण रात्री झोपायला जाण्यापूर्वी करावा. अगोदर आपले स्वयंपाकघर स्वच्छ करावे. ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो, त्या ठिकाणीं शेगडीवर किंवा चुलीवर एक तवा ठेवावा. जर तुमच्याकडे शेगडी नसेल, तर तुम्ही चुलीवरसुद्धा हा उपाय करू शकता.

कारण काहीजण खूपच गरीब असतात आणि त्यांच्याजवळ शेगडी देखील नसते. अशा लोकांनी हा उपाय चुलीवरसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, त्या तव्यावर एक तेजपत्ता आणि त्यावर एक हिरवी इलायची ठेवावी. कारण या दोन्ही वस्तू लक्ष्मीप्रधान आहेत. लक्ष्मीप्रिय आहेत.

या 2 वस्तू ठेवल्यानंतर, तुम्ही झोपी जावे. तसेच, मित्रांनो, हा जो तुम्ही उपाय करत आहात, त्याची वाचता कोठेही, कोणासोबत करू नये. कारण हे तंत्रातले जे टोटके, उपाय आहेत त्याची वाचता कुठेही केल्यास त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव तात्काळ नष्ट होतो. आणि याचा अत्यंत वाईट परिणाम काही लोकांना आलेला आहे.

आणि मित्रांनो, आपण दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यावर स्वच्छ स्नान करून, आपल्या देवघरात महालक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. आणि महालक्ष्मी मंत्राचा जप करावा. त्यानंतर रात्री ठेवलेल्या तव्यावरचा तेजपत्ता आणि इलायची, आपल्या उजव्या हाताने उचलून, गॅसवर ठेवावी आणि जाळावी.

त्या दोन्ही वस्तू पूर्णपणे जळाल्यानंतर, उरलेली जी काही राख असेल, ती राख घेऊन, आपल्या जवळच्या कोणत्याही झाडाच्या बुंध्याजवळ टाकावी. मात्र हे करताना आपल्याला कोणी पाहत नाही आहे, आडवत नाही आहे, याची पूर्ण काळजी घ्यावी. हा उपाय नित्यनियमाने रोज करावा.

आणि काही दिवसातच आपल्या घरातील भाग्य बदल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्याजवळ भरपूर पैसा येऊ लागेल. आणि हळूहळू आपल्या पैशांमध्ये वाढ देखील होईल. तर मित्रांनो अशाप्रकारे हा एक छोटासा उपाय आपण अवश्य करावा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *