नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! तुम्हाला लेख आवडत आहेत आणि तुमच्या प्रेमामुळे स्वामी महाराजांच्या अनुभवाचे लेख आज जगभरात आणि साता समुद्रापार पोचले आहेत. स्वामी महाराजांची तुमच्यावर अशीच कृपा कायमस्वरूपी असावी. तुम्हाला आलेले स्वामी महाराजांचे लेख हे आपल्याला पाठवायला विसरू नका. स्वामी महाराजांच्या भक्तिचा डंका आपल्याला संपूर्ण जगभरामध्ये वाजवायचा आहे. श्री स्वामी समर्थ ! यापुढील लेख हा सेवेकर्‍याच्या शब्दामध्ये.

नमस्कार मित्रांनो मी प्रशांत, गेली अनेक वर्षे मी स्वामी महाराजांच्या सेवेत आहे. माझे कुटुंबं अगदी सोन्यासारखे असेच आहे. माझी आई, बायको आणि वडील आणि एक मुलगी असा आमचा संसार आहे. वृत्तीने संपूर्ण कुटुंब धार्मिक आहे आणि त्यामुळे देवानेदेखील आम्हाला कधी काही कमी पडू नाही दिले. स्वामी महाराजांचा तर आमच्या कुटुंबावर वरदहस्तच आहे, आम्ही मागावे आणि स्वामींनी द्यावे असेच काहीतरी.

मित्रांनो मी एका लिफ्ट बनवणार्‍या कंपनीमध्ये काम करतो आणि 20-25 हजार पगार मला मिळतो. या पगारामध्ये आमच्या कुटुंबाचे खूप छान चालते आणि आम्हाला कधीही कशाचीही कमतरता पडली नाही. पण दोन वर्षापूर्वी कोरोंना नावाच्या महामारी मुळे सगळ्यांचीच आयुषये प्रभावित झाली आणि त्याला आम्ही देखील अपवाद नवतो. ते दोन तीन महीने आम्ही कशा पद्धतीने काढले हे न सांगणेच बरे, पण स्वामी महाराजांनी आमच्या घराला या वादळामध्ये देखील सुरक्षित ठेवले.

हळूहळू सगळे सुरू झाले आणि मी देखील कामाला जायाला लागलो. दोन महीने सेविंग वर सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि आता सेविंग जरी संपलेले असले तरी नोकरी सुरू झाली होती. परिस्थिती ही आजूबाजूला चांगलीच खराब होती आणि अनेकांच्या नोकर्‍या जात होत्या आणि काहींच्या आधीच गेल्या होत्या. आमच्या कंपनीने दोन महीने पगार दिला नवता पण अजून नोकरीवरुण तरी कुणाला काढले नवते.

पाहिल्याच दिवशी कंपनीमध्ये कळले की, कंपनीकडे लिफ्टच्या काहीही ऑर्डर्स नाहीयेत आणि कदाचित जर ऑर्डर्स लवकर नाही मिळाल्या तर कंपनी कामगार कपात देखील करू शकते. आम्ही सगळे निराश झालो होतो, मनामध्ये माझा स्वामींचा धावा चालू होता की… फक्त माझीच नको तर कुणाचीही नोकरी जाऊ देऊ नको. मी घरी आलो आणि मग ठरवेल उद्यापासून गुरुचरित्राचे पारायण करायचे.

दुसर्‍या दिवशी पहाटे उठून मी गुरुचरित्राचे पारायण सुरू केले. कंपनीमध्ये गोष्टी अगदी संथ चालू होत्या आणि सगळ्यांनाच एक प्रकारची मरगळ आलेली होती. काही दिवसांनी माझे पारायण संपले आणि त्या दिवशी मी प्रसन्न मनाने कंपनीमध्ये गेलो. कंपनी मध्ये आज वातावरण चांगले होते आणि प्रसन्न वाटत होते आणि अचानक आम्हाला कळले की, आपल्या कंपनीला एक खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे…. आता कुणाचीही नोकरी जाणार नवती, माझे स्वामी माझ्यासाठी आणि माझ्या कंपनीसाठी धावून आले. श्री स्वामी समर्थ महाराज की …. मित्रांनो माझ्या या छोट्या अनुभवासाठी महाराजांचा जयघोष कराल ना ?

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *