नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!कथा अशी की,एकदा एक सेवेकरी खूप संकटात सापडतो. तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो. परंतू त्याचा त्रास हा वाढतच जातो. असे काही दिवस गेल्यावर त्याची त्या संकटातून सूटका होते व तो मोकळा श्वास घेऊ लागतो. परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही, म्हणून त्याचे सेवेकडे व महाराजांकडे दूर्लक्ष होते.

काही दिवस गेल्यानंतर त्याला एके रात्री एक स्वप्न पडते. त्या स्वप्नात त्याला असे दिसते की, तो स्वामी सोबत एका भयंकर वाळवंटातून चाललेला आहे. ऊन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. संपूर्ण शरीरातून घामाचे लोंढे वाहत आहेत. अन् अशाही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रमण करीत आहेत. तेव्हा त्या सेवेकऱ्याला वाळूवर ऊमटलेले पावलांचे दोन व्यक्तीचे ठसे दिसतात. त्यावेळी तो सेवेकरी न राहवून महाराजांना विचारतो की, “स्वामी समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या ऊन्हात या वाळवंटातून कोण गेले असावे?” तेव्हा स्वामी त्याला ऊत्तर देतात की, “या पाऊल खूणा दूसऱ्या कोणाच्या नसून तूझ्या व माझ्याच आहेत. तूझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तूझ्या सोबतच होतो. याची ती साक्ष आहे.”

हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटून पश्चाताप होतो. आणखी थोडे पूढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात. तेव्हा तो काहीसा दूःखी होऊन महाराजांना विचारतो, “स्वामी जेव्हा मी खूपच अडचणीत होतो, तेव्हा आपणही मला सोडून गेलात. त्यामूळे येथून पूढे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना?” त्यावर स्वामी स्मित हास्य करून त्याला सांगतात,”नाही रे वेड्या…! येथून पूढे तर मी तूला माझ्या खांद्यावर ऊचलून घेतले होते.

एक उमेद दुख नाहीसे करेल
एका घरात पाच दिवे लावले होते एके दिवशी एक दिवा म्हणाला, मी इतके जळुन सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही त्यामुळे मी विझुन जाणेच चांगले आणि तो विझुन गेला तो दिवा होता उत्साहाचे प्रतिक हे पाहुन जो दुसरा दिवा होता जो शांतीचे प्रतिक होता त्यानेही हाच विचार केला आणि तो सुद्धा विझुन गेला उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्या नंतर तिसरा दिवा जो हिमतीचा होता तो ही आपली हिम्मत हरला आणि विझुन गेला उत्साह शांती हिम्मत हे विझल्यामुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझुन गेला सगळे दिवे विझल्या नंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहीला पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता परंतु निरंतर जळत होता तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला त्याने पाहीले घरात एकच दिवा जळत होता तो खुप खुष झाला चार दिवे विझुन सुद्धा तो खुष होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटता आहे त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलीत केले. तो पाचवा दिवा उमेदीचा होता. उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलीत ठेवा इतर दिवे आपोआप प्रकाशीत होतील. स्वामींवरचा विश्वास दुख नाहीसे करेल आणि एक उमेद यश शिखरावर पोहचवेल. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *