नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो स्वामी सेवेबाबत आपल्या मनात खूप प्रश्न असतात. की स्वामींची नित्य सेवा कशी करता येईल? किंवा स्वामिसेवेत अजून काय काय करता येईल? जेणेकरून स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. यासारखे बरेच प्रश्न आपल्या मनात येत असतील. खर तर स्वामी आपले गुरू आहेत. आणि स्वामी आपल्या जीवनाचा आधार आहेत. त्यामुळे प्रत्येक सेवेकरी स्वामींच्या सेवेत तन, मन, धन अर्पण करत असतो. स्वामींनी अनेक लोकांचे कल्याण केले आहे. अनेकजण आपल्या अडचणी, समस्या घेऊन स्वामींकडे येत असतात. आणि स्वामींनीही भरभरून दिले आहे. स्वामी कालही होते. स्वामी आजही आहेत.

आणि स्वामी उद्याही असणार. स्वामी अनादी अनंत आहेत. म्हणूनच स्वामींची नित्य सेवा ही आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. स्वामींच्या नित्य सेवेत पुढील पैकी केल्या जाणाऱ्या नित्य सेवा पाहणार आहोत. स्वामींनी दिलेल्या “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” या अभिवचनाप्रमाणे स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. आणि मित्रांनो आज तुम्हाला नित्य सेवेत कोणत्या गोष्टी करायच्या आणि त्यातील सर्वात मोठी गोष्ट सांगणार आहे. बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितले देखील असेल. पहिली गोष्ट म्हणजे स्वामींचा जप स्वामींच्या नित्य सेवेत स्वामींच्या शडाक्षरी मंत्राला अनन्य साधारण महत्व आहे. स्वामींचा जेवढा जप कराल तेवढे स्वामी आपल्याला जपतील.

मित्रांनो स्वामींच्या या जपामुळे स्वामींच्या तुम्ही अगदी जवळ जाण्याचा मार्गच बनवू शकाल. जप तुम्ही चालता बोलता, उठता बसता कधीही केला तरी चालतो. याला कोणतेच बंधन नाही. जप स्वामिंसमोर बसून केला पाहिजे असे नाही. किंवा याच दिशेला तोंड करून केला पाहिजे त्याच दिशेला तोंड करून केला पाहिजे असे नाही आणि स्वामींचा मंत्र आसनावर बसून केला पाहिजे. असेही काही नाही. त्यामुळे स्वामींचा मंत्रजप तुम्ही कधीही, केव्हाही, कसाही करू शकता. तुम्हाला दिवसभरात इतर कोणती सेवा नाही करता आल्या तरी तुम्ही जर हा जप जरी केलात तर स्वामी तुम्हाला भरभरून देतील.

मित्रांनो तुम्हाला सगळे काही मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे “श्री स्वामी समर्थ” हा मंत्र जप करणे. या मंत्राचा जप करताना कोणतेही बंधन नाही. यासाठी जपमाळ हवी आहे. असेही नाही. हा मंत्र सकाळी बोलवा अथवा संध्याकाळी बोलवा. यालाही काही महत्व नाही आणि हा जप किती श्रद्धेने करता हे महत्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र परब्रह्म संजीवनीच आहे ही धारणा आपण मनात धरून श्री स्वामी समर्थ मंत्राला स्वतः भोवती गुंतवून घ्यायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण प्रत्येकाशी बोलतो. तसे मोठ्याने जप करणे. म्हणजे त्याला वैखरी असे म्हणतात. आपण तोंडामध्ये गुणगुणतो तो मंत्र म्हणजे मध्यमा असे म्हणतात.

आणि मित्रांनो अगदी मनातल्या मनात आपण मंत्र म्हणतो त्याला पैश्यंती असे म्हणतात. ध्यान योगाची सर्वात उच्च पातळी म्हणजे परा. या परा अवस्थेत जेव्हा आपण जप करतो. तेव्हा तो जप डायरेक्ट परमेश्वरा पर्यंत जात असतो. त्यामुळे आपल्यालाही “श्री स्वामी समर्थ” हा जप करत करत परमेश्वराच्या अंतकरणापर्यंत पोहोचायच आहे. म्हणजेच अगदी मनापासून आपल्याला हा जप करायचा आहे. मित्रांनो बघा मित्रांनो स्वामींच्या नित्य सेवेत “श्री स्वामी समर्थ” हा मंत्र जप केलात तर दुसरं तिसरं काहीही करायची गरज नाही.

तुम्हाला आणखी एक सांगायचे आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत यातील क्रमशः तीन अध्याय तुम्ही जरी वाचले तरी चालेल. स्वामींच्या नित्य सेवेत श्री स्वामी समर्थ हा जप आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत यातील क्रमशः तीन अध्याय आपण रोज वाचायचे आहेत. हे जर नाही जमले तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करायला हरकत नाही. तर मित्रांनो आजपासूनच तुम्ही स्वामी मध्ये काम करायला सुरुवात करा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *