नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये अनेक गोष्टींना विशेष असे महत्त्व दिले जाते. प्रत्येक देवी देवतांना विशेष असे स्थान दिले गेले आहे. प्रत्येक भक्त आपल्या कुलदेवतेची पूजा आराधना करतात. अगदी मनोभावे प्रार्थना देखील करत असतात. जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात रुद्राक्षाला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो धार्मिक मान्यता कशी आहे की भगवान शिवांच्या अश्रूंपासून रुद्राक्ष तयार झाला आहे. त्यामुळे त्याला खूपच पवित्र मानले गेले आहे. तसेच मित्रांनो आपल्या आजूबाजूला बरेच लोक ही रुद्राक्ष परिधान करतात.

मित्रांनो रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा आपल्याला मिळत असते. तर मित्रांनो रुद्राक्ष धारण केल्याने आपल्याला नेमके कोणते फायदे होतात. याविषयीची माहिती आज मी तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे. हिंदू मान्यतेनुसार या सर्व रुद्राक्षांची स्वतःची स्वतंत्र शक्ती आहे.

१) ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की रुद्राक्ष धारण केल्याने सर्व संकटे दूर होतात. एक मुखी रुद्राक्ष पासून ते एकवीस मुखी रुद्राक्ष पर्यंत त्याचे पर्याय आढळतात.

२) मित्रांनो रुद्राक्ष धारण केल्याने आपले आरोग्य देखील चांगले राहते. आरोग्यासाठी रुद्राक्ष धारण करणे देखील गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार रुद्राक्ष शरीराला बळ देतो. हृदयविकार ताप सर्दी खोकला यासंबंधीतील आजार दूर करतो. रुद्राक्ष धारण केल्याने चेहऱ्यावर चमक येते. ज्यामुळे व्यक्तिमत्व आकर्षक बनते.

३) बरेच जण रुद्राक्षाची माळ जपासाठी वापरतात. त्यामुळे जीवनात पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास वाढतो. रुद्राक्ष च्या बिया आरोग्य आणि अध्यात्मिक बळ देण्यासाठीउवयुक्त आहे.

४) रुद्राक्ष धारण केल्याने आपल्या मागील पापाचा नाश होतो. ज्यामुळे वर्तमान जीवनात अडचणी येतात. रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्य रुद्राचे रूप धारण करू शकतो. हे सर्व पापामधून बाहेर पडण्यास मदत करते आणि एखाद्याच्या जीवनातील ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत करते.

५) तसेच मित्रांना रुद्राक्ष हे नकारात्मक गोष्टींचा नाश करतो. इतकी ताकद त्याच्यामध्ये असते. रुद्राक्ष हा एकमेव अध्यात्मिक मनी मानला जातो.

मित्रांनो असे अनेक फायदे रुद्राक्ष धारण केल्यामुळे होतात. त्यामुळे मित्रांनो रुद्राक्ष हा प्रत्येकाने धारण करायला हवा. रुद्राक्षामध्ये खूपच ताकत असते आणि त्याचे फायदे आपणालाच खूप होत असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *