नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपल्या पौराणिक कथांचे सौंदर्य हे आहे की, त्या विशिष्ट स्थळ आणि काळामध्ये बंदिस्त नाहीत. रामायण, महाभारत आणि तत्सम कथा हे निव्वळ पूर्वी घडलेल्या घटना नाहीत तर त्या तुमच्या आमच्या जीवनात सातत्याने घडणारे प्रसंग आहेत. या कथांचा मतितार्थ ‘ शाश्वत ‘ आहे.

कृष्ण जन्माची कहाणी
कृष्णजन्मकथेला देखील एक मतितार्थ आहे. देवकी मानवी देहाचे प्रतीक आहे तर वासुदेव प्राणशक्तीचे प्रतीक आहे. मानवी देहामध्ये जेंव्हा प्राणशक्ती वृद्धिंगत होते तेंव्हा कृष्णाची म्हणजे आनंद ची अनुभूती प्राप्त होते.कंस हा देवकीचा भाऊ, म्हणजे देवकीचा सहोदर, जो अहंकाराचे प्रतीक आहे. अहंकार मानवी देहासोबत येतो. होय नां ? अहंकार आनंदाच्या म्हणजे कंस कृष्णाच्या विनाशाचा प्रयत्न करतो.
आनंदी व्यक्ती कोणालाही उपद्रव देऊच शकत नाही. दुःखी आणि भावनात्मक दुखावलेली व्यक्ती व्यत्यय निर्माण करत रहाते. ज्या व्यक्तींना, आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटते, अशा व्यक्ती त्यांच्या दुखावलेल्या अहंकारापोटी इतरांवर अन्याय करतात.

अहंकाराचा शत्रू
अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आनंद आहे. आनंद आणि प्रेम असेल तेथे अहंकार टिकू शकत नाही. प्रेम, साधेपणा आणि अनंदापुढे अहंकार विरघळून जातो. कृष्ण म्हणजे आनंदाचे, साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण, प्रेमाचे उगमस्थान होय.
देवकी आणि वासुदेव यांना कंसाद्वारा बंदी बनवणे, हे अहंकाराचा जीवनावरील प्रभुत्व असणे दर्शवते. कृष्ण जन्मावेळी सर्व पहारेकरी झोपले होते. आपली पंचेंद्रिये जी बहिर्मुख असतात तीअहंकाराला खतपाणी घालत असतात. आनंदप्राप्तीसाठी पंचेंद्रिये अंतर्मुख होणे गरजेचे असते.

माखनचोर
कृष्णाचे एक रूप ‘ माखनचोर ‘ आहे. दूध पौष्टिकतेचे, परिपक्वतेचे प्रतीक आहे. ताक दुधाचे पक्व रूप आहे जे घुसळल्यावर लोणी वर तरंगते जे आणखी पौष्टिक, परिपक्व असते. तसेच आपल्या विद्ववत्तेच्या परिपाकातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानप्राप्तीमूळेे आपण शांत, स्थिर बनतो, विरक्त बनतो, कुशल बनतो. माखनचोर रूप हे प्रेमाची प्रतिष्ठा वाढवणारे, विरक्ती मुळे प्राप्त होणारी मोहिनी आणि कौशल्य दर्शवणारे आहे.

मोरमुकुटधारी
राजावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असते, जी मुकुटासारखी त्याच्या डोक्यावर असते, जी डोईजड वाटू शकते. परंतू आईला आपल्या बाळाची जबाबदारी ‘ जड ‘ वाटते कां ? तसे कृष्णाने त्याच्या सर्व जबाबदाऱ्या मोरपिसासारख्या लीलया आणि सहजतेने पार पाडल्या.

आपल्या प्रत्येकामध्ये असणारी सहजता, आकर्षकपणा आणि आनंद म्हणजेच कृष्ण होय. जेंव्हा चंचलता, चिंता आणि आशा अपेक्षा नसतील, जेथे गाढ शांती असते तेथे कृष्णाचा जन्म होतो.जन्माष्टमीचा संदेश हाच आहे की, समाजामध्ये आनंदाची लहर पसरवण्याची वेळ आली आहे. शांत आणि आनंदी बना.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *