नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो आजच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण आपापल्या परीने पैसे कमावण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु मित्रांनो या पैशांच्या नादात आपले आरोग्याकडे म्हणजेच तब्बेतीकडे लक्ष राहत नाही. मित्रांनो अनेक अजारांच मूळ पोटात असतं. म्हणजेच पोट साफ न होणं अनेक आजारांना आमंत्रण देतं. पित्त, गॅसेस, ढेकर, जळजळ अशा समस्या उद्भवतात, तसंच अपचनही होऊ शकतं.

पोट साफ न होण्यासाठी चुकीच्या आहारपद्धती, पुरेसं पाणी न पिणं, व्यायामाचा अभाव, वेळेवर शौचाला न जाणं, चहा-कॉफीचं अतिरेकी सेवन व धूम्रपान या सवयी कारणीभूत असतात. नियमित पोट साफ न झाल्यास दिवसभर अस्वस्थ वाटतं व दिवस खराब जातो. त्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करता येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात ते उपाय.

मित्रांनो पोट साफ होत नसेल तर त्याची आधी लक्षण बघू – त्यात गॅसेस होन, भूक मंदावणे, नियमित शौचाला न होन, मान अशांत होन, पोटात दुखणे, शौचाला घट्ट होन तसचं ते करताना जोर लावावा लागणे इत्यादी लक्षण असतात.

पूरेसं पाणी प्या- सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोमट पाणी प्यायलं, तर पोट साफ होऊ लागेल. हा उपाय नियमित केल्यास ही तक्रार कायमची बंद होईल. यासोबतच दिवसभरही पुरेसं पाणी प्यायलं पाहिजे. जेवल्यावर लगेचच पाणी पिऊ नये, त्यामुळे गॅसेस, मलावरोधाची समस्या उद्भवू शकते. यामुळेच अपचन व इतर आजारही निर्माण होतात. त्यामुळे पाणी जास्त प्या.

वमन करणं- मित्रांनो आयुर्वेदात वमन विधीबाबत बरंच सांगितलेलं आहे. पोट साफ करण्यासाठीचा हा प्रभावशाली उपाय आहे. रोज सकाळी उठल्यावर पोटभर पाणी प्या. काही मिनिटांनी घशात बोटं घालून उलटी काढा. यालाच वमन म्हणतात. बऱ्याच वेळा वयस्कर मंडळी हा उपाय करताना दिसून येत असतात. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठीचा हा चांगला उपाय आहे. मात्र लहान मुलांवर याचा प्रयोग शक्यतो करू नये. तसंच पहिल्यांदा वमन करणाऱ्यांनी कुणाचे तरी वडीलधाऱ्या च मार्गदर्शन घेऊन हा प्रयोग करावा.

हिंगाचा वापर- मित्रांनो पोटाच्या समस्येवर हिंगाचा वापर केला जाऊ शकतो. आयुर्वेदात हिंगला महत्वाचे स्थान आहे. समस्यांवर हिंग खूप प्रभावशाली आहे. कोमट पाण्यात थोडं हिंग घालून ते पाणी प्यायल्यास पोट साफ होतं.

योगासनं- मित्रांनो योगासन करणे हा एक महत्वाचं उपाय आहे. मलावरोधामुळे पोट साफ न होण्याची समस्या असेल, तर काही योगासनांची मदत यासाठी घेता येईल. तिर्यक ताडासन, बंधासन, कटिचक्रासन, त्रिकोणासन ही आसनं केल्यावर मलावरोध कमी होऊ शकतो. यामुळे तुमचं पाचक तंत्र सुधारते.

सीताफळ च पान- मित्रांनो सीताफळ च पान देखील पोट साफ करण्यासाठी केला जाऊ शकतो. अनेक वर्षांपासून या पानांचा वापरपोट साफ करण्यासाठी करतात. हे पान चावतात आणि यामुळे पोट साफ होत असत. या उपायांशिवाय मध व लिंबाचा रस घालून कोमट पाणी, ओवा, सफरचंद, दही, कच्च्या भाज्यांचं सूप, जवस, तुळस आणि शहाळ्याचं पाणी या गोष्टीही पोट साफ करण्यासाठी मदत करतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *