नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो, लोभ हे सर्व वाईटाचे मूळ आहे. या विधानात शंभर टक्के सत्यता आहे. अनेकदा आमिष दाखवून आपण कोणताही त्रास घेतो जो केवळ आपल्यासाठी हानिकारक असतो. लोभ ही वाईट समस्या आहे, या विधानात शंभर टक्के सत्यता आहे. लोभामुळे आपण अनेकदा असा काही त्रास घेतो जो आपल्यासाठी हानिकारक असतो. या कारणास्तव, असे म्हटले जाते की लोभ वाईट आहे आणि कोणताही लोभ फार काळ टिकू शकत नाही, एक दिवस त्या लोभाचे दुष्परिणाम बाहेर पडावे लागतात. यासाठी आपण नेहमी प्रलोभन टाळले पाहिजे. आपण लोभाच्या जाळ्यात अडकलो आहोत, तर वेळीच त्यातून बाहेर पडा.

आपण लहान असतो तेव्हा पासून आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते कि लोभ हा अतिशय वाईट असतो माणसाने आहे तेवढ्यात समाधान मानावं नाहीतर आहे ते पण तो गमावून बसतो. आज आपण या गोष्टीच्या माध्यमातून तेच बघणार आहोत गोष्ट अतिशय गंमतशीर आहे आणि शिकवण देऊन जाणारी सुद्धा आहे.चला तर मग बघूया लालची राजा गोष्ट.

युरोपमध्ये यूनान नावाचा एक देश आहे. यूनानमध्ये पूर्वी मीडास नावाचा राजा राज्य करत होता. राजा मोठा लोभी होता. आपल्या मुलीला सोडून दुसरी कोणती गोष्ट संसारात त्याला प्रिय असेल ती म्हणजे सोने ते त्याला फारच प्रिय होते. तो रात्रभर सोने मिळण्याचा विचार करत असे आणि एक दिवस राजा मीडास आपल्या खजिन्यात सोन्याच्या विटा आणि नाणी मोजत होता. अचानक त्या ठिकाणी एक देवदूत आला तो राजाला म्हणाला,” मीडास तु फार धनवान आहेस.

मीडासने तोंड फिरवून उत्तर दिले, मी धनवान नाही, माझ्याजवळ थोडेसे सोने आहे. देवदूत म्हणाला,” तुला एवढया सोन्यातही समाधान नाही. तुला किती सोने पाहिजे, त्यावर राजा म्हणाला,” मला असे वाटते की ज्या वस्तुला मी हात लावीन ती सोन्याची व्हावी.’

देवदूत हसून म्हणाला,”ठिक आहे, उदयापासून तू ज्या वस्तूला हात लावशील ती सोन्याची होईल. त्या दिवशी रात्री मीडासला झोप लागली नाही. तो सकाळी उठला. त्याने खुर्चीवर हात ठेवला तर ती सोन्याची झाली.मीडासला फारच आनंद झाला. तो नाचू बागडू लागला. वेड्यासारखा धावत राहिला आणि बागेत गेला. त्या ठिकाणी प्रत्येक वस्तूला हात लावू लागला. त्याने फुले, पाने, फांदयांना हात लावला. त्या सर्व सोन्याच्या झाल्या. सर्व चमकायला लागल्या. मीडासच्या जवळील सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या.

धावत धापा टाकीत मीडास थकून गेला. त्याला माहित नव्हते की त्याचे कपडेपण सोन्याचे झाले म्हणून ते जड झाले. बागेतून राजमहालात आल्यावर तो एका सोन्याच्या खुर्चीवर बसला. एका नोकराने त्याचे जेवण आणि पाणी भरून ग्लास समोर आणून ठेवला. परंतु मीडासने अन्नाला स्पर्श करताच ते सर्व अन्न सोन्याचे झाले, त्याने पाणी पिण्यासाठी ग्लास घेतला तर ग्लास आणि पाणी सोन्याचे झाले. मीडासच्या समोर सोन्याच्या पोळया, सोन्याचा भात, सोन्याचे बटाटे होते. तो भुकलेला, तहानलेला झाला होता. सोने खाऊन त्याची भूक थांबू शकत नव्हती.

मीडासला रडू आले. त्यावेळी त्याची मुलगी खेळून आली आणि वडिल रडताना पाहून ती त्याच्या कुशीत जाऊन अश्रु पुसू लागली. मीडासने तिला छातीजवळ घरले. परंतु त्याची मुलगी होती कुठे? मीडासच्या कुशीत ती सोन्याची झाली होती. ती येवढी जड होती की तिला उचलून घेवू शकत नव्हता. बिचारा मीडास डोके पकडून रडू लागला. देवदूताला त्याची दया आली. त्याला पाहून मीडास त्याच्या पाया पडला आणि स्फुंदून स्फुंदून प्रार्थना करू लागला, तुम्ही दिलेले वरदान परत घ्या, आणि त्यानंतर देवदूताने विचारले,”मीडास आता तुला सोने नको, सांग की ग्लासभर पाणी मौल्यवान आहे की सोने ? एक तुकडा पोळीचा चांगला की सोन्याचा?

मीडास हात जोडून म्हणाला,”मला सोने नको. मला समजून चुकले की माणसाला गरजेपेक्षा जास्त सोने नको. त्याच्याशिवाय माणसाचे काम अडत नाही. परंतु एक ग्लासभर पाणी आणि एक घास अन्नाचा घेतल्याशिवाय माणसे काम करू शकणार नाही. आता मी सोन्याचा लोभ करणार नाही.” आणि त्यानंतर शेवटी देवदूताने एका भांड्यात पाणी घेऊन संगितले, हे सर्व ठिकाणी शिंपड, मीडासने ते पाणी आपल्या मुलीवर, टेबलावर , खुर्चीवर, अन्नावर, पाण्यावर आणि बागेतील सर्व वस्तूवर शिंपडून सर्व पदार्थ पहिल्यासारखे केले.

तर मित्रांनो हि होती लालची राजा मराठी गोष्ट या गोष्टीतून आपल्याला बरच काही शिकायला मिळत हि गोष्ट आपल्याला बरच काही शिकवून जाते आपण कधीही लोभ करू नये आहे त्यात समाधान मानावे नाहीतर आपली दशा हि गोष्टीतल्या राजा प्रमाणे होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *