नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!पिवळे दात अथवा दातावर साचलेला पिवळा थर हे कोणालाच आवडत नाही. मात्र एकदा का दात पिवळे दिसायला लागले की ते पांढरे करणं कठीण असतं. दातांची काळजी घेणं हे एक वेगळाच टास्क आहे. कधी कधी दिवसातून २ वेळा दात घासूनही दात पिवळेच राहतात. त्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या लोकांकडून बेकिंग सोडा वापरण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र दातांसाठी बेकिंग सोडा वापरण्याची पद्धत प्रत्येकाला माहीत असतेच असं नाही. ज्यांना बेकिंग सोडा वापरण्याची पद्धत माहीत नाही त्यांच्यासाठी Arm And Hammer ने दिलेल्या अभ्यासात याबाबत माहिती दिली आहे. तीच माहिती आम्ही खास तुमच्यासाठी इथे देत आहोत. तुम्हीही पिवळ्या दातांनी त्रस्त असाल तर या पद्धती अवलंबून हिऱ्यासारखे दात चमकवा

बेकिंग सोडा आणि नारळाचे तेल :
नारळाचे तेल हे व्यापक स्वरूपात ओरल हेल्थसाठी वापरण्यात येते. ऑईल पुलिंगसाठीही याचा उपयोग करून घेण्यात येतो.
दातावरील प्लाक काढून टाकण्यास नारळाच्या तेलाचा उपयोग होतो. १ चमचा नारळाचे तेल आणि १ चमचा बेकिंग सोडा मिक्स करा आणि ही तयार झालेली पेस्ट दातावर लावा आणि कमीत कमी २ मिनिट्स ब्रश करा. असे नियमित केल्याने दातावरील पिवळे थर निघून जाण्यास मदत मिळेल.

पाणी आणि बेकिंग सोडा :
यासाठी तुम्ही १ चमचा बेकिंग सोड्यामध्ये पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या. टूथब्रशला ही पेस्ट लावा आणि दात घासा. या मिश्रणाने किमान १ मिनिटपर्यंत दात घासा. त्यानंतर खळखळून चूळ भरा आणि तोंड धुवा. बेकिंग सोड्याच्या वापराने प्लाक बिल्डअप होण्यापासून रोखले जाते आणि दात स्वच्छ राहण्यास मदत मिळते.

बेकिंग सोडा आणि टूथपेस्ट
कॅव्हिटी आणि दात सडण्यापासून वाचविण्यासाठी दातांना फ्लोराईड आधारित टूथपेस्टने साफ करावे. दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिक्स करा आणि या मिश्रणाने दात घासा. साधारण २-३ मिनिट्स ब्रश करा. आठवड्यातून साधारण १ वेळा आणि महिन्यातून २-३ वेळा केल्यास दात सफेद राहण्यास मदत मिळते.

बेकिंग सोडा आणि मीठ
मीठामुळे दातातील कीड मरते हे तर सर्वांना माहीत आहे. मात्र दातांवरील पिवळे थर काढण्यासाठीही बेकिंग सोडा आणि मिठाचा वापर करून तुम्ही फायदा करून घेऊ शकता. मीठ हे नैसर्गिक अँटीसेप्टिक असून रोगाणुविरोधी गुणधर्मही यात आढळतात.

दातांवरील डाग काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा आणि मीठ मिक्स करा. आपल्या बोटाने दातावर घासा २-३ मिनिट्स दातावर हे घासत राहा. त्यानंतर पाण्याने तोंड धुवा. आठवड्यातून तुम्ही हा प्रयोग दातावर साधारण रोज करू शकता.

या गोष्टीकडे ठेवा लक्ष
दातावर बेकिंग सोडा लावताना तो हिरड्यांवर लागणार नाही याची काळजी घ्या अन्यथा हिरड्यांमधून रक्त येण्याचा धोका असतो अथवा जळजळ होऊ शकतेनेहमी बेकिंग सोड्याचा वापर हा कोणत्यातरी पदार्थात मिसळूनच दातांवर करावाअधिक काळ बेकिंग सोड्याचा वापर दातावर करू नका. अन्यथा यामुळे दात लवकर खराब होऊ शकतात

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *