नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो, आपल्या देशात अनेक लोक श्री स्वामी समर्थांना मानतात, त्यांचे दररोज मनोभावे पूजन करुन सतत त्यांचे नाम जपत असतात. तसेच अनेक भाविक आपल्या घरातच स्वामींचे पूजन करू शकतात, स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती ची स्थापना घरातील देव्हाऱ्यात करू शकतात. स्वामींची मुर्ती असेल तर रोज मुर्तीला स्नान घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा.

उपलब्ध असतील ती पुष्पे (फुले) स्वामींना अर्पण करा. स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात. त्यांना अप्रिय असे एक ही फुल नाही. तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा, तुळशीपत्र देखील स्वामींना वाहाव्यात.

काही कारणाने एखाद्या दिवशी स्वामींची पूजा नाही झाली तरी, हरकत नाही त्याचे दुःख न करता त्या ऐवजी स्वामींची निःसीम अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे. कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास धरणे महत्वाचे आहे. आणि जर तुम्ही त्या स्वामींच्या मूर्ती ची आरती करत असाल तर त्यापूर्वी एक अत्यंतमहत्त्वाचा नियम तुम्ही लक्षात ठेवला पाहीजे, तो आम्ही नियम खाली सांगितला आहे.

श्री स्वामी समर्थांची किंवा देवघरातील इतर कोणत्याही देवाची आरती करताना अर्धचंद्रच ओवाळावे असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते, पण स्वामी समर्थांना अर्धचंद्रच का ओवाळावे यामागे नेमके काय कारण आहे आणि स्वामी समर्थांना नेमक्या कोणत्या पद्धतीने व्हावे असा प्रश्न अनेक भाविकांना पडलेला असतो. तर आता आपण त्यामागील मूळ कारण काय आहे ते पाहू या.

मित्रांनो स्वामी समर्थांना नेहमी अर्धचंद्रच ओवाळावे पूर्ण ओवाळू नये कारण अर्धचंद्र ओवाळलेने देवा भोवती आगीचे कवच तयार होते, त्यामुळे केंद्रात किंवा घरी स्वामी समर्थांना किंवा इतर कोणत्याही देवाला ओवाळतांना अर्धचंद्रच ओवाळावे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती स्थापित केली असेल तर त्यांची आरती करत असताना किंवा देवघरातील इतर कोणत्याही देवाची आरती करत असताना नेहमी अर्धचंद्रच ओवाळावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *